कोणत्या वयात वाढते कोंड्याचे प्रमाण ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । मुलींना सगळयात जास्त केसांची काळजी हि कोंड्यासाठी घ्यावी लागते. केस लांब आणि दाट असतील तर अशा वेळी त्याची काळजी खूप जास्त प्रमाणात घ्यावी लागते. कारण त्याचा परिणाम हा आपल्या त्वचेवर आणि केस वाढीवर होऊ शकतो. केसांमध्ये जर कोंडा झाला असेल तर त्यामुळे केसांच्या इतर समस्या या जास्त निर्माण होतात. त्यामुळे कोंड्याच्या समस्या या दूर करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या टिप्स वापरणे गरजेचे आहे . केसांसाठी बाजारात सुद्धा खूप नवनवीन प्रॉडक्ट आहेत . नेहमी रासायनिक पदार्थांचा वापर हा केसांसाठी केला जातो. . त्यामुळे केस हे अजून रफ होण्यास सुरुवात होते . तसेच आपले वय जास्त असेल किंवा आहारात काही गोष्टींचे प्रमाण हा= कमी असेल तरी सुद्धा केसांच्या समस्या या वाढत जातात. वयानुसार सुद्धा केसांमध्ये कोंडा वाढतो. त्यामुळे कोणत्या वयात साधारण डोक्यात कोंडा हा जास्त असतो . ते जाणून घेऊया …
कोंडा हा उन्हाळ्याच्या दिवसांत कमी असतो खरा, पण हिवाळ्याच्या दिवसांत कोंड्याचे प्रमाण हे वाढत असते .हिवाळा सुरु झाला कि , डोक्यात कोंडा हा वाढतोच . अश्या वेळी डोक्यात खवले यायला सुरुवात होते . त्यामुळे डोक्यात जखमा या जास्त होतात. याची कारणे हि वेगवेगळी आहेत . आपला आहार आणि आपल्या राहण्या – खाण्याच्या जीवनपद्धती यामुळे आपल्या शरीराच्या इतर समस्या या निर्माण होतात. कोंडा झाल्याने आपल्या काळ्या केसांमध्ये पांढरा कोंडा हा जास्त दिसतो. त्यामुळे सगळेच केस पांढरे वाटतात.
साधारण वयाच्या ३५ ते ४० व्या वर्षी केसांमध्ये कोंडा हा जास्त असतो. म्हणजे नेहमी त्याच वयाच्या दरम्यान कोंडा येत असेल असे नाही .इतर वेगवेगळ्या वयांमध्ये सुद्धा कोंड्याच्या समस्या या वाढत जातात. कोंडा हा साधारण लहान बाळाला पण होऊ शकतो. बाळाच्या आईला जर कोंडा असेल तर त्यावेळी बाळाला सुद्धा कोंडा होण्याची दाट शक्यता असते . कोंडा हा आपल्या शरीरातील बदलत गेलेल्या हार्मोन्स मुळे सुद्धा होऊ शकतो. मुलींना किशोर वयात कोंडा हा जास्त होतो. तसेच जर आपल्या केसांची योग्य पद्धतीने निगा राखली गेली नाही तर सुद्धा कोंडा हा वाढत जातो.