मुलींसाठी कोणत्या वयात ‘ब्रा’ घालणे योग्य ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । मुली वयात आल्या कि त्यांच्या स्तनांचा आकार हा वाढत जातो. किशोरवयात मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात. मुलींच्या मध्ये होणार बदल हा नैसर्गिक प्रकारचा असतो. कोणतीही मुलगी वयात आली , कि आईकडून बऱ्याच गोष्टींचे ज्ञान तिला मिळत असते. एका विशिष्ट वयात आल्यानंतर मुलींना ब्रा घालण्याची सवय हि करावी लागते. ब्रा म्हणजे मुलींच्या जीवनातील एक मैत्रीणच म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. जोपार्यंत मुलींना ब्रा घालायची सवय लागत नाही. त्याशिवाय त्यांना स्वस्थ वाटत नाही. एकदा ब्रा ची सवय झाली कि, मग मात्र मुलींना ती दररोज घालावीत लागते .
बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा या आल्या आहेत. त्यामुळे मुलांना ज्या प्रकारच्या ब्रा या सुटसुटीत आणि योग्य वाटत असतील तर त्या ब्रा वापरणे नक्कीच योग्य राहते. दररोज मुलींसाठी वापरत असलेली ब्रा हि आपले शरीर हे सुडोल आणि सुव्यवस्थित राहण्यास मदत होते. सुरुवातीच्या दिवसांत ब्रा घातल्याने खूप अवघड वाटते. पण ज्यावेळी मुली त्याची सवय लावून घेतील तेव्हा कोणत्याही प्रकारचा त्रास हा होत नाही.
तुम्ही एका विशिष्ट वयात आल्यानंतरच ब्रा घालू शकता. शिवाय जेव्हा तुम्ही एथनिक कपडे घालता तेव्हा तुम्हाला स्पोर्ट्स ब्रा नक्कीच घालता येणार नाही. तसेच बाहेर जर शॉर्ट कपडे घालणार असाल तर अश्या वेळी तुमच्या कडे वेगळ्या प्रकारची ब्रा तुम्ही तुमच्या शरीरासाठी वापरू शकता. वास्तविक एखादी मुलगी ही वयाच्या १३ ते १४ व्या वर्षानंतर ब्रा घालणं सुरु करते. पण प्रत्येक मुलीच्या बाबतीत असं होत नाही. ही सरासरी आहे. एखाद्या मुलीचं शरीर जास्त हेल्दी असेल आणि वयाच्या आधीच तिने स्तन दिसायला लागले तर अशावेळी आपल्या शरीराचा स्तनांचा भाग तिला बॅलेन्स करण्यासाठी ब्रा घालणं गरजेचं आहे . स्तनांच्या आकाराप्रमाणे आपली मुलींच्या ब्रा ची सवय हि असली पाहिजे. साधारण ब्रा हीं जास्त घट्ट आणि जास्त सैल सुद्धा असता कामा नये.