Ayurveda Tips: जेवल्यावर अंघोळ करायची सवय गंभीर आजारांना देते आमंत्रण; जाणून घ्या काय सांगत आयुर्वेद
हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Ayurveda Tips) आपल्याला वेदांचे ज्ञान प्राचीन काळापासून दिले जात आहे. हे वेद मानवी जीवनावर मोठा प्रभाव करीत असतात. प्रत्येक वेद मानवी जीवनावर विविध प्रकारे प्रभाव करीत असतो. यापैकी एक वेद आयुर्वेद असून मानवी आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. आयुर्वेदात विविध औषधींचा मोठा समावेश आहे. यांपैकी काही औषधी वनस्पतींचा वापर हा ज्ञात आहे. मात्र काही वनस्पती आजही लोकांना ठाऊक नाहीत. परंतु त्या वनस्पती आयुर्वेदाच्या माध्यमातून मानवी आरोग्य सुखकर बनवीत असतात. त्यामुळॆ आपल्या आयुष्यात आयुर्वेत अत्यंत महत्वाचे आहे.
मानवी दृष्टिकोनातून पाहिले असता जीवन म्हणजे आपण दैनंदिन जगत असलेले आयुष्य. मात्र आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे जीवन म्हणजे शरीर, ज्ञान, मन आणि आत्मा यांचे संयुजन होय. त्यामुकले आपली दिनचर्या आणि आपण जगात असलेले आयुष्य हे सिद्ध असणे अत्यंत महत्वाचे आहे असे आयुर्वेद सांगते. (Ayurveda Tips) सर्वात आधी प्राचीन काळात जेव्हा आयुर्वेदाची उत्पत्ती झाली तेव्हा काही वर्षांमध्येच मानवाने यात विकसित रूपांची निर्मिती केली. ज्यामुळे औषध तज्ञात खूप मोठी क्रांती झाली.
आयुर्वेद या शब्दाची विभागणी केल्यास आयु म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे विज्ञान असा त्याचा अर्थ होतो. भारतीय शास्त्रात धन्वंतरी यांना भारतीय औषधांचे जनक मानले जायचे. मात्र प्राचीन विद्वानांनी आयुर्वेदाची निर्मिती करीत त्याची ८ भागात विभागणी केली आहे.
(Ayurveda Tips) यामध्ये
अंतर्गत औषधे,
नेत्रविज्ञान आणि कान नाक घसा उपचार,
शस्त्रक्रिया,
विषशास्त्र,
मानसोपचार,
बालरोग,
रसायन,
वाजीकर्म या विभागांचा समावेश आहे.
या विभागानुसार आज मानवी रोगांवर उपचार केले जातात. आपण आयुर्वेदाविषयी इतकी माहिती जाणून घेण्याचे कारण म्हणजे आयुर्वेद आपल्या जीवनावर प्राचीन काळापासून कसा प्रभाव करीत आहे हे सांगण्याचा अट्टाहास. (Ayurveda Tips) इतके असूनही आजकाल लोक आयुर्वेदिक औषधांपेक्षा थेट डॉक्टरी सल्ल्याने शस्त्रक्रिया वा गोळ्या, इंजेक्शन घेणे सोयीने समजतात. पण मुळात आपल्याच काही सवयी अशा असतात ज्या आपले आरोग्य बिघडवतात. यांपैकी एक सवय म्हणजे जेवल्यावर अंघोळ करणे.
होय. तुम्ही बरोबर वाचताय. जेवल्यावर अंघोळ करणे हि सवय तुमच्या जीवनशैलीचा एक भाग असेल तर तुम्ही तुमचे आरोग्य धोक्यात टाकत आहात. आपण खात असलेल्या अन्नाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो, हे आपण सारेच जाणतो. घरातील वयोवृद्ध लोकांना आरोग्यविषयीचे त्रास आणि त्यावरील उपाय यांबाबत जास्त माहिती असते. (Ayurveda Tips) त्यामुळे घरातील ज्येष्ठांचे सल्ले नाकारू नका.
तुम्ही अनेकदा वृद्धांकडून ऐकले असाल की, रात्री उशीरापर्यंत जागू नये, रिकाम्या पोटी झोपू नये, सकाळी आंघोळ करूनच जेवण करावं आणि जेवल्यानंतर अंघोळ करू नये. पण तरीही तुम्ही सर्रास याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्यासारखे फक्त तुम्हीच…
याबाबत (Ayurveda Tips) आयुर्वेद तज्ञ यांनी केलेल्या अभ्यासानुसार हि बाब स्पष्ट केली आहे कि, जेवणानंतर आंघोळ करण्याची सवय हि पूर्णपणे चुकीची आहे. आयुर्वेदानुसार, या सवयीमुळे आरोग्याचा ऱ्हास होऊ शकतो. संधीवात किंवा त्वचा रोग होण्याचं मुख्य कारण हीच सवय असल्याचेही आयुर्वेदात सांगितले आहे. याचे कारण असे कि, जेवणानंतर शरीराचं तापमान साधारण २ डिग्रीपर्यंत वाढतं. ज्यामुळे आपण खाल्लेलं अन्न पचवण्यात मदत होते. त्यामुळे जेव्हा पचनक्रिया सुरू असते तेव्हा रक्ताभिसरणाची वेग देखील तीव्र होत असतो. अशावेळी अंघोळ केल्यामुळे आंतरक्रियांवर मोठा परिणाम होऊन विविध आजारपण मागे लागू शकते.
० जेवणानंतर आंघोळ करू नये.. कारण, (Ayurveda Tips)
आयुर्वेदानुसार, जेवण केल्यावर लगेच आंघोळ केल्याने पचनक्रिया मंदावते. ज्यामुळे अन्नातील पोषक तत्व शरीराला मिळत नाही. शिवाय शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यात अगदी संधीवात ते त्वचाविकार असे विविध आजार होण्याची शक्यता आहे.
० जेवणाआधीच अंघोळ करावी.. कारण,
आंघोळीनंतर जेवण कधीही चांगलं असे आयुर्वेद सांगते. कारण जेवणाआधी आंघोळ केल्याने निरोगी राहता येते. शिवाय पोटभर जेवण होते. पण काही कारणास्तव जेवल्यावर अंघोळ करायला लागलीच तर किमान जेवणानंतर २ ते ३ तासांचा अवधी जाऊ द्यावा.
हाडं ठिसूळ होणे, संधिवात, त्वचा विकार, पोटाचे विकार अशा कोणत्याही समस्या निर्माण होण्यामागे तुमची हि एक सवय असू शकते. त्यामुळॆ जर तुम्हीही जेवणानंतर अंघोळ करत असाल तर आताच सावध व्हा आणि या सवयीवर मात करा.
‘हे’ पण वाचा :-
Ashwagandha Benefits: पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर गुणकारी ‘अश्वगंधा’; जाणून घ्या फायदे
Bad Health Habits: उत्तम स्वास्थ्यासाठी ‘या’ 25 वाईट सवयींची संगत आत्ताच सोडा; जाणून घ्या
Healthy Vegetables: औषधी रानभाजी तांदुळजा खा आणि स्वस्थ रहा; जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे
Skipping Dinner: रात्री उपाशी झोपण्याची सवय उडवेल कायमची झोप; जाणून घ्या दुष्परिणाम