घरगुती काढ्यांच्या सहाय्याने मुलांना ठेवा संसर्गापासून दूर; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता हिवाळा म्हटला म्हणजे थंडी आली. त्यात हिवाळ्याच्या मध्यान्हापासून थंडीचा तडाखा असा वाढला आहे कि काही विचारू नका. हि गोठवणारी थंडी लहान मुलांच्या आरोग्यावर लगेच परिणाम करते. परिणामी, सर्दी-खोकल्याबरोबरच अनेक प्रकारचे आजार मुलांना त्रास देतात. त्यामुळे सुरुवातीलाच कडक उपाय करणे गरजेचे असते. कारण कसे आजार हळूहळू मुलांच्या रोग प्रतिकार शक्तीवर घाला घालतात आणि तिला कमकुवत करतात. परिणामी मुलांना मोठमोठे आजार होण्याची शक्यता संभवते. म्हणून अश्या थंडीमध्ये मुलांना घरगुती अस्सल आयुर्वेदिक काढे द्या. जे बनवायला अगदी सोप्पे आणि मुलांच्या आरोग्यासाठी १००% गुणकारी आहेत. सर्दीमध्ये लहान मुलांसोबत अगदी मोठ्या लोकांचीदेखील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे अनेक वेळा खोकला, सर्दी सारख्या समस्या मोठ्यांनाही जाणवतात. छातीत श्लेष्मा जमा झाल्याने या समस्या अधिक वाढतात. अशा स्थितीत तुम्हीदेखील हे काढे पिऊ शकता. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
आल्याचा काढा
० साहित्य -
पाणी १ ग्लास
आले १ इंच
तुळस २ ते ४ पाने
काळीमिरी २
सेलरी २
हळद १ टी. स्पून
लिंबाचा रस १/२ चमचा
मध १ चमचा
० कृती - हा काढा तयार करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पाणी घ्या. ते उकळवायला ठेवा. आता या पाण्यात आले, तुळस, काळी मिरी, सेलेरी, हळद टाकून पाणी व्यवस्थित उकळून अर्धे करून घ्या. आता यात थोडा लिंबाचा रस मिसळून गॅस बंद करा. शेवटी एका ग्लासमध्ये हा काढा घ्या. त्यात मध मिसळून गरमा गरम प्या. यामुळे सर्दी,खोकला, कफ यांसारख्या समस्या कुठच्या कुठे पळून जातील.
० फायदा - थंडीमध्ये आले अत्यंत प्रभावी औषधीप्रमाणे काम करते. त्यामुळे आरोग्यासाठी आल्याचा काढा फायदेशीर आहे. यामुळे सर्दी, खोकला, कफ यासारख्या समस्या लगेच दूर होतात. हळद आणि तुळशीतील अँटी बॅक्टरीयल गुणधर्म इतर रोगांना देखील प्रतिबंध करतात. परिणामी रोग प्रतिकार शक्ती देखील मजबूत होते.
ओव्याचा काढा
० साहित्य -
पाणी १ ग्लास
ओवा १ चमचा
गूळ १ छोटा खडा
० कृती - ओव्याचा काढा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी येताच त्यात ओवा हातावर चुरून घाला. यानंतर पाण्यात गूळ घाला आणि १० मिनिटे व्यवस्थित उकळी येऊ द्या. दिवसातून किमान दोनवेळा हा काढा प्या. यामुळे काही दिवसातच श्लेष्माच्या समस्येपासून आराम मिळेल.
० फायदा - ओव्याचा प्रभाव खूप गरम असतो. त्यामुळे ओव्याचा काढा प्यायल्याने सर्दी आणि खोकला लवकर बरा होण्यास मदत होते. याच्या वापराने छातीत जमा झालेला खोकला आणि कफदेखील दूर होतो. शिवाय रोग प्रतिकार शक्ती देखील मजबूत होते.