Bad Habits: ‘या’ सवयी तुमच्या मेंदूवर करतात गंभीर परिणाम; जाणून घ्या आणि लगेच बदला
हॅलो आरोग्य ऑनलाईन। Bad Habits अनेकदा असं होत कि, फार लहान सहान गोष्टींचा आपल्याला अगदी सहज विसर पडतो. म्हणजे अगदी अंघोळीचा टॉवेल उचलायचा राहतो किंवा मग कुणाला तरी भेटायचं राहतं, फोन करायचा राहतो. कधी कधी तर काय बोलायचं होत त्याचाही विसर पडतो. या गोष्टींकडे आपण हसत हसत दुर्लक्ष करतो. पण कधीच असा विचार करत नाही कि, या विसरण्याच्या सवयी लागल्या कश्या..? किंवा आपण विसरतोय हि खरंच क्षुल्लक आणि दुर्लक्ष करण्याजोगी बाब आहे का..? तर याचे उत्तर असेल नाही.
कारण कधीतरी विसरणे हि सामान्य बाब असू शकते. पण वारंवार गोष्टींचा विसर पडणे हि अतिशय गंभीर गोष्ट आहे. (Bad Habits) सर्व साधारणपणे वाढते वय, अति काळजी, ताण तणाव, औदासिन्य, मेंदूला सुरळीत रक्तपुरवठा न होणे, पार्किनसन्सचा आजार, मद्यपान, डोक्याला झालेली इजा, अपुरी जीवनसत्वे, थायरॉइड, एपिलेप्सी, औषधांचा दुष्परिणाम, ट्यूमर, इन्फेक्शन इत्यादी कारणांमुळे आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. असे झाल्याने तुम्हाला गोष्टींचा विसर पडू शकतो. पण यांपैकी कोणताही त्रास नसेल आणि तरीही तुम्ही विसरत असाल तर….?
तज्ञ सांगतात कि, जर तुमचा मेंदू आजारी असेल किंवा आजारपणाकडे वाटचाल करत असेल तर तुम्हाला विसरण्याचा त्रास होऊ शकतो. आता तुम्ही विचार कराल कि, आरोग्याची उत्तम काळजी घेऊनही मेंदू आजारी कसा काय पडू शकतो..? तर मित्रांनो, आरोग्याची काळजी घेणे म्हणजे योग्य तेव्हा योग्य तितके खाणे, पाणी पिणे, व्यायाम करणे इतकेच नव्हे. तर आरोग्याची काळजी घेताना काही वाईट सवयींची साथ सुटणे आवश्यक आहे. कारण तुमच्या रोजच्या जीवनशैलीतील काही सवयी हळूहळू तुमच्या शरीर आणि मेंदूवर गंभीर तसेच विपरीत परिणाम करीत असतात. या सवयी कोणत्या त्या आपण जाणून घेऊ.
मेंदूसाठी घातक ठरणाऱ्या सवयी (Bad Habits)
1. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे – अनेकदा आरोग्याच्या तक्रारी लहान सहान कुरबुरी असतील असे म्हणून दुर्लक्षित केल्या जातात. पुढे काय..? याच लहान वाटणाऱ्या काही आरोग्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपात आपल्या शरीरावर आणि अगदी मेंदूवरही विपरीत परिणाम करतात.
यामुळे साधा ताप, डोकेदुखी, अर्धशिशी, चक्कर येणे, उलटीसारखे वाटणे अशा आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच यावर उपाय करा अन्यथा या समस्या कधी गंभीर होतील हे कळणारही नाही. यामुळे स्मरणशक्तीवर हमखास परिणाम होतो. शिवाय मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्याने अनेकदा मानसिक स्थैर्य गमावण्याची शक्यता असते. (Bad Habits)
2. अति विचार करणे – काही जणांना कोणत्याही लहान सहान गोष्टींचा प्रमाणापेक्षा जास्त विचार करण्याची सवय असते. अशा पद्धतीने खूप विचार करणे मेंदूसाठी घातक ठरू शकते. खूप विचार केल्यामुळे मेंदूच्या नसांवर ताण येतो. परिणामी मेंदू दमतो आणि हळूहळू त्याची कार्यगती कमी होत जाते.
याशिवाय सतत विचार करण्यामुळे मेंदुला चालना मिळत नाही आणि यामुळे कल्पना शक्तीही कमकुवत होते. (Bad Habits) म्हणूनच अति विचार करणे आणि प्रत्येक गोष्टीला प्रमाणापेक्षा जास्त प्राधान्य देणे बंद करा.
3. सतत काम करणे – अनेक लोक वर्कहोलिक असतात. म्हणजे त्यांना सुट्टीच्या दिवशीच्या कामाचा ध्यास असतो. ते शांत बसूच शकत नाहीत. सतत काही ना काही त्यांना करायचं असत.
इतकं चंचल आणि सतत काम करण्याच्या सवयीमुळेही मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण या सवयीमुळे झोपेतही त्यांचा मेंदू कार्यरत असतो. ज्यामुळे मेंदूला आराम मिळत नाही आणि परिणामी तो अकार्यक्षम होतो.
4. जंक फूड खाणे – आजकाल जो तो जंक फूडचा दिवाना आहे. घरच्या जेवणाचा स्वाद अनेकदा या लोकांना जंक फूडसमोर फिकाच वाटतो. पण या जंक फूडमुळे तुमचे आरोग्य खराब होते हे तुम्हाला कधी समजणार. यामध्ये वापरलेले तेल, मसाले आणि ते टिकवण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ हे तुम्हाला सुस्त करतात.
(Bad Habits) त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. तुम्हालाही जंक फूड खाण्याची सवय असेल तर आताच सोडा. कारण ती तुमच्या मेंदूला अकार्यक्षम बनविते. शिवाय मुलांना जर जंक फूड खायला देत असाल तर त्यांचा विकास योग्य पद्धतीने होणार नाही हे समजून घ्या आणि आताच जंक फूड खाण्यावर आळा घाला.
5. नियमित मद्य सेवन – अनेक लोकांना नियमित मद्य अर्थात दारू पिण्याची सवय असते. कुणीही कितीही सांगा या लोकांची दारू सुटत नाही. पण मित्रांनो, आरोग्यासाठी मद्य सेवन अजिबात चांगले नाही.
(Bad Habits) यामुळे होणारे दुष्परिणाम अतिशय गंभीर असतात. मद्यपान थेट मेंदूच्या नसांवर आणि कार्यावर परिणाम करते. यामुळे प्रामुख्याने मद्यसेवन करणे टाळा. अन्यथा मेंदूचे नुकसान होणे अटळ आहे.
6. कोणत्याही औषधीचे अतिरिक्त सेवन करू नका – डोकं दुखलं, शिंक आली, हातपाय दुखले म्हणून लगेच पॅरासिटामोल, क्रोसीन यांसारखी औषधं घेऊ नका. अनेकांना अगदी क्षुल्लक कारणासाठी औषध घ्यायची सवय असते. (Bad Habits)
अशा पद्धतीने कोणत्याही औषधी गोळ्यांचे अतिरिक्त सेवन करणे मेंदूवर परिणाम करू शकते. या सवयीमुळे घाम येणे, चक्कर येणे, रक्तदाबाच्या समस्या, मानसिक अस्थैर्य अशा आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
7. सोशल मीडिया आणि डिजिटल स्क्रीनचा अति वापर करणे – काही लोकांच्या कानाला चोवीस तास मोबाईल लागलेला असतो. तर काही लोक कॉम्प्युटर सोडतच नाहीत. अख्खा दिवस त्यावर डोळे फाडत बसतात.
याशिवाय काही लोकांना सोशल मीडियाचा प्रचंड नाद असतो. या सवयी हळू हळू मन आणि मेंदू काबीज करतात. ज्यामुळे मानसिक अस्थैर्य येऊ शकते. (Bad Habits)
‘हे’ पण वाचा :-
Bad Health Habits: उत्तम स्वास्थ्यासाठी ‘या’ 25 वाईट सवयींची संगत आत्ताच सोडा; जाणून घ्या
Bad Food For Lungs: तुमच्या आहारात ‘हे’ पदार्थ असतील तर, तुमची फुफ्फुसे धोक्यात आहेत; जाणून घ्या
अतिविचार करण्याची सवय मानसिक आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या
डिजिटल स्क्रीन करते मुलांच्या मानसिक आरोग्याचे नुकसान; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ?