अनेक त्रासांवर एक उपाय गुणकारी तुळशीच्या बिया; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीचे एक विशेष आणि अढळ स्थान आहे. तर हिंदु धर्मात तुळस अतिशय पवित्र मानली जाते. अगदी प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यात तुळशीची पुजा हि केलीच जाते. याशिवाय आयुर्वेदातही तुळशीचा अत्यंत औषधी वनस्पती म्हणून उल्लेख केला आहे. कारण तुळशीत असे अनेको औषधी गुणधर्म समाविष्ट आहेत ज्यांचा आरोग्यसंबंधित अनेक प्रकारच्या समस्स्या दूर करण्यासाठी वापर होतो. प्रामुख्याने तुळशीचे पाने आणि बियांचा औषधी म्हणून वापर केला जातो. कारण यांमध्ये अनेक आजारांशी लढण्याची क्षमता आहे. तुळशीचे पान खाल्याने शरीर नेहमी निरोगी राहते, हे अनेकांकडून ऐकले असाल. मात्र, आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या पानांपेक्षाही गुणकारी असणारे तुळशीचे बी याचे फायदे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात तुळशीच्या बियांचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:-
१) रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
– आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुळशीच्या बिया अतिशय उपयुक्त असतात. कारण तुळशीच्या बियांमध्ये अँटीऑक्सीडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय यातील फ्लॅवोनोइड्स आणि फेनोलिक देखील शरीरासाठी गरजेचे असते. हीच तत्व शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करतात.
२) सर्दी आणि तापापासून सुटका मिळते.
– सर्दी किंवा ताप आल्यास तुळशीच्या पानांचा वापर केलेला काढा प्यायल्याने निश्चितच आराम मिळतो. पण तुळशीच्या पानांसह तुळशीच्या बियादेखील यात वापरल्या तर हा काढा अधिक लाभ देणारा ठरेल.
३) अॅसिडिटी क्षणात दूर होते.
– अॅसिडिटीची समस्या त्रास देत असेल तर तुळशीच्या बीया एक उत्तम उपाय आहे. यासाठी तुळशीच्या बिया कपभर पाण्यात उकळून घ्या आणि हे पाणी प्या. यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होण्यास सहाय्य मिळेल.
४) पोटाच्या विकारांत लाभदायी ठरते.
– पोटाशी संबंधित कोणतीही समस्या वा त्रास असेल तर यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशीच्या बिया अतिशय उपयुक्त ठरतात. यासाठी केवळ तुळशीच्या बिया पाण्याने स्वच्छ धुवून उपाशी पोटी चावून चावून खाव्यात.
५) शरीरावरील आणि आतील सूज कमी होते.
– सूज कमी करण्यासाठी तुळशीच्या बिया उपयुक्त ठरतात. कारण तुळशीच्या बियांमध्ये अँटी इंफ्लामेंट्री गुण असतात. जे शरीरावरील आणि आतील कोणत्याही भागावरील सूज कमी करण्यास मदतयुक्त ठरतात.