शारीरिक तंदुरुस्तीसाठी ‘हे’ पदार्थ जरूर खा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या शरीराच्या विविध गरजा असतात. या सर्व गरजा पूर्ण झाल्यास आपले शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. शरीराच्या या विविध गरजा पूर्ण करण्यामध्ये व्हिटामिन अतिशय सहाय्यक असतात. कारण शरीराला विविध प्रकारच्या कार्यासाठी व्हिटामिनची आवश्यकता असते. यांपैकी व्हिटामिन ई हे त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. शिवाय आपल्या शरीराची यंत्रणा मजबूत करण्यात व्हिटॅमिन इ अतिशय सहाय्यक असते. जर तुम्हाला फ्री रॅडिकल्सचा असेल तर व्हिटामिन ईचे पोषण देण्यासाठी आणि त्वचेला UV डॅमेजपासून वाचवण्यासाठी काही पदार्थांचा समावेश तुमच्या दैनंदिन आहारात करणे गरजेचे आहे. या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शारीरिक तंदुरुस्तती देखील सुधारते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला व्हिटामिन ई ने परिपूर्ण असणारे आणि शरीराची तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी सहाय्यक असणाऱ्या पदार्थांची माहिती देणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) बदाम – बदामआपल्या आरोग्यासाठी चांगले असतात यात काही शनकच नाही. मात्र अॅक्टिव्ह लाइफस्टाइलसाठी ते जास्त उपयुक्त ठरतात. कारण यात व्हिटामिन ई’ची पातळी अधिक असते. शिवाय त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी त्वचेची सुरक्षा करणारे सर्व प्रकारचे अॅंटीऑक्सिडेंट गुण बदामात असतात. शिवाय बदामात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, कॉपर आणि मॅग्नेशियम अधिक असते. यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी बदाम लाभदायक आहेत.
२) हेजल नट्स – हेजल नट्स हे एक प्रकारचे अक्रोड आहे. जे आपल्या शरीरातील पेशींना कमकुवत होण्यापासून संपूर्ण रक्षण देण्यास सक्षम आहे. व्हिटामिन ई आणि अन्य विविध अॅंटि ऑक्सिडेंटचे प्रमाण यात भरपूर समाविष्ट असते. शिवाय आरोग्यासाठीही हेजल नट्स चांगले असतात.
३) सुर्यफूलाच्या बिया – सुर्यफूलाच्या बियांमध्ये ‘व्हिटामिन ई’ची मात्रा मोठी असते. तर भाजलेल्या बियांमध्ये ७५ % पेक्षा जास्त व्हिटामिन ई असते. यामुळे सूर्यफुलाच्या बिया खाणे आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी मानले जाते.
४) सुर्यफुलाचे तेल – सूर्यफुलाच्या बियांप्रमाणे सूर्यफुलाचे तेल खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कारण हे तेल सर्वात चांगली वनस्पती तेल असून यामध्ये पोषक तत्त्वांची मात्रा अधिक असते. याशिवाय या तेलात व्हिटामिन ई चे प्रमाणदेखील जास्त असते.
५) एव्होकाडो – एव्होकाडो हे एक फळ आहे. या फळामध्ये अनेक पोषक द्रव्ये समाविष्ट असतात. यात व्हिटामिन, फायबर, प्रोटीन अशा सर्व पोषण तत्त्वांचा समावेश आहे. यामुळे एव्होकाडो हे फळ आरोगासाठी लाभदायक आहे.