Beard Growth: रोज पाणी घालूनही दाढी वाढली नाही..? मग ‘हे’ उपाय करा आणि दिसा रुबाबदार
हॅलो आरोग्य ऑनलाईन। Beard Growth स्त्रियांमध्ये लीपलूक (ओठ) आणि पुरुषांमध्ये बिअर्ड लूक (दाढी) ट्रेंडिंगनुसार असणे फार गरजेचे बाबा.. नाहीतर चार चौघात जाताना कसेसेच होते. नाही का..? त्यात एखाद्या सेलिब्रिटी कलाकाराने वेगळा असा हटके लूक केला कि तो ट्रेंड झालाच म्हणून समजा.
गेल्या काही वर्षांमध्ये तरुण मुलांना हटके, पिळदार आणि भरगच्चं दाढी ठेवण्याचे वेड लागले आहे. तसे पाहाल तर दाढीतले पुरुष काहीसे रुबाबदार आणि अतिशय लक्षवेधी ठरतात. त्यामुळे मुलींमध्ये दाढी असणाऱ्या मुलांविषयी विशेष आकर्षण असते. मग काय..? जे तिला आवडतंय ते साहजिकच त्याला आवडणार ना!
पिळदार मिशा आणि रुबाबदार दाढी (Beard Growth) ही महाराष्ट्रीयन पुरुषांची फार जुनी ओळख आहे. ती गेल्या काही काळात संपुष्टात येते का काय असे वाटू लागले होते. पण त्या आधीच नव्या पिढीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवण्याचे क्रेझ निर्माण झाले. हे क्रेझ कधी आवड होण्यात परिवर्तित झाले तेच कळले नाही. त्यामुळे पूर्ण क्लीन शेव्ह करणारे पुरुषही आजकाल रुबाबदार दाढी आणि पिळदार मिशा ठेवण्याचा प्रयत्न करतात.
पण अनेकदा अशा पुरुषांना हा ट्रेंड फॉलो करणे कठीण जाते. कारण अनेकदा क्लीन शेव्ह केल्यामुळे केसांची वाढ फारशी कमी आणि तुरळक झालेली असते. (Beard Growth) तर काही मुलांना काही विशेष भागात केसच येत नाहीत. ज्यामुळे दाढी वाढवताना काही ठिकाणी येत नाही आणि मग ते विचित्र दिसत.
याशिवाय याशिवाय KGF च्या यश पासून विराट कोहली असेल किंवा मग अमित ठाकरे यांसारख्या मनोरंजन, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील लोकांनाही दाढी मिश्यांची आवड असल्याचे पाहून आजचे तरुण या ट्रेंडबाबत आग्रही झाले आहेत. पण काहींचं दाढी मिश्या ठेवण्याचं स्वप्न स्वप्नच राहत. अनेक तरुणांना किंवा पुरूषांना मनातून हा ट्रेंड फॉलो करण्याची इच्छा असली तरीही ते शक्य होत नाही. याचे कारण म्हणजे दाढी आणि मिशांची वाढ व्यवस्थित न होणे. (Beard Growth)
मग असे लोक सॅलोनमध्ये गेले कि बार्बरला आठवणीने दाढी येण्यासाठी काय करावे..? मिशी येण्यासाठी काय करावे..? केस योग्य दिशेने कसे वाढवता येतील..? असे प्रश्न हमखास विचारतात. अनेक जण दाढी वाढवण्यासाठी विविध औषधे किंवा तेलाचा वापर करतात. पण मनाने केलेले उपाय अनेकदा खर्चिक आणि त्रासदायी ठरतात. म्हणूनच अशा लोकांसाठी आजचा लेख समर्पित.
आज आपण तुमची दाढी आणि मिशी कशी व्यवस्थित वाढत नाही तेच बघून घेऊ. (Beard Growth)कारण आपण आजच्या लेखात अतिशय सोप्पे आणि तितकेच प्रभावी असे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने तुम्ही रुबाबदार दिसू शकता आणि रोज दाढी मिशी येण्यासाठी पाणी घालायचीही गरज पडणार नाही.
० दाढी मिशीच्या योग्य वाढीसाठी लाभदायी घरगुती उपाय (Beard Growth)
१. प्रथिनयुक्त आहार घ्या –
तुमचा आहार जितका उत्तम तुमचे स्वास्थ्य आणि सौंदर्यही तितकेच उत्तम राहते असे तज्ञ सांगतात. त्यामुळॆ केसांची वाढ याचाही संबंध तुमच्या आहाराशी असूच शकतो. शिवाय पूर्ण आहारातील प्रथिने अतिशय आवश्यक घटक आहेत. म्हणून आहारात अधिक प्रथिनांचा समावेश करा. यामुळे शारीरिक फायद्यांसह दाढी वाढण्यासही नकीच मदत होईल.
२. लिंबू –
लिंबू आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. पण लिंबाचा फेसपॅक तुमची दाढी मिशी व्यवस्थित वाढण्यासाठी मदत करतो. यासाठी लिंबाच्या रसासोबत दालचिनी पावडर वा तमालपत्र पावडर एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. हि पेस्ट चेहऱ्यावर ज्या ठिकाणी दाढी येत नाही वा कमी येते अशा ठिकाणी लावा. (Beard Growth) साधारण १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. मुख्य म्हणजे लिंबू सगळ्यांच्या त्वचेसाठी योग्य ठरेलच असे नाही म्हणून याचा वापर आधी हाताच्या त्वचेवर करून पाहावा. त्रास झाल्याचं वापर टाळावा.
३. नारळाचे शुद्ध तेल –
नारळाचे शुद्ध तेल डोक्याचे केसच नव्हे तर तुमच्या दाढी मिशा आणि अगदी भुवयांसाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे हे नारळाचे तेल तुमच्या दाढीच्या योग्य वाढीसाठी उत्तम आहे. यासाठी दररोज थोडे नारळाचे तेल दाढीला आणि जिथे दाढीचे केस विरळ आहेत वा येत नाहीत तेथे मसाज करा. नियमित असे केल्यास काही दिवसात योग्य रिझल्ट दिसतील.
४. निलगिरीचे तेल –
निलगिरीचे तेल खूप गुणकारी आहे. याचा विविध फायद्यांसाठी वापर होतो. पण यांचा वापर जर तुम्ही तुमच्या दाढी येत नाही अशा भागावर केलात तर दाढी वेगाने, दाट आणि योग्य वाढण्यास नक्कीच मदत होते. (Beard Growth) परंतु निलगिरीच्या तेलामुळे काहींच्या चेहऱ्याला त्रास होऊ शकतो. असे होत असेल तर यात थोड्या प्रमाणात तिळाचे तेल मिसळा आणि मग या मिश्रणाचा वापर करा.
५. आवळ्याचे तेल –
आवळ्याचे तेल चेहऱ्याला दाढी मिशीच्या भागात लाऊन मसाज केल्यास ज्या ठिकाणी दाढी येत नाही वा कमी येत असेल तिथे काही दिवसातच केसांची योग्य वाढ झाल्याचे दिसून येतील. यासाठी हे आवळ्याचे तेल चेहऱ्यावर साधारण १५ ते २० मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
६. कढीपत्त्याचा पुरेपूर वापर करा –
खोबरेल तेलात ७ ते ८ कढिपत्याची पाने टाकून हे मिश्रण साधारण १० मिनिटे गॅसच्या मंद आचेवर चांगले गरम करा. या तेलात कढिपत्याचा पूर्ण अर्क उतरला पाहिजे. (Beard Growth) यानंतर हे मिश्रण गार कारण आणि मग तुमच्या चेहऱ्यावर लावा. साधारण १० ते १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून टाका. असे केल्याने तुमची दाढी वाढण्यास मदत होईल.
७. गाजराचा रस –
जर तुमची दाढी आणि मिशी व्यवस्थित वाढत नसेल तर तुमच्या आहारात गाजर असणे गरजेचे आहे. कारण गाजरामध्ये केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक घटक असतात. म्हणून नियमित पणे गाजराचा ज्यूस घ्या. काहीवेळा दाढी कमी येत असेल अशा ठिकाणी हा रस लावा आणि नंतर १० मिनिटांनी धुवून टाका. यामुळे दाढी वाढण्यास मदत होईल.
८. कच्चे दूध –
कच्चे दूध त्वचेसाठी आणि केसांच्या वाढीसाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे कच्चे दूध जर चेहऱ्याला लावले तर दाढीची वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी मदत मिळते. यासाठी रोज रात्री झोपताना चेहऱ्याला कच्चे दूध लाऊन झोपा. यामुळे ज्या ठिकाणी दाढी येत नाही किंवा कमी प्रमाणात येते अशा ठिकाणी दाढी वाढण्यास मदत होईल.
‘हे’ पण वाचा :-
Dark Circles Home Remedies: हट्टी डार्क सर्कल्सचं करायचं तरी काय..?; जाणून घ्या घरगुती टिप्स
Mens Health Care: पुरुषांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 7 टिप्स फायदेशीर; जाणून घ्या
Vitamin E Side Effects: ‘व्हिटॅमिन ई’ कॅप्सूलचा अतिवापर त्वचेसाठी घातक; जाणून घ्या