| | |

Belly Fat : काही केल्यास पोटावरील चरबी कमी होत नाही..?; जाणून घ्या कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पोटावर चरबी जमा होण्याच्या समस्येने अनेक लोक त्रासलेले आहेत. चुकीची जीवनशैली आणि अनियमित आहार तसेच व्यायामाचा अभाव हे यामागील मुख्य कारण. पण अनेक लोक नियमित व्यायाम आणि मेहनतीची काम करूनही या समस्येने वैतागले आहेत. यामुळे विविध औषधे आणि न्यूनगंडाला बळी जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याच काय आहे.., केवळ व्यायाम केल्याने पोटावर साठलेली चरबी कमी होत नाही.

मुळात पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खूप मेहनत घेण्यापेक्षा आपल्या दिनचर्येत काही बदल केले तर अधिक फायदा होईल. कारण अनहेल्दी डाएट सोबत संपूर्ण दिवसातील काही नेहमीच्या सवयी देखील या समस्येला कारणीभूत आहे. आज आपण पोटावर चरबी (Belly Fat) कमी न होण्याची कारणे असलेल्या आपल्याच चुकांबद्दल जाणून घेणार आहोत.

पोटावरील चरबी (Belly Fat) कमी न होण्याची कारणे

Unhealthy Diet

१) अनहेल्दी डाएट – अनहेल्दी डाएटमुळे पोटाची चरबी वाढते. स्टार्च कार्बोहायड्रेट्स आणि खराब कोलेस्टेरॉल यामुळे शरीरावर चरबी वाढते. म्हणून दैनंदिन आहारात हिरव्या भाज्या, प्रथिनं आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ समाविष्ट करा आणि फास्ट फूड, तळलेले पदार्थ आणि कोल्डड्रिंक बंद करा.

Drinking Water

२) अपुरे पाणी – शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास वजनही वाढते आणि पोटावरील चरबीदेखील (Belly Fat) वाढते. म्हणून नियमित शरीरास पुरेसे पाणी प्या. यामुळे वजन कमी होण्यास आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

Smoking

३) धुम्रपान – अनेकांना धूम्रपानाची वाईट सवय असते. आजकालची तरूण पिढी तर स्टाईल म्हणून धूम्रपान करते. पण या वाईट सवयीमुळे पोट आणि आतड्यांवरील चरबी वाढते. म्हणून पोटावरील चरबी कमी करण्यासाठी लगेच धूम्रपान बंद करा.

४) ताण तणाव – ऑफिसमधील काम, घरातील भांडणे, आर्थिक अडचणी यामुळे ताणतणाव येतो आणि याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दरम्यान शरीरात कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढल्यामुळे पोटावरील चरबी (Belly Fat) वाढते. म्हणून ध्यान आणि योगाच्या सहाय्याने तणाव कमी करा.