Benefits Of Detox Water: डिटॉक्स वॉटरचे ‘असे’ सेवन कराल तर होतील भरपूर फायदे; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। Benefits Of Detox Water आपण अनेकदा बॉडी डिटॉक्स करणं गरजेचं आहे असे ऐकले असेल. पण बॉडी डिटॉक्स करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे किती जणांना ठाऊक आहे..? तुम्हाला माहित आहे का..? अहो बॉडी डिटॉक्स करणे हि आपल्या शरीराशी संबंधित अत्यंत महत्वपूर्ण क्रिया आहे. या क्रियेमध्ये शरीराला अपायकारक ठरणारे घटक शरीराबाहेर उत्सर्जित केले जातात.
डिटॉक्सिफिकेशनच्या माध्यमातून शरीर स्वच्छ केले जाते आणि याचा फायदा मेंदूसह संपूर्ण शरीराला होतो. यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास सहाय्य होते. सामान्यपणे या आवश्यक आरोग्यदायी क्रियेसाठी डिटॉक्स वॉटरचा वापर केला जातो. पण डिटॉक्स वॉटरचे सेवन कसे करायचे हे माहित नसेल तर फायदा काय…? म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी डिटॉक्स वॉटरचे सेवन कसे करायचे आणि त्याचे नेमके काय फायदे होतात हे जाणून घेऊया. (Benefits Of Detox Water)
ज्याप्रमाणे आपल्या शरीराला बाहेरून स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली असते तशीच शरीराला आतूनही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच असते. मात्र शरीराच्या आतील भागाची स्वच्छता करणे अत्यंत जोखमीचे काम. दरम्यान एक चूकदेखील महागात पडू शकते. साधारणपणे, बॉडी डिटॉक्स वॉटरचा वापर याचसाठी केला जातो. आपल्या शरीरातील घाण शरीराला अपाय पोहचवण्याआधी बाहेर काढण्यासाठी डिटॉक्स वॉटर प्रभावी भूमिका निभावते.
बहुतेक लोकांना असे वाटते की, (Benefits Of Detox Water) डिटॉक्स वॉटर फक्त वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. पण मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि हा एक गोड गैरसमज आहे. डिटॉक्स वॉटर फक्त वजन कमी करत नाही.. तर चयापचय वाढवते शिवाय शरीरातील कोणत्याही प्रकारचे विषारी घटक उत्सर्जित करू शकते. ज्यामुळे अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात.
आता तुमच्यापैकी अनेकजण म्हणतील कि, आम्ही तर डिटॉक्स वॉटरचे सेवन करतो. पण आम्हाला नाही बुआ फायदे झाले. तर अशा प्रत्येक व्यक्तीला आम्ही सांगू कि नुसतं डिटॉक्स वॉटरचे सेवन काहीही फायदा देत नाही. तर योग्य पद्धतीने केले जाणारे डिटॉक्स वॉटरचे सेवन आरोग्यदायी फायदे देते. (Benefits Of Detox Water) वास्तविक, डिटॉक्स वॉटर घेण्याचा स्वतःचा असा वेगळा मार्ग आहे. त्यामुळे तो आपल्याला ठाऊक असणे निश्चितच गरजेचे आहे. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला बॉडी डिटॉक्स वॉटरचे सेवन कसे करावे आणि त्याचे काय फायदे होतात हे सांगणार आहोत.
० डिटॉक्स वॉटरचे सेवन ‘असे’ करा
१) रिकाम्या पोटी सेवन करा –
डिटॉक्स वॉटरविषयी सगळ्यात महत्वाची बाब अशी कि, अधिक फायद्यांसाठी हे पाणी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी प्या. कारण जेव्हा डिटॉक्स वॉटर रिकाम्या पोटी घेतले जाते तेव्हा सर्वात आधी पोट स्वच्छ होते आणि यामुळे दिवसाची सुरुवात फ्रेश होते. डिटॉक्स वॉटरमध्ये सहसा पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी’ची मात्रा मोठी असते. हे दोन्हीही असे पोषक घटक आहेत जे आपल्या शरीरातून कोणतेही आणि कितीही विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. तसेच चयापचय वाढवण्यासदेखील मदत करतात. (Benefits Of Detox Water)
२) तापमानावर लक्ष हवे –
डिटॉक्स वॉटरचे सेवन करताना पाण्याच्या तापमानाची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. डिटॉक्स वॉटरचे सेवन करताना त्यासाठी फार गरम किंवा फार थंड पाण्याचा वापर करू नये. म्हणून (Benefits Of Detox Water) डिटॉक्स वॉटरचे सेवन करण्यासाठी कोमट पाणी वापरण्याचा तज्ञांकडून सल्ला दिला जातो. बदलते हवामान पाहून आपण खोलीच्या तापमानावर पाण्याचे तापमान निश्चित करू शकता. मात्र अत्यंत काळजीपूर्वक थंड पाणी घेणे टाळा. कारण डिटॉक्स वॉटरचे सेवन करण्यासाठी जर थंड पाण्याचा वापर केला तर नक्कीच त्याचा काहीही फायदा होणार नाही.
३) ताजे डिटॉक्स पाणी प्या –
(Benefits Of Detox Water) कधीही तुम्ही डिटॉक्स वॉटरचे सेवन करत असाल तेव्हा तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही ते ताजे बनवाल आणि मगच त्याचे सेवन कराल. कारण बऱ्याचदा लोक मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काही पदार्थ टाकतात आणि तेच पाणी सलग २ ते ३ दिवस पिण्यासाठी वा जेवणासाठी वापरतात. तर असे पाणी वापरणे शक्यतो टाळावे. हे तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान देऊ शकते.
४) साध्या पाण्यासोबत स्विच करू नका –
अनेक लोक जास्त आणि लवकर परिणाम मिळविण्याच्या हव्यासापोटी साध्या पाण्यातून डिटॉक्स वॉटर स्विच करतात. हि क्रिया चुकीची नाही. नक्कीच आपण हे करू शकता, परंतु आपण हे लक्षात ठेवावे की आपल्यासाठी साधे पाणी महत्वाचे आहे. म्हणून तुम्ही दिवसाला १ लिटर डिटॉक्स पाणी घेऊ शकता. पण याशिवाय साधे पाणीही प्यावे.
५) अन्नासोबत डिटॉक्स वॉटरचे सेवन करू नका –
अनेकांना कधीही डिटॉक्स वॉटर पिण्याची सवय असते. काही लोक दिवसभर विविध पदार्थ खातात आणि ते पचायला हवे म्हणून डिटॉक्स वॉटरचे सेवन करतात. आहारतज्ञांनी सांगितल्याप्रमाणे डिटॉक्स वॉटर अन्नासोबत अजिबात घेऊ नये. कारण जेवण आणि डिटॉक्स वॉटरमध्ये किमान अर्धा तासाचे अंतर ठेवण्याचा एक साधा नियम पाळणे गरजेचे आहे. याचे महत्त्वाचे कारण असे कि, आपल्याला जेवणातून अनेक पोषक तत्व मिळत असतात. जे सोबत डिटॉक्स वॉटरचे सेवन केल्याचे पूर्ण मिळत नाहीत. त्यामुळे अन्नासोबत (Benefits Of Detox Water) डिटॉक्स वॉटरचे सेवन करूच नये असे तज्ञ सांगतात.
० डिटॉक्स वॉटरचे सेवन करण्याचे फायदे (Benefits Of Detox Water)
१) शारीरिक ऊर्जा टिकून राहते –
शरीरामध्ये पाणी कमी झालं तर मूड खराब व्हायला वेगळं कारण लागत नाही. तसंच एकाग्रता कमी होऊन डोकेदुखीची समस्या जाणवते. यावर डिटॉक्स वॉटर हे नैसर्गिकरित्या जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी तसेच लिव्हर साफ ठेवण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते आणि यामुळे दिवसभर एनर्जेटिक वाटत.
२) रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते –
आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती कोणताही आजार तुमच्यापर्यंत पोहचू देत नाही. पण ती टिकून रहायची असेल तर त्यासाठी डिटॉक्स वॉटरचे सेवन करणे जरुरी आहे. कारण डिटॉक्स वॉटर हे शरीरातील विषारी पदार्थ, कचरा आणि फ्री रॅडिकल्सपासून शरीराची सुटका करते. परिणामी तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. (Benefits Of Detox Water)
३) पचनक्रिया सुरळीत होते –
पचनक्रिया सुरळीत रहावी यासाठी डिटॉक्स वॉटर मदत करते. कारण डिटॉक्स वॉटर आपले पोट नियमित स्वरूपात साफ ठेवते. शिवाय डिटॉक्स वॉटरमध्ये असलेल्या पोषक तत्वामूळे पचनक्रिया व्यवस्थित राखण्यास मदत होते. परिणामी पोटफुगी, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारखे आजार होत नाहीत.
४) लिव्हरचे रक्षण –
आपल्या लिव्हरचे मुख्य काम शरीर साफ ठेवण्याचे आहे. त्यामुळे लिव्हरची सुरक्षा करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी डिटॉक्स वॉटर मदत करते. हे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पिण्याच्या पाण्यात ताजे आणि रसयुक्त काकडीचे तुकडे मिसळून ठेवा. हे पाणी दिवसभर पित रहा. हे डिटॉक्स वॉटर प्यायल्याने लिव्हरचे कोणत्याही रोगापासून रक्षण होते. (Benefits Of Detox Water)
५) वाढत्या वजनावर रोख लावते –
आपण सारेच जाणतो शरीराला आवश्यक तितके पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. हीच गोष्ट डिटॉक्स वॉटरच्या बाबतीतसुद्धा लागू होते. हे पाणी तुमची पचनक्रिया वाढवण्यासाठी मदत करते. यामुळे कॅलरीज कमी होतात आणि ऊर्जेचा स्तर वाढतो. यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते आणि हलके हलकेसुद्धा वाटते.
‘हे’ पण वाचा :-
Lemon Water Benefits: आंबट गोड लिंबू पाण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या
Without Peeling Fruits: ‘हि’ फळं सोलून खाताय..? तर लगेच थांबा; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ