आहारात ताक पिण्याचे फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन । उन्हाळयाच्या दिवसांत आहारात थंड पदार्थांचा वापर करावा लागतो. त्यामुळे उष्णतेच्या समस्या या जास्त निर्माण होणार नाहीत . ताक हा थंड पदार्थ आहे . त्याच्या सेवनाने अंगांचा झालेला दाह हा कमी होण्यास मदत होते ताक हे शक्यतो घरगुती पद्धतीने बनवले असलेले घेतले जावे . ताक दह्यापासून बनवले जाते. ताक जर दररोज आहारात असेल तर त्यावेळी शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहण्यास मदत होते .
अनेक वेळा कडक उन्हात जर तुम्ही फिरत असाल तर त्यावेळी उन्हाळे लागण्याच्या समस्या या जास्त जाणवू शकतात . त्यावेळी मात्र जर तुम्ही एक ग्लास ताक आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात गुळाचे खडे टाकून पिले तर मात्र लघवीला होत असताना जी काही जळजळ असेल तर ती दूर होण्यास मदत होऊ शकते . दररोज सकाळ किंवा संध्याकाळ ताकाचे सेवन हे केले जावे . जर तोंडातून आतून उष्णतेचे जर आले असतील तर त्यावेळी जरी ताक आहारात ठेवले तर मात्र ज्या उष्णतेच्या समस्या असतील त्या दूर होतात. तसेच ताकाच्या मदतीने तुम्ही गुळण्या करू शकता. त्याने तोंडातील ज्या फोडी आहेत त्या दूर होतील. जर जेवण झाले त्या वेळी जर तुम्ही आहारात ताक ठेवले तर पचनाच्या समस्या या कोणत्याच निर्माण होत नाहीत.
नियमित ताक पिले गेले पाहिजे . लहान बाळाला दात येतात त्यावेळी लहान बाळ खूप चिडचिड करत असते. त्यावेळी त्याला कमीत कमी दोन ते तीन चमचे ताकाचे दिले गेले तर मात्र त्याला दातांच्या समस्या या जास्त जाणवणार नाहीत. किंवा त्या बाळाला वेदना सुद्धा जास्त होणार नाहीत . छातीत जर जळजळ होत असेल तर ताकामध्ये चिमूटभर सैंधव मीठ टाकून त्याचा वापर पिण्यासाठी करावा. म्हणजे छातीची जी काही जळजळ असेल ती दूर होण्यास मदत होऊ शकते.