Benefits of apple
|

सफरचंद आहे आरोग्याचा खजिना; दिवसातून एकदा खाल्लं तरी होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । दिवसभराच्या धावपळीमध्ये अनेकदा आपण आपल्या शरीराकडे (Health) लक्ष देण्यास विसरून जातो. या धावपळीच्या जीवनामध्ये शरीराची फारशी काळजी घेतली जात नाही. जर तुमच्या बाबतीत देखील असं काही होत असेल तर आत्ताच सावधान व्हा. जर तुमच्या शरीराचे आरोग्य चांगले असेल तर भविष्यात तुम्हाला कोणतेही आजाराला सामोरे जावे लागणार नाही. हल्ली प्रत्येकाला कोणता ना कोणता आजार सतावत आहे. शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. शरीराचे कार्य योग्य पद्धतीने चालत नाही, परिणामी वेगवेगळ्या आजारांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे अशावेळी शरीरासाठी आवश्यक असणारे खाद्यपदार्थ सेवन करणे यावर रामबाण उपाय ठरू शकतो.

योग्य आहार शैली, योग्य व्यायाम, शरीराची उत्तम काळजी या सर्वांची जर आपण व्यवस्थित रित्या काळजी घेतली तर भविष्यात कोणतेही आजार होऊ शकणार नाही. शरीरामध्ये अशक्तपणा, थकवा निर्माण झाल्यावर तज्ञ मंडळी व डॉक्टर आपल्याला वेगवेगळे पदार्थ फळे सेवन करण्याचा सल्ला देतात. जर आपण एक सफरचंद (Apple) दिवसभरातून खाल्ले तर आपल्या शरीराला खूप सारे फायदे प्राप्त होऊ शकतात. सफरचंद खाल्ल्याने शरीराला नेमके कोणकोणते फायदे होतात व कोणत्या गंभीर आजारापासून आपल्या शरीराची सुटका होऊ शकते याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

लाल रंगाचे गोलाकार आकाराचे सफरचंदाचे फळ मानवी शरीरासाठी खूपच लाभदायक (Benefits Of Eating Apple) मानले जाते. जर आपण दिवसभरातून एकदा तरी सफरचंद खाल्ले तर आपल्या शरीराचे आरोग्य सुधारते. अनेकदा तज्ञ मंडळी व डॉक्टर स्वतः आपल्याला सफरचंद खाण्याचा सल्ला देत असतात. सफरचंद खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच पण त्याचबरोबर शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्व देखील प्राप्त होत असतात म्हणूनच आहारशास्त्रामध्ये सफरचंदाला “पोषक तत्वांचा खजिना” असे देखील म्हटले गेले आहे. नियमितपणे सफरचंदाचे सेवन केल्याने आपल्याला खनिज तत्व, जीवनसत्व घटक देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. सफरचंद नियमितपणे खाल्ल्याने अँटिऑक्सिडंट घटकांमुळे आपल्या शरीराची स्वच्छता होते तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.

दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीराला पुढील फायदे होतात.

१) वजन कमी होते

नियमितपणे एक सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. सफरचंदामध्ये तसे पाहायला गेले तर भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबरचे सेवन झाल्याने मानवाला भूक लागत नाही. पोट भरलेले राहते यामुळे दिवसभर तुम्हाला ऊर्जा तर मिळते पण त्याचबरोबर भूक देखील लागत नाही यामुळे तुमच्या वजनावर नियंत्रण राहते.

२) हृदयाचे आरोग्य सुधारते

नियमितपणे सेवन केल्याने तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम दिसून येतो. सफरचंद मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. जर शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असल्यास हृदयाचे कार्य देखील सुरळीत पद्धतीने पार पडत असते.

३) पोटाचे आरोग्य उत्तम राहते

सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने तुम्ही जर नियमितपणे एक सफरचंद खात असाल तर तुमचे पोट वेळेवर स्वच्छ होते. तुम्हाला भविष्यात बद्धकोष्ठतेचा कधीच त्रास सतावणार नाही. तुमच्या पोटाचे आरोग्य चांगले राहील परिणामी पचन संस्था उत्तमरीत्या कार्य करू लागेल.

४) रोगप्रतिकारक शक्ती सुधारते

हल्ली प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झालेली आहे,अशावेळी शरीराचे आरोग्य चांगले रहावे याकरिता आरोग्य प्रतिकारक शक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. नियमितपणे सफरचंद सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते तसेच सफरचंद सेवन केल्याने शरीरामध्ये अँटिऑक्सिडंट निर्माण होऊन शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. जर तुम्ही वारंवार आज आजारी पडत असाल तर अशावेळी दिवसभरातून एक सफरचंद सेवन करणे गरजेचे आहे, यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार तर आहे पण त्याचबरोबर शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील वाढेल. भविष्यात शरीरात कधीच रक्ताची कमतरता निर्माण होणार नाही.

५) शरीरातील विषारी घटक बाहेर काढते

बहुतेक वेळा वेगवेगळे पदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीरामध्ये विषारी घटक पदार्थ जमा होत असतात. शरीराची स्वच्छता करण्यासाठी लिव्हर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपले लिव्हर म्हणजेच यकृत निरोगी राखायचे असेल तर सफरचंदाचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. सफरचंद खाल्ल्याने शरीराला मॅलिक ऍसिड प्राप्त होते, जे तुमच्या शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर काढते. अशाप्रकारे जर तुम्ही दिवसभरातून एकदा सफरचंद सेवन केले तर तुमचे शरीर अगदी निरोगी राहील व भविष्यात कोणत्याही प्रकारचे गंभीर आजार तुम्हाला होणार नाही.

टीप: वरील माहिती सर्वसाधारणपणे सांगण्यात आलेली आहे माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.