Daily Routine
| | |

निरोगी आरोग्याची किल्ली हवी..? तर जाणून घ्या दैनंदिन प्रश्नांचे आरोग्यदायी उत्तर

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निरोगी आयुष्यासाठी आरोग्य उत्तम असायला हवे हे सारेच जाणतात. पण यासाठी किती लोक काळजी घेतात..? तुम्ही घेता का.? आता निरोगी राहण्यासाठी काय वेगळी काळजी घ्यायची..? असा साधा सोपा सरळ प्रश्न तुम्ही विचाराल तर याचे उत्तर आहे कि तुमच्या आरोग्याची तुम्हीच योग्य काळजी घेऊ शकता. ते कसे..? हेच आपण आज या माहिती लेखातून जाणून घेणार आहोत.

दैनंदिन जीवनात रोजची दगदग, धावपळ, तीच तीच कामे यामुळे शरीर आणि अगदी मेंदुसुद्धा दमून जातो. परिणामी ताण तणाव वाढतो. चिडचिड वाढते. इतकेच काय अगदी आजारपणसुद्धा वाढते. मग अशा वेळी काय करालं..? अगदी सोप्प आहे नियमित संतुलित आहार आणि नियमित पूर्ण झोप घ्या. पण..पण.. पण याचेही काही नियम आहेत ते जरूर पाळा. जसे कि, दोन जेवणामध्ये एक निश्चित कालावधी एक अंतर अत्यंत महत्वाचे आहे. शिवाय किती तासाची झोप घ्यावी हे देखील माहित असणे गरजेचे आहे. तर या प्रश्नांसह अन्य अनेक दैनंदिन प्रश्नांची उत्तर योग्य माहित असल्यास तुम्हाला आरोग्याबाबत भीती वाटायची गरज राहत नाही. चला तर जाणून घेऊया या प्रश्नांची आरोग्यदायी उत्तरे.

१. नियमित साधारण किती तासांची झोप घ्यावी..?

Sleep

डॉक्टर सांगतात कि, प्रत्येक माणसाने नियमित कमीत कमी ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. कारण यामुळे शरीराला आवश्यक तितका आराम मिळतो. शिवाय रात्री किमान १० ते ११ या वेळेदरम्यान झोपणे आवश्यक आहे, असेही डॉक्टर सांगतात.

२. दररोज कोणता व्यायाम करावा..?

Exercise

सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यायाम नियमित करणे आवश्यक आहे. यामुळे दिवसभर उत्साही वाटते. नियमित पावर एक्सरसाइज करता आली नाही तरीही योगा मात्र करावा. यात प्राणायाम महत्त्वाचा आहे. यामुळे ताणतणाव दूर होऊन एकाग्रता वाढते.

३. सकाळी उठल्या उठल्या चहा प्यावा कि फळे खावीत..?

सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय अतिशय घातक आहे. त्यामुळे चहा नकोच. मात्र संपूर्ण एक फळ पूर्ण चावून खाल्ल्याने त्यातील पोषणतत्त्वे शरीराला मिळतात. परंतु रिकाम्या पोटी फळांचा रस आणि लिंबूवर्गीय फळ खाऊ नये.

४. दिवसभरातील दोन जेवणादरम्यान किती अंतर हवे..?

आहार तज्ञ सांगतात कि, दोन जेवणातील अंतर हे ७ ते ८ तासांचे असावे. मधल्या वेळेत कुठलेही जंक फूड खाऊ नये. शिवाय दिवसभरात दार २ तासाने हलका लहान आहार घेत रहावे. असे न जमल्यास सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान एखादे फळ, मखाना, कुरमुरे, शेंगदाण्याची चिक्की असे पदार्थ खावे.

५. तासापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने काय होते..?

सर्वसाधारणपणे २५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी बसल्याने एकतर कमी शारीरिक हालचालीमूळे वजन वाढते. शिवाय कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती असते. त्यामुळे शरीराची हालचाल सतत ठेवणे गरजेचे आहे.