अॅसिडिटीच्या समस्येवर सर्वोत्तम घरगुती उपाय; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त खाणे, तेलकट आणि मसालायुक्त पदार्थांवर ताव मारणे चांगलेच अंगाशी येते. याशिवाय बराच वेळ उपाशी राहणे देखील नुकसानदायी ठरते. कारण या स्थितीत अॅसिडिटीच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या सामान्य वाटत असली तरीही कालांतराने ती गंभीर होऊ शकते. म्हणूनच वेळीच या समस्येवर उपाय करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात अॅसिडिटीच्या समस्येवर घरातल्या घरात काय उपाय करता येतील ते खालीलप्रमाणे:-
० अॅसिडिटीच्या समस्येवर घरगुती उपाय –
१) नारळाचे पाणी – ज्या लोकांना सकाळी चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटफुगी, गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होते अशा लोकांनी नारळाच्या पाण्याचे सेवन करावे. कारण सकाळी लवकर नारळाचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. शिवाय नारळाच्या पाण्यात भरपूर फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत करतात. यामुळे नारळाचे पाणी प्यायल्याने अॅसिडिटी होत नाही.
२) एक ग्लास थंड दूध – सकाळी १ ग्लास थंड दूध प्यायल्याने पोटात जळजळ होत नाही. शिवाय दूध पूर्ण आहार असल्यामुळे भूक नियंत्रित करते आणि दिवसभर शरीराला ऊर्जा देण्यासह भूकेवर संयम ठेवते. यामुळे आंबटपणा आणि जठरासंबंधी समस्या देखील होत नाहीत.
३) टरबूज – टरबूज हे पाणीयुक्त फळ असल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. याच्या सेवनामुळे पोट भरल्यासारखं वाटतंच. शिवाय गॅस तयार होण्यास प्रतिबंध होतो. तसेच टरबूजात भरपूर फायबर असतात, जे पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी मदत करतात. त्यामुळे पोटात गॅस होत नाही आणि अॅसिडिटीची समस्या उदभवत नाही.
४) केळी – केळ्यात कॅल्शियम आणि लोह असते. यामुळे केली खाल्ल्यास पोटात गॅस होत नाही. तसेच केळ अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यामुळं अॅसिड रिफ्लेक्स कमी होत आणि यातील फायबर आंबटपणा नियंत्रित करते.
५) काकडी – काकडी खाल्ल्याने पोट थंड राहते. शिवाय काकडीमध्ये भरपूर पाणी असते जे शरीराला हायड्रेटेड ठेवते. तसेच काकडी खाल्ल्याने अॅसिड रिफ्लेक्स कमी होते आणि अॅसिडीची वा गॅसची समस्या दूर राहते.