ईयरफोन / हेडफोन वर सारखे गाणे ऐकताय तर सावधान! ‘या’ कारणांमुळे येऊ शकतो बहिरेपणा
हॅलो आरोग्य ऑनलाईन : स्मार्टफोन बहुतांश जणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. काही जणांच्या कानाला तर दिवसभर मोबाईल चिकटलेला असतो. तर काही जणांना ईयरफोन / हेडफोन कानात घातल्याशिवाय बरेच वाटत नाही. त्यात आणखी भर पडली आहे ती वायरलेस ब्लूटूथ हेडफोन्स ची.ना वायर ची झंझट, ना वागवायचा त्रास. दिवसभर गळ्याला अडकवले कि झाले काम. कित्येकांच्या तर दिवस-दिवसभर, तासनतास कानात हेडफोन किंवा इयरफोन असतो. यामुळे गाणे चांगले ऐकता येते, दुस-याला आवाजाचा त्रास होत नाही. मात्र याच्या अतिवापराने काही भयंकर दुष्परिणामही होतात. याबद्दलच आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, जेणेकरुन हेडफोन वापरताना तुम्ही आवश्यक ती खबरदारी घ्याल. गाणी ऐकणे सर्वांना आवडते परंतु ते आरोग्यासाठी काही वेळेस फायदेशीर असल्याचे ही सांगितले जाते. सध्या गाणी ऐकून उपचार करता येतात अशी म्यूझिक थेरपी रुग्णाला काही वेळेस दिली जाते. काही माणसांना झोपण्यापूर्वी गाणी ऐकायला खूप आवडतात. मात्र सातत्याने गाणी ऐकणे आणि ते हि ईयरफोन / हेडफोन वर हे मात्र आरोग्यासाठी घातक ठरु शकते. तसेच माणसाच्या मेंदूवर ही परिणाम होऊ शकतो.
सतत हेडफोन्स किंवा इअरफोन लावून गाणी ऐकण्याची सवय असेल तर एक दिवस तुम्ही १००% बहिरे व्हाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर कारणांमुळे आलेल्या बहिरेपणावर उपचार होऊ शकतात, पण तीव्र डेसिबल्सचा आवाज सतत कानावर आदळल्यानं जो बहिरेपणा येतो, तो बरा होत नाही. सध्या चाळीस, पंचेचाळीशीतले तरुणांना बहिरेपण येत असल्याचे लक्षात आले आहे आणि या सगळ्याचं कारण म्हणजे हेडफोन्स आहे.
झोपताना गाणी ऐकण्याची सवय अत्यंत वाईट असल्याचे एका अभ्यासक्रमातून पुढे आले आहे. त्यामुळे झोपेच्या वेळेस नेहमी गाणी ऐकण्याची सवय लागण्याबरोबरच त्याचा शरीरावर परिणाम होतो. तसेच रोजच्या रोज Artifical Sound ऐकून झोपण्याची सवय असेल तर ती आरोग्यास खूप हानिकारक असते. नेहमी आपण आपला मोबाईल सातत्याने आपल्या बरोबरच ठेवतो. तर जरा वेळसुद्धा मोबाईल बाजूला ठेवल्यास बैचेन झाल्यासारखे वाटते. अशी स्थिती आरोग्यास योग्य नसून त्याचा वाईट परिणाम मेंदूवर होतो. तसेच झोपल्यानंतर ही आपला मेंदू मोबाईलच्या सततच्या वापरामुळे Active Mode मध्ये राहिल्याने मेंदूला जो आराम आवश्यक असतो तो आराम मिळत नाही.
जेव्हा तुम्ही गाणी ऐकत झोपता तेव्हा तुमचा मेंदू पूर्णरित्या झोपलेला नसतो. तसेच मेंदूमधील काही भाग झोप होत नसल्याने आपण झोपेत असतानाही मध्ये मध्ये उठतो. कानाला इयरफोन्स लावून झोपणे हे कानासाठी घातक ठरु शकते. कारण आपण ऐकत असलेली गाणी आणि त्याचा आवाजाचा परिणाम आपल्या कानावर होत असतो.
प्रत्येक रात्री उत्तम झोप येणे आरोग्यासाठी उत्तम असते. जरी गाणी ऐकावी असे वाटले तर रेडिओवर किंवा स्टिरिओ स्पिकर्स वर कमी आवाजात सुद्धा ऐकू शकता किंवा तुम्ही तसा प्रयत्न करू शकता.
ते खालीलप्रमाणे बहुतांश जण, अशा प्रकारे गाणी ऐकताना ती मोठ्या आवाजात ऐकत असतात. मात्र याचा थेट परिणाम आपल्या कानावर होत असतो. तो होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे. आज याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
- हेडफोनद्वारे कानावर सातत्याने पडणारा मोठ्ठा आवाज कानाच्या आतल्या पडद्यावर आदळत असतो आणि श्रवणयंत्रणेतल्या कॉकलिया या भागावर त्याचे काही परिणाम जाणवायला लागतात. सातत्याने आवाजाचा मारा होत गेल्यामुळे हा नाजूक भाग बधीर होऊन जातो आणि सातत्याने अशी गाणी ऐकणाऱ्यांना बहिरेपणा येण्याची शक्यता असते.
- सर्वसाधारपणे आपली समजूत अशी असते की, मोबाईलमधला आवाज इतर आवाजांपेक्षा लहान असतो. पण हा आपला गैरसमज आहे. कारण मोबाईलचे गाणे तुलनेने कमी आवाजाचे वाटले तरी त्या गाण्याचा हेडफोन कानामधल्या कॉकलिया यंत्रणेला थेट जोडलेला असतो. म्हणजे ते ध्वनी थेट या भागावर आदळतात, हे लक्षात घ्यायला हवे.
- मोबाईलवरची गाणी ऐकण्यासाठी ज्या प्रकारचे हेडफोन वापरले पाहिजेत, त्याप्रकारचे वापरले जात नाहीत. स्वस्तात मिळणारे आणि कानाला इजा पोहोचवणारे हेडफोन वापरले जातात. म्हणून गाणी ऐकताना आपण कोणता हेडफोन वापरत असतो, हे ही लक्षात घेतले पाहिजे आणि थेट कानामध्ये खोलवर जाणारे हेडफोन शक्यतो टाळले पाहिजेत.
- हेडफोन वापरणे अपरिहार्यच असेल, तर आवाज कमी ठेवा कानाच्या आत नको, तर डोक्यावर लावण्यात येणारे हेडफोन्स लावा आवाजाची तीव्रता रोखणाऱ्या इअर मफचा वापर करा. सतत वापर होत असेल, तर एक तासानंतर कानाला विश्रांती द्या. लहान मुलांना हेडफोन वापरायला मुळीच देऊ नका. कारण बहिरेपण येण्याआधी काळजी घ्या, असे डॉक्टर सांगतात.
- जे तुम्ही हेडफोन लावून वारंवार गाणे ऐकत असाल तर तुमच्या कानातल्या बॅक्टेरियांची संख्या 700 पटीने वाढते. सोबतच तुम्ही कोणत्या प्रकारचे हेडफोन वापरता हे देखील महत्त्वाचे आहे, कमी किमतीत मिळणारे हेडफोन वापरल्यास बहिरेपणा येऊ शकतो.
वरील गोष्टी सांगण्याचा आमचा हेतू तुम्ही मोबाईवरील गाणी ऐकणे बंद करावी असा नाही. मात्र गाणी ऐकताना कोणती काळजी घ्यावी याची जाणून करून देणे हा आहे. कारण मोठ्या आवाजात गाणी लावली की, हा प्रभाव पडत राहणारच. तेव्हा मोबाईलवरची गाणी ऐकावीत परंतु आवाज बारीक ठेवावा. परिणामी, काही दोष निर्माण होण्याची भीती राहणार नाही.