सण साजरे करा धूम धडाक्यात, पण ‘या’ अति महत्वाच्या गोष्टींची घ्या काळजी
हॅलो आरोग्य ऑनलाईन । नमस्कार मित्रमंडळी काय चाललंय? आहे ना सगळे ठीकठाक, असायलाच पाहिजे नाही का?
आताच होळी साजरी केली आणि आता गुडीपाडव्याचे वेध लागले असतील नाही का… तर कस आहे माहित आहे का, आपला देश आहे संस्कृतीप्रिय, प्रत्येक धर्माच्या अनेक जाती आहेत आणि प्रत्येक जातीच्या काही परंपरा आहेत. पण गोष्ट मात्र सामान आहे कि, सर्वांना सण साजरे करायला आवडते लहानांपासून थोरांपर्यंत सगळी मंडळी याचा मनमुराद आनंद घेत जगतात. किंबहुना सणोत्सव आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग होऊन गेलेत. आता बघा ना वर्षातील प्रत्येक महिन्यात एक तरी मोठा सण असतो आणि सर्व सणांचा समान धागा म्हणजे सर्वत्र गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. जवळपास सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना !! बरं नुसती पोळी जेवणात कशी चालेल त्याबरोबर तूप, उन्हाळी कामाचे तळण, कांदा किंवा बटाटा भजी आणि इतर बरेच काही, कारण सर्वच पदार्थांची नावे द्यायची म्हटले तर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. बरं असो, महत्वाचे म्हणजे गोड आणि तेलकट पदार्थ एकदम ठासून भरलेले असतात.
आम्हा भारतीयांचा सगळ्यात एक मोठा प्रॉब्लेम आहे, आला वडापाव, समोश्या वास कि वासाचा माग काढून पहिल्यांदा खा, कुठे जिलेबी तळताना दिसली कि घे पिशवीभरून, त्यामुळे १५ ऑगष्ट आणि २६ जानेवारी हे तर जिलेबी खाण्याचे हक्काचे दिवस झाले आहेत नाही का??? तर महत्वाचा मुद्दा असा कि ९९% भारतीयांना मिठाई, बासुंदी, लाडू, जिलेबी आणि पुरी-भाजी हे पदार्थ जेवणात कोणी देऊ केले तर ते कधी नकार देऊ शकतील का? करा करा आणखी विचार करा, नाही ना देऊ शकत नकार आणि देऊ पण शकणार नाही कारण गोड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे हा आम्हा भारतीयांचा जन्मसिद्ध हक्क आहे असे आपण समजतो. पावसाळा सुरु झाला आणि जरा कुठे पावसात भिजून झाले कि घरोघरी कांदाभजी, मिरची आणि फक्कड चहा फर्माईश घरोघरी चालू होते नाही का? अशा वेळी कुणाच्या तरी मनात विचार येतो का कि एवढे सगळे पोटात ढकलतोय, त्याचे आत काय होत असेल आणि शरीराची काय वाट लागत असेल. पण एवढा विचार करायला कुणाला वेळ आहे आणि समजा विचार केला असताच तर डायबेटीज ची संख्या जगात सगळ्यात जास्त आपल्याकडे वाढली असती का?
या सर्व गोष्टींचा परिणाम असा होतो की सणानंतर आपले वजन तर वाढतेच आणि आरोग्यामध्ये देखील गडबड होते. तुम्ही सुद्धा असंच कोणत्याही सणाला विचार न करता विविध प्रकारचे पदार्थ खात जात असाल तर कृपया सावधगिरी बाळगा आणि ते टाळण्याचे मार्ग जाणून घ्या. सणानंतर दुसर्याच दिवशी शरीर पूर्णपणे विचित्र अनुभव करतं पण सणानंतर काही साध्यासोप्या टिप्स वापरल्या तर थकवा, आळस व लठ्ठपणापासून खूप सहज बचाव करता येऊ शकतो. तर, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सणानंतर तुम्ही काय केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला निरोगी व फिट वाटेल.
पुरेशी झोप:
तेलकट, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे, अपूर्ण झोपेने दुसऱ्या दिवशी शरीर सुस्त आणि आळशी राहते, तसेच पचन अपूर्ण राहिल्याने पोटफुगी, गॅसमुळे दिवसभर कामात लक्ष लागत नाही,
आहारात लिंबू पाण्याचा समावेश:
कोमट लिंबाचे पाणी पचनास मदत करते आणि आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास देखील मदत करते.यामुळे आपले वजन कमी करण्यास देखील मदत होते तसेच. यामुळे तुम्हाला खूपच बरं व रिफ्रेश वाटेल. त्यामुळे हे सर्वोत्कृष्ट पेय ठरू शकते.
सकाळी/संध्याकाळी ताज्या हवेत फिरायला जा:
स्वत:ला रिलॅक्स आणि फ्रेश फिल करण्यासाठी तुम्ही सकाळी / संध्याकाळी मोकळ्या हवेत चालायला जाऊ शकता. चालल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊन शरीरातील घटक घामाद्वारे, बाहेर पडण्याची प्रोसेस चालू होते. यामुळे आपले मन आणि शरीर दोन्ही सक्रिय होतात .चालल्याने पचनक्रिया सुधारण्याबरोबरच कॅलरी व फॅट जळण्यास देखील मदत होते. ज्यामुळे लठ्ठपणा आपोआप कमी होतो.