त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी काजूचा फेसपॅक लई भारी; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपण न जाणे कित्येक विविध प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या अगदी ओळखीतले एक असा पदार्थ आहे जो आपल्या त्वचेला उजळ आणि नितळ बनविण्यासाठी मदत करतो. आता तुम्ही विचारात पडला असाल कि हा कोणता पदार्थ आहे? तर हा पदार्थ म्हणजे काजू. होय. तुम्ही ड्रायफ्रूट मध्ये आवडीने खाता ना तोच हा काजू. ज्याच्या सहाय्याने त्वचेचा रंग उजळ आणि पोत नितळ होऊ शकतो. काजू आरोग्यासाठी फायदेशीर आहेच. पण त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर आहे. कारण त्यात असलेले पोषक घटक त्वचेची काळजी घेण्यास सक्षम आहेत. काजूमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन ई भरपूर असते. जे त्वचेची चमक वाढवण्यास मदत करतात. त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. याशिवाय केसांसाठी देखील काजू फायदेशीर आहे. खरं तर, काजूमध्ये प्रथिने आणि तांबे असते. जे केस जाड आणि मजबूत बनवण्यास मदत करतात. तसेच केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करते.
यासाठी काजूचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहेत. तर आज आपण त्वचेचे आरोग्य जपणारा काजूचा फेसपॅक कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे :-
१) काजू फेसपॅक बनवण्याची पद्धत जाणून घ्या खालीलप्रमाणे –
– काजूचा फेसपॅक बनवण्यासाठी ८ ते १० काजू दुधात भिजवून अर्धा तास ठेवा. यानंतर काजू बारीक करून पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये दोन चमचे बेसन घालून व्यवस्थित मिसळा. झाला तुमचा फेसपॅक तयार.
वापर – सर्वात आधी दुधामध्ये कापसाचा गोळा बुडवून त्याने चेहरा आणि मान स्वच्छ करा. यानंतर आपल्या चेहऱ्यावर काजूची पेस्ट लावा. पुढे ही पेस्ट २०मिनिटे तशीच चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून किमान एकदा हा फेसपॅक लावल्यास चेहरा तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी लाभदायक ठरतो.
० काजू फेसपॅकचे फायदे –
– काजू फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील हरवलेली चमक परत येते.
– चेहऱ्यावरील बारीक रेषा अर्थात सुरकुत्या कमी करण्यासाठी हा फेसपॅक मदत करतो.
– याशिवाय सनबर्न आणि टॅनिंगच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी या फेसपॅकचा वापर करता येईल.
– हा फेसपॅक त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी मदत करतो.
– त्वचेला पोषण आणि गळलेली त्वचा घट्ट करण्याचे काम हा फेसपॅक करतो.