स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे; उपाय, आहार, आयुर्वेदिक उपचार आणि व्यायाम (पूर्वार्ध)
हॅलो आरोग्य ऑनलाईन : पूर्वीच्या काळी मोबाईल फोन नसूनसुद्धा लोकांची स्मरणशक्ती चांगली होती. त्यांना कितीतरी गोष्टी लक्षात राहायच्या. अगदी कितीही जुने दाखले, हिशोब, गणितं त्यांना अगदी तोंडपाठ असायची. पण आता मात्र लोकांना मोबाईल फोन घेतल्याशिवाय काही आठवणार नाही. सगळ्या गोष्टी एका क्लिकवर करायची सवय लागली आहे. पण समजा काही कारणास्तव तुमच्याकडे मोबाईल फोन नसेल. अशावेळी मात्र तुम्हाला तुमच्या बुद्धीवर जोर द्यावा लागेल की नाही. म्हणूच आज आपण स्मरणशक्ती वाढवण्यावर थोडी अधिक माहिती घेणार आहोत यामध्ये आपण स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार, स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदीक उपचार, लक्षात ठेवण्याचे उपाय.. शिवाय केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अशांसाठी काही सोप्या गोष्टी आणि बुद्धी कशी वाढवावी या विषयी अधिक माहिती घेणार आहोत मग करुया सुरुवात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार पाहणार आहोत. हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे खानपानात झालेले बदल तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम करत असतात. त्यामुळे तुम्ही नेमका काय आहार घ्यायला हवा ते पाहुया.
मुलांच्या अभ्यासासंदर्भात पालकांच्या अनेकदा तक्रारी असतात की ते अभ्यास करत नाहीत किंवा त्यांचे अभ्यासाकडे लक्ष नाही. अशावेळी तुम्ही मुलांना अधिकाधिक चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवा. फोनपासून दूर ठेवत त्यांना मैदानी खेळ खेळांंमध्ये अधिक गुंतवून ठेवा. त्यांना वाचनाची आवड लावा. त्यांच्यासोबत असे खेळ खेळा जे त्यांना सतत प्रश्न निर्माण करण्यास उद्युत करतील.
स्मरणशक्तीला चालना देणारे पदार्थ
- मासे: माशांमध्ये असणारे फिश ऑइल शरीरासाठी फायदेशीर असते. माशांच्या सेवनामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात याचा समावेश अगदी हमखास करायला हवा.
- सॅच्युरेटेड फॅट: दूध,मांस, चिकन, तेल, चीझ यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. तुमच्या आरोग्यासाठी या गोष्टी अतिरिक्त खाणे चांगले नाही.असे सांगितले जाते. पण एका अभ्यासात असे समोर आले आहे की या पदार्थांच्या योग्य सेवनामुळे तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदा होऊ शकतो.
- केळी : केळ्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. त्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे चांगल्या स्मरणशक्तीसाठी तुम्ही केळ्यांचे सेवन केल्यास फारच उत्तम.
- पालेभाज्या: पालेभाज्याही तुमच्या शरीराला ऍक्टिव्ह ठेवण्याचे काम करते. व्हिटॅमिन k, ल्युटेन, फ्लोलेट असते जे तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगले असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात मेथी, पालक, मुळा, लालमाठ अशा भाज्यांचे सेवन करायला हवे
- ग्रीन टी: चहा पिण्यापेक्षा जर तुम्ही ग्रीन टी चे सेवन केले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. म्हणून तुम्ही ग्रीन टीचे सेवन करा. त्यामुळे तुम्ही अधिक कार्यक्षम राहता आणि तुमच्यामध्ये अधिक चुणूक दिसून येते. स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय करणं अतिशय सोपे आहे.
- डार्क चॉकलेट : चॉकलेट हे नेहमीच शरीरासाठी चांगले असते. तुम्ही जर डार्क चॉकलेट खाल तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच जाणवतील. डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे तुमच्यावरील अतिरिक्त ताण कमी होतो आणि तुमच्या बुद्धीला चालना मिळते.
- फिश सप्लिमेंट– जर तुम्ही आहारात मासे खाऊ शकत नसाल तर तुम्ही योग्य सल्ला घेऊन फिश सप्लिमेंट घेऊ शकता. याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुमच्या बुद्धीला चालना देण्याचे काम फिश सप्लिमेंट करु शकतात. त्यामुळे तुम्ही योग्य सल्ला घेऊन फिश सप्लिमेंट घेतात.
- कोकोओचा करा वापर: चॉकलेटमध्ये असलेले कोकोआदेखील तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगले असते. मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्यासाठी कोकोआ चांगले आहे. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास कोकोआ खा. कारण त्याचा तुम्हाला योग्य तो फायदा होऊ शकेल. हल्ली बाजारात कोकोरआची पावडर मिळते. ज्याचा उपयोग तुम्ही करु शकता.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार:
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अनेक चांगले आयुर्वेदिक उपचार आहेत. जर तुम्हाला आर्युवेदिक उपचारपद्धती हव्या असतील तर तुम्ही हे आर्युवेदिक उपचारही करु शकता. जाणून घेऊया याच आर्युवेदिक उपचार पद्धती.
- अश्वगंधा: स्मरणशक्तीवर होणारा अश्वगंधाचा परिणाम हा वाखाणण्यासारखा आहे. अश्वगंधाची मुळे औषधांप्रमाणे घेतल्याने तुम्हाला फायदे होतात. अभ्यासातूनही हे समोर आले आहे. तुमच्या मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचे काम अश्वगंधा करते.
- ब्राम्ही: अश्वगंधाप्रमाणे ब्राम्हीही तुमच्या मेंदूला अॅक्टीव्ह ठेवण्याचे काम करते. अनेकदा मन शांत होण्यासाठी ब्राम्ही घेण्याचा सल्ला दिला जातो. अल्झायमर सारख्या आजारांपासून ब्राम्ही तुम्हाला दूर ठेवते. मेंदूला चालना देण्याचे काम ब्राम्ही करते. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात ब्राम्हीचे सेवन करु शकता.
- शंखपुष्पी: आयुर्वेदात शंखपुष्पीचे अनेक फायदे सांगितले आहेत. बुद्धीसाठी शंखपुष्पी चांगले असल्याचे पुराणात सुद्धा म्हटले आहे. शंखपुष्पीच्या सेवनामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही शंखपुष्पीचे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे.
- गोटू कोला: गोटू कोला अनेक बाबतीत फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. अगदी त्वचेच्या समस्येपासून ते सेक्सपर्यंत त्याचे अनेक फायदे आहेत. पण तुमच्या मेंदुला चालना देण्यासाठीही गोटू कोला चांगले आहे. गोटू कोला नावाची वनस्पती तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगली असून तुम्ही त्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. एका प्रयोगादरम्यान गोटू कोलाच्या वापरामुळे चांगले बदल झाल्याचे दिसून आले आहेत.
स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम करणाऱ्या या गोष्टी टाळा:
स्मरणशक्तीला चालना देण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आहारात असणे गरजेचे असते. अगदी तशाच काही गोष्टी तुम्ही आहारातून वगळणे गरजेचे असते. आहारात जर या गोष्टी असतील तर त्या तुमच्या स्मरणशक्तीवर विपरित परिणाम करतात. आता अशा काही सवयी किंवा खाद्यपदार्थ पाहुया जे तुम्ही तुमच्या सवयींच्या यादीतून काढून टाकायला हवे. तुमच्या आहारातील खाद्यपदार्थांचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. जर तुमच्या जंक फूड किंवा असे काही पदार्थ असतील तर ते तुमच्या शारिरीक क्रिया मंदावू शकतात. त्यामुळे तुम्हाला आहारात योग्य पदार्थ घेता आले तर फारच उत्तम
- नियमित मद्य सेवन: आरोग्यासाठी मद्य सेवन अजिबात चांगले नाही. मद्य सेवनामुळे होणारे दुष्परिणाम तुम्हाला माहीत असतीलच. पण तुमच्या मेंदूवरही मद्य सेवन विपरीत परिणाम करतात. मद्यपान केल्यानंतर एक ते दोन दिवस लगेच कोणत्याच गोष्टीचा बोध होत नाही. त्यामुळे त्याचे सेवन तुम्ही टाळले पाहिजे.
- जंक फूडची सवय: सध्या सगळ्यांना जंक फूडची सवय लागली आहे. जंक फूडमुळे तुमचे आरोग्य खराब होते. यामध्ये वापरलेले तेल,मसाले हे तुम्हाला सुस्त करुन टाकतात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला असलेली जंक फूडची सवय सोडा. कारण ती तुमच्यासाठी घातक ठरु शकते. जर तुमच्या लहान मुलांना अशी सवय लागली असेल तर त्यांची ही सवय तुम्ही लवकरात लवकर सोडा कारण लहान मुलांवर त्याचा त्रास लवकर दिसून येतो.
- जास्त विचार करणे: काही जणांना खूप विचार करायची सवय असते. ही सवय तुम्हालाही असेल तर आताच खूप विचार करणे बंद करा. कारण सतत विचार करण्यामुळेही तुमच्या मेंदुवर ताण पडू शकतो. अति विचार केल्यामुळे तुमचे लक्ष कशातही लागत नाही. त्यामुळे शक्य असेल तर विचार करणे थांबवा.
- गोळ्यांचे अतिरिक्त सेवन नको: काहींना अगदी क्षुल्लक कारणासाठी औषधांच्या गोळ्या घ्यायची सवय असते. गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनाचा परिणामही तुमच्या स्मरणशक्तीवर होतो. तुमच्या तब्येतीवर त्याचे विपरीत परिणाम होऊ लागल्यावर तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. त्याचा परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर होऊ शकतो.
- आरोग्याच्या तक्रारीकडे करु नका दुर्लक्ष: तुमच्या आरोग्याची काळजी घेणे ही तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगले आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याचा त्रास हमखास होऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
आता तुम्हाला जर तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही या गोष्टी नक्कीच विचारात घ्या.