आरोग्याच्या दृष्टीने ‘हि’ डाळ अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याला जर निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी आपला आहार सकस आणि सत्त्वयुक्त असायला हवा. आता सकस आहार म्हणजे काय? तर केवळ पालेभाज्या खाणे? तर नाही. सकस आहारात म्हणजे आपल्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्वे समाविष्ट असणे गरजेचे आहे. यासाठी आहारात केवळ शाकाहार नव्हे तर मांसाहाराचाही समावेश असायला हवा. मुख्य म्हणजे मांसाहारात प्रोटीन मिळवण्यासाठी अनेको पर्याय आहेत. मात्र शाकाहार्यांना प्रोटीन मिळवण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाही. परंतु डाळींमधून हे लोक अगदी सहज प्रोटीन मिळवू शकतात. त्यामुळे आहारात सर्व डाळींचा समावेश करावा.
आपल्या भारतात अनेक डाळी आणि अनेको धान्य आहेत. मात्र आपल्या जेवणाच्या ताटात अनेकदा काही ठराविकच डाळी आणि धान्यांचा समावेश आपण आपल्या आवडीनुसार करीत असतो. यामध्ये प्रामुख्याने आरोग्याच्या दृष्टीने पहिले असता, चण्याची डाळ आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहे. कारण चण्याच्या साधारण १०० ग्रॅम डाळीत ३३००० कॅलरी आणि ११ ग्रॅम फायबर सहित प्रोटीन घटकदेखील मोठ्या प्रमाणात असतात. चला तर जाणून घेऊयात चण्याच्या डाळीचे फायदे –
१) ऊर्जेचा स्त्रोत – चण्याच्या डाळीमध्ये झिंक, कॅल्शियम, प्रोटीन, फोलेट हे घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते. म्हणून दररोज आहारात किंवा न्याहारीत चण्याचे डाळीचे पदार्थ खावे. यामुळे शारिरीक दुर्बलता कमी होते.
२) हिमोग्लोबीनच्या पातळीत सुधार – चण्याची डाळ शरीरात आयर्नची कमतरता भरून काढण्यास मदत करते. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. या डाळीतील अमायनो अॅसिड रक्तपेशींना मजबुतदेखील करते.
३) पोटाच्या तक्रारींवर परिणामकारक – चण्याच्या डाळीमध्ये फायबरचा मुबलक साठा असल्याने कोलेस्ट्रेरॉलची पातळी सुधारण्यास मदत होते. शिवाय पचनसंस्थेचे कार्यदेखील सुरळीत होण्यास मदत होते. याशिवाय बद्धकोष्ठतेचा त्राससुद्धा आटोक्यात राहतो.
४) ह्रदयाच्या आरोग्याची काळजी घेते – दररोज भिजलेल्या चण्याच्या डाळीचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रोलची पातळी व्यवस्थित राहते. परिणामी ह्रदयाचे आरोग्य व्यवस्थित राहते आणि यामुळे हृदयसंबंधीत रोगांपासून सुटका मिळते.
५) रक्तातील साखरेवर नियंत्रण – मधुमेहींसाठी चणाडाळ फायदेशीर आहे कारण चण्याच्या डाळीचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
६) युरिनसंबंधीत समस्या दूर होतात – युरिन संबंधीत कोणत्याही समस्यांवर चण्याची डाळ प्रभावी आहे. यासाठी चण्याच्या डाळीसोबत गुळ खाणे अधिक लाभ देते.
७) किडनीच्या समस्यांवर प्रभावी – किडनी संबंधीत समस्या असतील तर नियमित चण्याची डाळ आहारात खावी. यामुळे शरीरातील अतिरिक्त मीठ काढून टाकण्यास मदत होते आणि किडनीचे आरोग्य चांगले राहते.
८) छातीतला कफ कमी होतो – चण्याच्या डाळीत भरपूर फायबर असतात. त्यामुळे पचन क्रिया सुधारते आणि पोट साफ होते. याशिवाय छातीतील कफसुद्धा दूर होतो.