Child Care : ‘या’ 10 टिप्सच्या सहाय्याने मुलांचा सर्वांगीण विकास होईल हमखास; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। Child Care मुलांचं मन आणि बुद्धी कुणाच्याही नियंत्रणात असूच शकत नाही. कारण सामान्य माणसापेक्षा लहान मुलांचा मेंदू अधिक कार्यक्षम आणि जलद वृत्तीचा असतो. मुलांची कल्पना शक्तीसुद्धा पालकांपेक्षा धीट असते. यामुळे नेहमीच बाल रोग तज्ञ सांगतात कि मुलांच्या कल्पनांना प्रोत्साहन द्या. त्यांना चपळ होऊ द्या. मुलांच्या मनाप्रमाणे आणि त्यांच्या मूडनुसार त्यांना हाताळा.
यामुळे होत काय..? तर तुमची मुलं एका मर्यादेनंतर तुम्हाला पालक म्हणून नव्हे तर सवंगडी म्हणून पाहतात. यामुळे मुलं तुमच्यासोबत बिंधास्त वेळ घालवतात. बोलताना वागताना त्यांना ताण येत नाही आणि यामुळे मुलं अधिक सक्रिय तसेच उत्साही राहतात. मुख्य म्हणजे मुलांसोबत मैत्री करण्याचा सगळ्यात महत्वाचं फायदा काय आहे माहितेय..? मुलं तुम्ही सांगाल ते ऐकायला तयार होतात. (Child Care)
आता तुम्ही म्हणाल यासाठी मुलांशी वेगळी अशी मैत्री काय करायची..? एक धपाटा दिला तरीही मुलं ऐकतात. त्यात काय एव्हढं. तर तुम्ही चूक करताय. तुमचा धपाटा मुलांना भीती दाखवत असतो. जिथे चुकतील तिथे धपाटा द्या ना..! पण प्रत्येकवेळी मुलांना धाक दाखवणं तितकंसं आवश्यक नसतं हे आधी समजून घ्या. त्यामुळे मुलांशी हातमिळवणी करण्यावाचून तुमच्याकडे पर्याय नाही.
अनेकदा तुम्ही पाहिले असाल कि, (Child Care) मुलं लहान वयातच चुकीच्या मार्गाकडे वळतात आणि पालकांना कळतही नाही. याचे कारण म्हणजे तुमची मुलं तुमच्या धाकापायी बऱ्याच गोष्टी आडून करतात. यामुळे त्यांनी तुमच्यासमोर आपली चूक कशी दिसणार नाही याची पूर्ण सेटिंग आधीच लावलेली असते. पण जेव्हा मुलं तुमच्यासोबत फ्री असतात तेव्हा किमान एकदा तरी मुलं पकडली जातातच. याचा फायदा पालकांना असा होतो कि मुलांना त्यांची चूक दाखवून सुधारायला मदत करणे सोप्पे जाते.
(Child Care) याशिवाय अनेकदा मुलं कोशात जातात, एकलकोंडी होतात. कितीतरी वेळा मुलं पालकांच्या जवळही जात नाहीत. तसेच अचानक अभ्यासातील गती कमी होणे, खेळणे बागडणे पूर्ण बंद करणे, एखाद्या बिंदुस्थित जागेकडे डोळे लावून बसने अशी लक्षणे मुलांमध्ये आढळली तर तुमच्या मुलांचा विकास खुंटतोय हे समजून घ्या. मग मुलांचा विकास पूर्ण आणि व्यवस्थित होण्यासाठी काय कराल..? तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक टिप्स (Child Care)
सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक वयोगटातील मुलांनसाठी विकासाचे विविध पर्याय आहेत. यामध्ये १ ते ९ हा अतिशय लहान तर १० ते १९ हा किशोरवयीन गट आहे. यातील सर्वात लहान गटातील मुलांसाठी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. तर किशोरवयीन गटातील मुलांच्या पंखांना बळ देण्याचे काम पालकांना करावे लागते. तर आज आपण किशोरवयीन मुलांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या टिप्स जाणून घेणार आहोत.
१) नियमित वैद्यकीय तपासणी करा
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कोणताही आजार होण्यासाठी विशिष्ट वयाची गरज नसते. (Child Care) कितीतरी भयंकर आजार अगदी जन्माला आलेल्या मुलालाही होतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. वर्षातून एकदा मुलांचे पूर्ण बॉडी चेकअप जरूर जरून घ्या.
२) मुलांना ज्ञानाची आवश्यकता समजवा
अनेकदा किशोरवयीन मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि अन्य विषयात रस घेतात. तर अशावेळी आपण आपल्या मुलांना अभ्यास अर्थात ज्ञान मिळवणे जरुरी का आहे..? याची उकल करून सांगा. यासाठी विविध तज्ञांची उदाहरणे द्या. गोष्टी सांगा. अभ्यासाला प्रोत्साहन द्या. इतकेच नव्हे तर व्याख्यानमाला यासारख्या कार्यक्रमांना मुलांना आवर्जून न्या.
३) नाही म्हणायला शिकवा
मुलांचे कळते वय असतानाच कुठे नाही म्हणायचं हे माहित असेल तर मुलं मानसिक समस्यांपासून दूर राहू शकतात. मुलांना चुकीचा स्पर्श आणि चुकीची वागणूक या गोष्टींची समज देत नाही म्हणायला शिकवा. इतकेच नव्हे तर अन्य मित्रांच्या चुकीच्या संगतींमध्ये वाहून न जाता जे चूक आहे त्याला चूक म्हणून करण्यास नकार देण्याची समज मुलांमध्ये उत्पन्न करा. (Child Care)
४) मुलांची आवड ओळखून त्यास प्रोत्साहन द्या
आपल्या मुलांचा कल कोणत्या बाजूला आहे हे आधी पालकांनी समजून घ्या. अभ्यासाशिवाय इतर क्रीडा, संगीत किंवा कोणत्याही क्षेत्रात मुलांना रस असेल तर ती गोष्ट करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करा. शिवाय मुलांची आवड जोपासा आणि त्यांना प्रगती करण्यास उत्तम मार्गदर्शन करा.
५) पैशाचं नियोजन करायला शिकवा
लहान पणापासूनच मुलांना पै पै कसा जोडायचा ते शिकवा. एका एका रुपयाची किंमत आयुष्यात किती मोठी आहे हे सांगा. मुलांना पैसे साठवण्याची सवय लावा. यासाठी छोटा पिगी बँक घेऊन द्या आणि दररोज एक रुपया मुलांच्या हातात द्या. तो खर्च करायचा कि साठवायचा..? साठवला तर पुढे काय करायचं..? असे प्रश्न विचारून मुलांचे मन जाणून घ्या. (Child Care)
६) प्रतिस्पर्धी नको सहयोगी व्हायला शिकवा
आपली मुलं जेव्हा एखादी स्पर्धा जिंकण्याचा ध्यास बाळगतात तेव्हा सर्वात आधी मुलं प्रतिस्पर्धी कसा हरेल याचा विचार करतात. तर मुलांना शिकवा कि, मौखिक विजयापेक्षा जास्त भावनिक विजय महत्वाचा. पैश्यापेक्षा जास्त माणसं जोडावी. यामुळे प्रतिस्पर्धी होऊन ईर्षा बाळगण्यापेक्षा पडत्याला हात देऊन सहयोगी होण्याला सल्ला द्या.
७) मुलांवर नियम लादू नका त्यांना आत्मसाद करू द्या
अनेकदा मुलांना ओरडून किंवा मारून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो पण यामुळे मूळ पालकांपासून दूर होतात. अंतर राखून वागतात. तर पालकहो, मुलांना ओरडून किंवा मारून शिस्त लावू नका किंवा एखादी गोष्ट अशीच कर तशीच कर म्हणून नियम लादू नका. तर मुलांना काय चुकतंय ते समजावून सांगा. ते त्यांनी का करू नये हे सांगा आणि त्यांना स्वतः स्वतःवर निर्बंध घालू द्या. त्यांना शिस्त आत्मसाद करू द्या. (Child Care)
८) वाईट संगतींपासून दूर ठेवा
आपली मूलं किशोरवयात चुकीची संगत धरतात आणि हळूहळू त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात. पुढे जाऊन मुलांची प्रगती थांबते आणि मुलं वाईट रस्त्याला जातात. (Child Care) अशावेळी मुलांना वेळीच चुकीच्या गोष्टींची ओळख करून द्या. एखादी व्यक्ती आपल्या मुलासाठी चुकीची सांगत ठरत असेल तर मुलांना वेळीच त्या व्यक्तीपासून दूर करा. मुलांना चूक पुराव्यानिशी दाखवून त्यांचे मन वळवा.
९) सोशल मीडियापासून अंतर ठेवायला शिकवा
किशोर वयात मुलांना सोशल मीडियाचा भारी नाद लागतो. कारण लहानपणापासूनच हातात मोबाईल असल्यामुळे हि गोष्ट फार सामान्य झालेली असते. पण सोशल मीडिया मुलांच्या मनावर आणि मेंदूवर प्रभाव करीत असतो. जो वाईट असतो. त्यामुळे आठवड्यातून किमान २ दिवस सोशल मीडियाला सुट्टी द्या असत फिरायला जा. (Child Care) मैदानी खेळ वा बुद्धीचे खेळ , बैठे खेळ खेळा. मुलांकडे स्वतःसाठी त्यांचा काही वेळ मागून घ्या आणि रात्री डायरी लिहिण्याची सवय विकसित करा. म्हणजे मुलं रात्रीदेखील डीजीटल स्क्रीनपासून लांब राहतील.
१०) नियमित व्यायाम आणि ध्यान धारणा करण्याची सवय विकसित करा
उत्तम आरोग्यासाठी उत्तम जीवनशैली महत्वाची. त्यामुळे स्वतः आधी या सवयी आत्मसाद करा आणि नंतर मुलांनाही या सवयी लावा. यामध्ये प्रामुख्याने शारीरिक आरोग्य राखण्यासाठी नियमित किमान ३० मिनिटे व्यायाम आणि मानसिक आरोग्यासाठी ३० मिनिटे ध्यान धारणा करणे महत्वाचे आहे. (Child Care)
‘हे’ पण वाचा :-
आपली मुले चिडखोर असतील तर त्यांना कसे हाताळावे
काहीही खाल्लं तरी मुलांचं वजन वाढत नसेल तर ‘हे’ पदार्थ मुलांना जरूर द्या; जाणून घ्या
आपली मुले व्यसनाधीन होण्याची कारणे काय?; जाणून घ्या लक्षणे आणि घ्यावयाची काळजी
हे वाचाल तर , आपल्या मुलांना या वस्तूला खाण्यासाठी हात हि लावू देणार नाही
ताप आला म्हणून लहान मुलांना ‘पॅरॅसिटॅमोल’ देता? मग या गोष्टी जरूर जाणून घ्या