कडू चवीमुळे मुलं मेथी खात नाहीत? मग या टिप्स जरूर वापरा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। मेथी हि अशी भाजी आहे जी पूर्ण बारा महिने दरात चढ उतार होऊन मिळत असते. त्यामुळे प्रत्येक घरात आठवड्यातून किमान एकदा तरी हि भाजी खायला मिळतेच. शिवाय मेथी आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते. मधुमेह किंवा इतरही आजारांसाठी मेथी खाणे फायदेशीर आहे. पण अनेकदा तिची चव कडू असल्यामुळे मुलं मात्र मेथी पहिली कि लगेच नाक मुरडतात. मग अश्यावेळी घरातील स्त्रिया काय करू म्हणजे खाईल? अशा प्रश्नाचे उत्तर शोधू लागतात. तर मैत्रिणींनो आज आम्ही तुम्हाला मेथीची भाजी कडू कशी होणार नाही यासाठी खास टिप्स देणार आहोत. या टिप्स जरूर वापरून पहा आणि आपल्या मुलांना बिंधास्त मेथी खाऊ घाला.
० मेथीचा कडवटपणा कमी करण्याचे सोप्पे उपाय
मेथीची भाजी किंवा पराठे करताना भाजी निवडल्यानंतर चिरु नका. भाजी, पराठे, पुऱ्या करण्यासाठी पूर्ण पाने धुवून तशीच्या तशी वापरा. असे केल्यास मेथी कडू लागत नाही.
मेथीची भाजी बनवताना त्यात भरपूर कांदा घाला. यामुळे मेथीचा कडवटपणा निघून जातो. शिवाय यात दाण्याचा कूट आणि ओले खोबरे वापरल्यास भाजी दिसायला आकर्षक आणि आणखी चविष्ट लागते.
मेथीच्या भाजीत मूगाची डाळ आणि लसूण घातल्यास मेथीचा कडवटपणा मरतो. याशिवाय मेथीच्या भाजीत टोमॅटो आणि पनीर घातल्यासदेखील मेथीचा कडवटपणा जातो.
मेथीच्या भाजीमध्ये हिरवे मटार आणि क्रीम वापरल्यास तिचा कडवटपणा जातोच. शिवाय मुलंदेखील आवडीने खातात. हाऊ भाजी बनवताना लाल मिरचीचा तडका द्यावा.