लहान मुलांच्या आहारात असतील ‘हे’ पदार्थ तर रोगप्रतिकारक शक्ती सहज वाढेल; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आता दुसरी लाट ओसरतेय पण तिसऱ्या संभाव्य लाटेचा लहान मुलांना धोका आहे असे वारंवार सांगण्यात येत आहे. त्यात लहान मुलांसाठी अदयाप कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. यासाठी लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मुलांच्या आहारात काही अश्या पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे जे मुलांच्या शरीराची आतून काळजी घेतील आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतील.
१) तांदूळ – तांदूळ अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतो. शिवाय पचायलाही हलका असल्यामुळे याचा मुलांच्या आहारात समावेश करणे सोप्पे जाते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कि, तांदळात विशिष्ट प्रकारचे अमीनो आम्ल असते. त्यामुळे मुलांच्या जेवणासाठी फक्त तांदूळ न वापरता त्यासह विविध प्रकारच्या डाळी आणि तूप वापरावे. यामुळे मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
२) पौष्टिक लाडू – संध्याकाळच्यावेळी भूक लागते आणि यासाठी निरोगी व पौष्टिक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून रोटी- तूप, गूळ चपाती रोल, रवा पुडिंग किंवा नाचणीचे लाडू यांसारखे काही गोड आणि साधे अन्न खाल्ल्याने मुले उत्साही होतात शिवाय शारीरिक ऊर्जा कायम राहते.
३) हंगामी फळे – लहान मुलांच्या आहारात किमान एक हंगामी फळ असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हंगामी फळे त्या त्या हंगामात खाल्ल्याने आतड्यांच्या चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
४) लोणचे किंवा चटणी – मुलांना रोज घरगुती प्रकारचे लोणचे, चटणी किंवा मुरांबा खायला द्या. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढेल आणि शारीरिक ऊर्जा कायम राहण्यास मदत होईल.
५) काजू – एक मूठभर काजू आपल्याला दिवसभर उत्साही, आनंदी आणि सक्रिय राहण्यास मदत करतात. शिवाय काजूत व्हिटॅमिन सी, जस्त, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि लोहसारखे गुणधर्म असतात. जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.