शहाळ्याचे पाणी देते निरोगी आरोग्य आणि तेजस्वी सौंदर्य; कसे ते जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले आरोग्य ही आपली जबाबदारी असते. मात्र दिवसभरातील अन्य जबाबदाऱ्या पार पाडताना आपण आरोग्याकडे मात्र सर्रास दुर्लक्ष करतो. इतकेच नव्हे तर आपण आपल्या त्वचेकडेही पुरते लक्ष देत नाही. परिणामी आपली त्वचा खराब होते. तुम्ही अनेकदा त्वचेची काळजी घेण्याकरिता नानाविध महागडी उत्पादने वापरली असतील. पण शहाळ्याचे पाणी आपले आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीही उत्तमरीत्या राखू शकते हे कितीजण जाणतात. म्हणून आज आम्ही शहाळे नारळ पाण्याच्या अशा गुणधर्मांबद्दल आपल्याला सांगणार आहोत, जे आपल्या आरोग्याशी आणि त्वचेशी संबंधित बर्याच समस्या दूर करेल.
*शारीरिक आरोग्याशी संबंधित फायदे :-
१) शहाळ्याचे पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे. जे गोड असेल तरी त्यात शून्य कॅलरी असतात. शिवाय त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर नसतो. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा कोणताही घातक परिणाम होत नाही.
२) अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असणारे शहाळेपाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. यामुळे कोणत्याही रोगांशी लढण्यास मदत होते.
३) शरीरातील पाण्याचे प्रमाण असंतुलित असल्याने अनेकांना किडनी स्टोनचा आजार होतो. तर शहाळ्याचे पाणी नियमित पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि किडनी स्टोनचा आजार होणे टळू शकते.
४) शहाळ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराईड्स कमी होऊन हृदयरोग होण्याचा धोका फार कमी संभवतो.
५) शहाळ्याचे पाणी पर्याप्त पोटॅशियमयुक्त असते. त्यामुळे रक्तदाब कमी होण्यासही मदत होते.
* त्वचेच्या आरोग्याशी संबंधित फायदे :-
६) शहाळ्याच्या पाण्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात. यामुळे त्वचेवरील मुरुमांच्या डागांपासून मुक्त होण्याच्या प्रक्रियेस गती येते व या समस्येतून मुक्तता मिळते.
७) शहाळ्याचे पाण्यामध्ये अमीनो अॅसिड असते. जे कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी अत्यंत फलदायी असते.
८) शहाळ्याच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण जास्त असल्यामूळे ह्याचे नियमित सेवन केले असता सूर्य प्रकाशापासून त्वचेचा बचाव होतो आणि आपली त्वचा डागविरहित होते.