ब्राऊन शुगरच्या माध्यमातून करा दमा नियंत्रित; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। दैनंदिन जीवनात साखरेचा अति वापर केल्याने शरीरात कॅलरीचे प्रमाण नको तितके वाढते. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. परंतु ब्राऊन शुगर असा साखरेचा प्रकार आहे, ज्याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणाबाहेर जात नाही. मुळात, ब्राउन शुगरमध्ये कॅलरी कमी आणि लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, तांबे, फॉस्फरस, प्रथिने, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी तसेच इतर अनेक पौष्टिक घटक समाविष्ट असतात. जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. इतकेच काय तर, असे म्हटले जाऊ शकते की ब्राउन शुगर हा गुळाचा एक शुद्ध प्रकार आहे. शिवाय यामध्ये कोणतीही रसायने वापरली जात नाहीत. चला तर जाणून घेऊयात ब्राऊन शुगरचे फायदे.
१) दम्यावर उपचार – दमा असणाऱ्या रुग्णांनी साखरेऐवजी ब्राउन शुगरचे सेवन करणे फायद्याचे ठरते. कारण यामुळे ब्राऊन शुगरमध्ये असणारे अँटी-एलर्जीक गुणधर्म दम्यावर मात करण्यास मदत करतात. शिवाय एंटीसेप्टिक म्हणूनही ब्राऊन शुगर वापरली जाते. अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म ब्राउन शुगरमध्ये असतात, जे कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी असतात.
२) पचनक्रियेसाठी मदतयुक्त – ब्राऊन शुगरच्या सेवनाने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्या रुग्णांनी गरम पाण्यात आले आणि एक छोटा चमचा ब्राउन शुगर घोळून पिणे फायद्याचे असते.
३) मासिक पाळीवेळी वेदनांपासून आराम – जर स्त्रियांना मासिक पाळीमध्ये वेदना होत असतील, तर त्यांनी ब्राउन शुगर वापरणे फायद्याचे असते. कारण ब्राऊन शुगर पोटॅशियमने समृद्ध असते. जे स्नायूंच्या वेदना कमी करण्यास उपयुक्त ठरते.
४) वजनावर नियंत्रण – ब्राऊन शुगरमध्ये खूप कमी कॅलरी असतात. यामुळे चयापचय दर झपाट्याने वाढतो. परिणामी भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवणे सोप्पे होते.
५) त्वचेसाठी फायदेशीर – ब्राउन शुगरमध्ये व्हिटॅमिन बी असते. जे वृद्धत्वाची समस्या दूर करते. शिवाय त्यात खनिज घटकदेखील आढळतात. जे त्वचेच्या पेशींसाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यामुळे त्वचा उजळ करण्यासाठी ब्राउन शुगरचा स्क्रबर म्हणून वापर करणे सोयीचे आहे.