Copper Ring Benefits

Copper Ring Benefits: तांब्याची अंगठी ‘या’ बोटात घालाल, तर अशांत मन होईल शांत; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Copper Ring Benefits) आजकाल ट्रेंडिंग फॅशन म्हणून विविध धातूंच्या अंगठीचा वापर केला जातो. अंगठी परिधान केल्यामुळे बोटांनाही आकर्षण येते. त्यात नाजूक हात आणि लक्षवेधी अंगठी असेल तर साहजिक चार चौघात तुम्ही आणि तुमची अंगठी चर्चेचा विषय ठरते. … आणि चर्चेत रहायला कुणाला आवडत नाही..?

तुम्ही कोणत्याही सोनाराच्या दुकानात गेलात तरीही अशा धातूंच्या अंगठ्या सहज उपलब्ध होतात. आजकाल तर सोने, चांदी, हिरा, प्लॅटिनम यासह तांब्याच्या अंगठीतही विविध डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे साहजिकच तांबेदेखील परिधान केले जाते. पण तुमच्यापैकी किती लोक हा धातू फॅशन नव्हे तर आरोग्यवर्धक आहे म्हणून परिधान करतात..?

मित्रांनो, आपल्या भारतीय ज्योतिष अभ्यासात ‘तांबे’ या धातूचे अत्यंत महत्व आहे. तांबे हा धातू सर्वाधिक पवित्र आणि तितकाच शुद्ध मानला जातो. कारण हा धातू धारण केल्यास सूर्य आणि मंगळ अशा कडक ग्रहांचा प्रभाव सामान्य करता येतो, अशी फार प्राचीन मान्यता आहे. (Copper Ring Benefits)

मुख्य म्हणजे वेद पुराणांतही ‘तांबे’ हा सूर्याचा धातू असल्याचे सांगितले आहे. यामुळे जोतिष शास्त्रात जन्म कुंडलीचा आधार घेऊन तांब्याची अंगठी, कडे वा अन्य कोणतेही आभूषण धारण केले जाते. पण मुख्य आणि विशेष बाब अशी कि तांबे या धातूचा केवळ जोतिष शास्त्रात नव्हे तर आयुर्वेदातही मोठा महत्वपूर्ण उल्लेख केलेला आहे. तो कश्यासाठी..? तर आरोग्यासाठी. आता तुम्ही म्हणाल कि तांब्याचा आणि आरोग्याचा काय संबंध..? तेच आपण जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

० तांब्याचा आणि आरोग्याचा संबंध काय..?

मुळातच तांबे हा धातू अतिशय शुद्ध असतो. हे केवळ वेदांत किंवा शास्त्रात सांगितले आहे म्हणून नव्हे तर अभ्यासात सिद्ध झाले आहे म्हणून सांगत आहोत. याशिवाय तांब्यात असे अनेक गुणधर्म समाविष्ट आहेत ज्यांचा आरोग्यासाठी अतिशय लाभ होतो. शिवाय तांबे हा निसर्गात आढळणारा विद्युतसुवाहक धातू आहे. तांबे धातू मृदू, तन्यक्षम आणि विद्युत तसेच उष्णतेचा सुवाहक असल्यामुळे त्याचा उपयोग विद्युत वाहिन्यांमधे, उष्णता वाहकांमधे, आभूषण व अलंकारांमधे तसेच घरगुती भांड्यांसाठी होतो.

तसेच तांबे हा एकमेव असा धातू आहे जो बॅक्टेरियाच्या वाढीस तीव्र प्रतिबंध करतो. (Copper Ring Benefits) तांब्यातील अँटी ऑक्सीडेन्ट कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव करू शकतात. तर तांब्यातील मेलेनीन हा घटक त्वचेचे विविध विकारांपासून संरक्षण करतो. याशिवाय तांब्यातील दाहक विरोधी गुणधर्म सांध्यांच्या दुखण्यात आराम देतात. असे विविध प्रकारे तांबे आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्यविषयक समस्यांवर समाधान असल्याचे सिद्ध झाले आहे.

० तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी उत्तम का.. तांब्याची अंगठी..?

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे आरोग्यदायी आहे. या पाण्याला ‘तांब्र जल’ असे म्हणतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने वात, पित्त, कफची समस्या दूर होते. अगदी तसेच तांब्याच्या भांड्याप्रमाणे तांब्याची अंगठी घालण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. (Copper Ring Benefits)

पाण्यातील कीटकांना दूर करण्याची एक खास गुणवत्ता तांब्यामध्ये आहे तसेच आपल्या शरीराच्या आसपास विहार करणाऱ्या कीटकांना तसेच विषाणूंना आपल्यापासून दूर ठेवण्याचेही काम तांबे करते. यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी आणि तांब्याची अंगठी दोन्ही आरोग्यदायी मानले जाते.

० तांब्याची अंगठी कोणत्या बोटात घालावी.. ?

शास्त्रानुसार तांब्याची अंगठी रविवारी डाव्या हाताच्या अनामिकेत घालणे योग्य मानले जाते. यामुळे एकतर शास्त्रलिखित फायदे होतात आणि याशिवाय आरोग्यविषयकदेखील फायदे होतात.

तांब्याची अंगठी परिधान करण्याचे आरोग्यदायी फायदे
(Copper Ring Benefits)

१) रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते –

Immunity

उत्तम आरोग्यासाठी शरीरात कॉपरची मात्राही इतर पोषक तत्वांप्रमाणे संतुलित असणे आवश्यक आहे. यासाठी तांबे अतिशय लाभदायी धातू सिद्ध होतो. तांब्याची अंगठी परिधान केल्यास शरीरात कॉपरची कधीच कमतरता जाणवत नाही. यामुळे बरेच रोग आणि विषाणू शरीरापासून दूर राहतात. शिवाय शरीरातील कॉपरची कमतरता दूर झाल्यास रोग प्रतिकार शक्तीही बळावते. (Copper Ring Benefits)

२) शरीरातील दाह कमी होतो –

Sweat In Summer

अनेकांच्या शरीरात अतिशय उष्णता असते आणि यामुळे त्यांना तोंड पोळणे, छातीत जळजळ, ऍसिडिटी असे त्रास वारंवार जाणवतात. यासाठी तांब्याची अंगठी गुणकारी आहे. तांब्याची अंगठी परिधान केल्यामुळे तांबे शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषून घेते. परिणामी शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होते.

३) रक्त शुद्ध होते –

Blood

(Copper Ring Benefits) तांब्याची अंगठी अनामिकेत घातल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुव्यस्थित पार पडते. शिवाय तांबे हा धातू रक्त शुद्ध करण्याचे काम उत्तम रित्या करतो. त्यामुळे तांब्याची अंगठी प्रभावीरीत्या शारीरिक समस्यांमध्ये लाभकारी आहे. तांब्याची अंगठी घातल्याने ती सतत शरीराच्या संपर्कात येते आणि यामुळेच शरीराला तिचे औषधी गुण मिळतात.

४) उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबाच्या समस्येवर परिणामकारक –

high BP

तांब्याची अंगठी अनामिकेत परिधान केल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो. ज्या लोकांना उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी तांब्याची अंगठी घालणे फायदेशीर आहे. याशिवाय तांब्याच्या अंगठीमुळे शरीरावरील सूजही कमी होते.

५) असंतुलित हार्मोन्सवर गुणकारी –

तांबे धारण केल्यास शरीर शुद्ध राहण्यास मदत होते. कारण हा धातू मुळातच शुद्ध असल्यामुळे त्याचा शरीराशी सतत संपर्क आल्यास शरीरातील विष बाहेर फेकले जाते. याशिवाय तांब्याची अंगठी असंतुलित हार्मोन्सवरदेखील प्रभावीपणे काम करते. त्यामुळे स्त्रियांचे हार्मोन संतुलित राखण्यास मदत होते. (Copper Ring Benefits)

६) सांधेदुखीवर प्रभावी –

Leg Pain

तांब्यात अँटी ऑक्सीडेंटची मात्रा जास्त असते. यामुळे अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. तांबे धातूचा सतत शरीरासोबत संपर्क झाल्यास सांधेदुखी कमी होते आणि रक्ताच्या गाठीही मोकळ्या होतात. शिवाय हे अँटी ऑक्सिडेंट अनेक रोगांपासून मुक्ती देतात.

७) पोटाच्या विकारांपासून सुटका –

Stomach Pain

तांब्याची अंगठी पोटासंबंधीत सर्व समस्यावर गुणकारी आहे. अगदी पोटदुखी, अपचन, ऍसिडिटी आणि अगदी बद्धकोष्ठता यासारख्या समस्येवर तांब्याची अंगठी गुणकारी आहे. तांब्याची अंगठी घातल्याने ऑसिडिटी आणि पोटासंबंधी समस्यांची निर्मितीच होत नाहीत. तांब्याची अंगठी घातल्याने शरीराच्या दुखण्यासोबत पोटदुखी कमी होते. शिवाय पचनक्रिया सुरळीत होऊन पोटाच्या विकारांपासून सुटका होते. (Copper Ring Benefits)

८) मन आणि डोकं शांत राहतं –

तांबे शांत प्रकृतीचा धातू असल्यामुळे उग्रपणा, उग्रभाव तो उत्सर्जित करतो. म्हणून तांब्याची अंगठी धारण केल्यास मन शांत राहते. तसेच संताप येण्याची तीव्रताही कमी होते. (Copper Ring Benefits) मुख्य म्हणजे शीघ्रकोपी, तापट आणि आक्रमक व्यक्तींचे विचार संयमित करण्यासाठी तांबे धातू अतिशय प्रभावीपणे कार्य करतो.

९) अनियंत्रित राग आणि चिडचिडवर नियंत्रण –

Anger

बदलती जीवनशैली नैराश्य आणते आणि नैराश्याची सुरुवात तणावापासून होते. या तणावामुळे प्रत्येक मिनिटा मिनिटाला राग येतो, चीडचीड होते. अशावेळी तांब्याची अंगठी लाभदायक मानली जाते. शरीरातील उष्णतेसोबत राग नियंत्रित करायचा असेल तर तांब्याची अंगठी घालणे फायदेशीर आहे. यामुळे नकारात्मक विचार येत नाहीत. मन आणि डोकं शांत राहतं. ज्यामुळे ताण येत नाही आणि परिणामी रागही कमी येतो.

१०) तजेलदार त्वचा –

Skin

जर तांबे हा धातू सतत त्वचेच्या संपर्कात आला तर आपल्या त्वचेची चमक हळूहळू वाढते. तोंड धुताना हाताच्या अनामिकेतील अंगठी चेहऱ्याच्या संपर्कात आली तर चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊन चेहरा तजेलदार राहतो. (Copper Ring Benefits)

‘हे’ पण वाचा :-

Mens Health Care: पुरुषांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 7 टिप्स फायदेशीर; जाणून घ्या

Ashwagandha Benefits: पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर गुणकारी ‘अश्वगंधा’; जाणून घ्या फायदे

Sleeping Hours : तुम्हाला किती झोपेची गरज आहे..?; लगेच जाणून घ्या

Heart Care: मृत्यू देणारा हार्ट अटॅक टाळता येईल..? हो..पण कसा..?; जाणून घ्या