कोरोना व्हायरस! मास्कचे कार्य, प्रकार व ते वापरण्याची शास्त्रोक्त पद्धत
हॅलो आरोग्य ऑनलाईन : १९९४ साली हॉलिवूड चा ‘द मास्क’ हा विनोदी चित्रपट किती जणांनी पाहिला आहे? ज्यांनी पाहिला नाही त्यांनी आवर्जून बघावा, लई भारी आहे. ज्यांनी पहिला आहे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले असेल. निखळ मनोरंजन यापेक्षा वेगळे आणखी काय असू शकते असे वाटून जाते. आपल्याला सध्या या सिनेमाच्या स्टोरी मध्ये जायचे नाही. पण थोडक्यात सांगतो कि, त्यामध्ये एक मास्क दाखवला आहे. नायक तो मास्क परिधान करतो विविध करामती करून दाखवतो आणि खलनायकावर नायक मास्कच्या माध्यमातून मात करतो असे एकंदरीत कथानक आहे. तर आता मूळ विषयाकडे येऊ या चित्रपटाप्रमाणे आपल्याकडे पण असा एक मास्क असावा असे नेहमी वाटायचे. पण ते स्वप्न एवढ्या वाईट पद्धतीने पूर्ण होईल असे वाटले नव्हते. या कोरोना व्हायरस ने मास्क घालण्याचे स्वप्न पूर्ण केले म्हणायचे. सध्यातरी मास्कशिवाय कुठेही फिरता येत नाही आणि विनामास्क फिरताना पोलीसांना सापडल्यावर काय होते ते सूज्ञास सांगणे न लगे!!!
😷Masks during #COVID19: Who should wear them, when and how ⬇️pic.twitter.com/wCCaZu79PB
— World Health Organization (WHO) (@WHO) April 18, 2021
करोना संकटकाळात आता सगळी शहरे अनलॉक झाली होती. त्यामुळे रोज घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली. करोना संसर्गापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझर वापरणे आणि मास्क वापरणे या अत्यावश्यक बाबी बनल्या आहेत. कमी झालेली कोरोना बाधितांची संख्या दुसऱ्या लाटेत हजारो पटींनी वाढली. पुन्हा एकदा सरकारने बंधने घातली आहेत. पुन्हा लॉक डाउन झाले आहे. त्यातही बाहेर पडताना तसेच कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने वापरण्यात येणारे मास्क तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. गेल्या एका वर्षापासून कोरोना व्हायरसने सगळ्यांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. कोरोनाच्या या लढयात मास्कचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे केला जात आहे. कोविड १९ साठी मेडिकल मास्क आणि फॅब्रिक मास्क हे एक महत्त्वपूर्ण सावधगिरीचे उपाय आहेत. दररोज संसर्गाचा आलेख वाढत असताना, आरोग्य तज्ञ् मास्क याच्यासह इतर उपाययोजनामधील निष्काळजीपणा न करण्याचे आवाहन करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या पोस्टमध्ये मास्क कसे घालायचे हे स्पष्ट केले आहे. हे तुम्हाला माहीत आहे? चला तर, जाणून घेऊयात मास्क वापरताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या प्रकारचा मास्क वापरावा….
सर्जिकल मास्क / मेडिकल मास्क
ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने असा सल्ला दिला आहे की या प्रकारचे मास्क घालावे. आरोग्य कर्मचारी, ज्या लोकांना कोविड १९ ची लक्षणे आहेत. तसंच कोविड १९ चा संसर्ग झालेल्या एखाद्याची काळजी घेत असलेले लोक, ज्या ठिकाणी विषाणूचा व्यापक प्रसार झाला आहे अशा ठिकाणी मेडिकल मास्क वापरावे आणि कमीतकमी एक मीटर अंतर लोकांपासून ठेवायला हवे. लोक 60 किंवा त्यापेक्षा वयानं आहेत तसंच ज्यांना इतर कोणतेही आजार असतील त्यांनी या प्रकारचे मास्क वापरायला हवेत. मेडिकल मास्क एकदाच वापरतात. वापर झाल्यानंतर दररोज कचऱ्यामध्ये फेकणे अपेक्षित आहे. मेडिकल मास्कला सर्जिकल मास्क देखील म्हटले जाते,
फॅब्रिक्स मास्क
जगात मेडिकल मास्कची कमतरता असताना असे मास्क पूरक म्हणून उदयास आले आहेत. डब्ल्यूएचओने सूचित केले की कोविंड-१९ ची लक्षणे नसलेल्या लोकांना फैब्रिक मास्क घालता येतात. यात सोशल वर्कर्स, कॅशिअर यांच्याशी जवळीक साधणारे लोक देखील समाविष्ट आहेत. वाहतूक, कामाच्या ठिकाणी किराणा दुकान आणि इतर गर्दी असलेल्या वातावरणात सार्वजनिक ठिकाणी फॅब्रिक मास्क घालावेत. तर फॅब्रिक मास्क पुन्हा वापरण्यायोग्य असतो. फॅब्रिक मास्क प्रत्येक उपयोगानंतर कोमट पाण्याने धुणे आवश्यक आहे
आपला मास्क विचारपूर्वक निवडा!
सर्व प्रकारचे मास्क सारख्याच प्रमाणात सुरक्षित असतील असे नाही. विविध प्रकारच्या मास्कविषयी जाणून घ्या.#NaToCorona pic.twitter.com/HiT5ZkJqjJ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 30, 2021
मास्कचा वापर नक्की कसा करावा
कारोना विषाणूचा कण हा 0.12 मायक्रोमिटर आकाराचा असतो. घरगुती मास्क बनवण्याचे कापड हे 80-500 मायक्रोमिटर छिद्र असणारे कापड असते. आपण सगळेच घरगुती फेस मास्क, सर्जिकल फेसमास्क, वन टाईम युज मास्क अजून बरेच विविध मास्क वापरतो. पण या जंतूंना लांब ठेवणाऱ्या फेसमास्कबद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहीत नाहीत. – घरगुती मास्क बनवताना टी-शर्ट किंवा किचन टॉवेल पासून मास्क बनवा. हे कपडे जाड असतात व इतर कपड्यांच्या तुलनेत यांचे पोअर्स लहान असतात व जंतू, कण यांना इतर कपडा पेक्षा जास्त गाळून घेतात.
मऊ उशीच्या खोळी पासून सुद्धा मास्क बनवता येऊ शकतो. मास्क बनवताना, त्याचे इलॅस्टिक नीट, माप घेऊन घट्ट शिवा. आजूबाजूने हवा जाईल अशी जागा ठेऊ नका. कारण या गॅप मुळे मास्क वापरून सुद्धा न वापरल्या सारखेच होईल. आणि तुमच्या शरीरात विषाणूंचा प्रवेश विनासायास होईल.
मास्कची अदलाबदली ही चूक परिवारातील सदस्य नेहमीच करतात. एकाच परिवारात राहणारे सदस्य एकमेकांचे मास्क शेअर करतात. ही अतिशय चुकीची आणि घातक सवय आहे. लक्षात ठेवा, करोना व्हायरसचे 50 टक्क्यांहून अधिक प्रकरणात व्यक्तीमध्ये करोनाचे लक्षण दिसत नाहीत. अशात मास्कची अदलाबदली व्हायरस पसरण्याचे कारण ठरू शकते.
कापसाच्या 2 घड्या करून मास्क शिवा. डबल लेयर्स मुळे पर्टीकल्स जास्त संख्येत गाळले जातात. घरगुती मास्क शिवताना आतून, पेपर टॉवेल चे कोटींग करा. पेपर टॉवेल चे मायक्रोपोअर्स बऱ्याच प्रमाणात सूक्ष्म असतात त्या मुळे हे टॉवेल 23% जास्त कण रोखून धरतात आणि आपल्या सुरक्षेत वाढ होते. तसेच एकदा वापरलेले मास्क पुन्हा न धुता वापरू नका. मास्कला उलट सुलट करून अजिबात वापरू नका. एकदा वापरलेले मास्क डिसइन्फेक्ट करून मगच वापरा.
जवळपास 99 टक्के लोकं मास्कला वारंवार हात लावतात ही चूक तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. बरेचजण मास्क लावल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने काढतात आणि परत लावतात. असे केल्याने तुम्ही मास्क लावण्याचा मूळ हेतू साध्य करू शकत नाही.