|

कापडी मास्कच आहे कोरोनावर प्रभावी

हॅलो कोरोना ऑनलाईन । काही महिन्यांपासून देशभरात नव्हे तर साऱ्या जगभरात कोरोनाच्या संसर्गाने बळी गेलेल्या लोकांची संख्या हि जास्त आहे. अनेक देशामध्ये कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. कोरोनावर उपाय म्हणून मास्क चा वापर केला जात आहे. मास्क वापरल्याने कोरोनापासून संरक्षण होण्याचे प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. पण एका अभ्यासानुसार कोरोना ला रोखण्यासाठी मास्कच प्रभावी ठरत आहे.

बाजारात अनेक प्रकारचे मास्क दिसत आहेत. पण सगळ्या मास्क पेक्षा कापडी मास्क हे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरस ठरत आहेत हे सिद्ध करण्यासाठी काही पुरावे सापडले आहेत. अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या नव्या संशोधनानुसार, ९९.९ टक्के संक्रमित सूक्ष्म-थेंबांचा प्रसार रोखण्यासाठी घरगुती कपड्यांचे मास्क प्रभावी ठरत असून अशा थेंबांचा प्रसार १०० टक्यांपर्यंत रोखण्यासाठी हे मास्क प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, एखाद्या व्यक्ती हा मास्क घातलेल्या व्यक्तीपासून सहा फूट अंतरावर उभा राहिला असता. त्याला कोरोना संक्रमणाचा असलेल्या व्यक्तीच्या संक्रमणाचा धोका मास्क घातलेल्या व्यक्तीपासून १.५ फूट अंतरावर उभे राहण्यापेक्षा १००० पट जास्त संक्रमण होते. एडिनबर्ग युनिव्हर्सिटीच्या रोझलिन इन्स्टिट्यूटच्या टीमने म्हटले आहे की, या संशोधनात असे सूचित केले आहे की संक्रमित व्यक्तीने मास्क घालण्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो.

प्रीप्रिंट सर्व्हर मेडआरएक्सआयवी डॉट ओआरजीवर प्रकाशित झालेल्या अभ्यासासाठी, त्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीमने दोन प्रकारचे मास्क घेतले: सर्जिकल मास्क आणि सूती कपड्याचा मास्क. या मास्कवर, पुतळ्यांच्या तोंडातून बाहेर येणारे थेंब आणि माणसांचा खोकला किंवा बोलण्यातून तोंडाद्वारे बाहेर पडणाऱ्या थेंबांची चाचणी केली गेली. जेव्हा पुतळ्याने दोन्ही मास्क परिधान केले त्यानंतर एयरोसोल स्प्रे करण्यात आले तेव्हा १००० पैकी फक्त एक थेंब बाहेर आला. कापडी मास्क इतके प्रभावी आहे कि , त्यातून काही प्रमाणात कण बाहेर आलेत. त्याच वेळी, जेव्हा माणूस मास्कशिवाय खोककला तेव्हा हजारो सूक्ष्म थेंब हवेत पसरल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कोरोना काळात लस मिळेपर्यंत साधा कपड्याचा जरी मास्क वापरला तरी त्यातून आपण कोरोना आजरापासून बचाव होऊ शकतो.