पाय दुखणे म्हणजे हार्ट अटॅक असू शकतो का ?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक वेळा आपल्याला कोणताही आजार ज्यावेळी होत असतो, त्याच्या पूर्वी आपल्याला आपल्या शरीराकडून छोटे मोठे संकेत मिळालेले असतात. अगदी आजाराचे प्रमाण छोटे असो कि मोठे असो आपल्याला काही प्रमाणात तरी आपल्याला होणारा त्रास हा जाणवू शकतो. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हार्ट अटॅक म्हणजे छातीत दुखणे होय असे म्हंटल जात. पण फक्त छातीत दुखण्याने हार्ट अटॅक येत नाही. त्याच्याबरोबर पायाच्या समस्या पण जाणवायला सुरुवात होते.
आरोग्याशी संबंधित छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार हा केला गेला पाहिजे नाहीतर आपल्याला मोठ्या समस्यांना सामोरे जायला लागू शकते. काही प्रमाणात जर लक्षणे दिसली तरी लगेच डॉक्टरांचा सल्ला हा घेतला पाहिजे. छातीत दुखणे हे हार्ट अटॅक चा पहिला संकेत आहे. त्यानंतर आपल्या पायांना सुद्धा त्रास जाणवायला सुरुवात होते. रक्तवाहिन्यांमधून रक्ताभिसरण क्रिया हि व्यवस्थित रित्या होत नाही. पायांची रक्तवाहिनी हि प्लाक मुले बंद पडते त्यामुळे रक्ताभिरण व्यवस्थित होत नाही.
हार्ट अटॅक च्या काळात आपल्या पायांच्या खालच्या भागात वेदना होण्यास सुरुवात होते. तसेच खालच्या भागातील कोणत्याही स्नायूंची हालचाल हि अजिबात केली जात नाही. यालाच वैज्ञानिक भाषेत त्याला ‘पेरीपेरीक आर्टरीज’ असे म्हणतात. ज्यावेळी आपण व्यायाम करायला सुरुवात करू अश्या वेळी सुद्धा आपल्या पायांच्या पोटरीचा भाग हा जास्त दुखायला सुरुवात होते. आपल्या पायांच्या कोणत्याही भागात जर फोड आला तर मात्र आपल्याला त्रासदायक ठरू शकते. कारण फोड आलेल्या भागेत बॅक्टरीया या त्रास द्यायला सुरवात करतील . जे लोक सतत आपल्या पायांत बूट घालून जातात. त्यांनी रात्रीच्या वेळी कोमट पाण्यात मिठाचे काही खडे टाकून पाय बुडवून ठेवा. त्यामुळे पायांची सूज हि बरीच कमी केली जाते. श्वसन नलिकेत जरी कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर मात्र लवकर औषधोपचार सुरु केला जावा.