Diabetes Control Yoga

Diabetes Control Yoga | डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी ‘ही’ योगासने करायलाच पाहिजे, वाचा सविस्तर

Diabetes Control Yoga | आजकाल प्रत्येक घरात शूगर ,रक्तदाब तसेच वजन वाढीचा आजार असणारे अनेक लोक असतात. यासाठी ते वेगवेगळे उपाय करत असतात. परंतु तरीदेखील काहीच फायदा होत नाही. त्यामुळे आपल्याला जर निरोगी जीवन पाहिजे असेल, तर योगासन करणे खूप महत्त्वाचे आहे. या वयामध्ये आपले शरीर आणि मन देखील हलके होते. तसेच उत्साह वाढतो आणि रोगराई आपल्यापासून दूर राहते परंतु आपण हे सगळे करण्याचा खूप आळस करतो.

आणि याबद्दलच डॉक्टर भोकर यांनी सांगितले आहे की, व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे. आणि तो प्रत्येकाने केला पाहिजे प्रामुख्याने ज्या लोकांना मधुमेह आहे. त्या रुग्णांनी योगासने केलीच पाहिजे त्यांना याचा लाभ होईल. याबाबत त्यांनी सर्वसामान्य लोकांना पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.

हेही वाचा – Ghee Benefits | रोज एक चमचा तूप खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे, आरोग्य तज्ञांनी दिली महिती

मधुमेहासाठी दररोज योगासने करावीत का? | Diabetes Control Yoga

यावर त्यांनी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज योगासने करण्यात त्यांचा महत्त्वाचे आहे. मात्र त्यासाठी वेगवेगळे योगासन उपयोगाची नाही काही ठराविक असणे योग्य परिणाम साधू शकतात त्याबद्दल त्यांनी माहिती दिली.

गुडघेदुखीसह योगा करू शकतो का

जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर गुडघ्यांवर दबाव येणारी योगासने टाळा. त्यामुळे योगासने नीट जमणार नाहीत आणि चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे गुडघ्यांवर दाब आल्याने गुडघेदुखीवर पडेल.

योगा करण्यासाठी प्रशिक्षकाची गरज आहे का?

योगासनांचा सराव तुम्ही स्वतःहून योग्य प्रकारे करू शकता. परंतु जर तुम्ही नवीन असाल तर योग्य प्रशिक्षकाचा शिवाय योगा साधना करू नका. कारण योगा केवळ हाता पायांचा व इतर अवयवांचा ताळमेळ नाही. तर श्वसनाचा देखील अभ्यास असतो. ते योग्य प्रकारे झाले तरच योग्य साधनाचा तुम्हाला लाभ होतो. मधुमेहाच्या रुग्णांना मदत करणाऱ्या सोप्या योगासनांची यादी व त्यांचे महत्त्व ही योगासने नियमितपणे केल्यास मधुमेहाच्या रुग्णांना त्याचा फायदा होतो ही जास्त न मेहनत घेणारी योगासने आहेत.

कपालभाती प्राणायाम

कपालभाती प्राणायाम आपल्या मज्जासंस्था आणि मेंदूच्या मज्जातंतूंना ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे प्राणायाम महत्त्वाचे आहे कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. पचन संस्था सक्रिय होते. साखर नियंत्रणात राहते. या प्राणायामने मनाला शांती मिळते.

सुप्त मत्स्येन्द्रसन

सुप्त मत्सेंद्रयासन अन्न पचन करण्यास मदत करते. हे आसन मधुमेह रूग्णांसाठी खूप चांगले आहे.

धनुरासन

या आसनामुळे स्वादुपिंड सक्रिय होण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांना अत्यधिक फायदेशीर ठरते.

पश्चिमोत्तानासन

हे आसन ओटीपोटातील अवयवांना सक्रिय करते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. पश्चिमोत्तानासन शरीरातील महत्वाची उर्जा वाढवते आणि मनाला शांती प्रदान करते.

अर्ध मत्स्येंद्रासन

हे आसन ओटीपोटाच्या अवयवांची मालिश करते आणि फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते. अर्ध मत्स्येंद्रासन मणक्याला देखील बळकट करते. हे योग आसन केल्याने मन शांत होते.

शवासन

शवासन संपूर्ण शरीराला विश्रांती देते. हे आसन एखाद्या व्यक्तीला खोल मन: स्थितीत नेते, ज्यामुळे मन शांत होते आणि नवीन उर्जेने परिपूर्ण होते.