diabetes
|

साथीच्या आजारासारखा पसरतोय ‘मधुमेह’; जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर

हॅलो आरोग्य ऑनलाईन। स्वादुपिंडातील पेशींमधून इन्सुलिन नावाचे हार्मोन रक्तामध्ये सतत वाहत असते. या इन्सुलिनचा पुरवठा काही विशिष्ट कारणांमुळे कमकुवत झाला वा नाहीसा झाला तर रक्तातील साखर नेहमीच्या प्रमाणापेक्षा जास्त वाढते. दरम्यान रक्तातील साखर अनियंत्रित होणे या स्थितीला ‘मधुमेह’ असे म्हणतात. डॉ अमित धाक्रस, कराड यांनी सांगितल्याप्रमाणे मधुमेह आजार भयंकर आहे मात्र आपण ठरवलं तर यावर नियंत्रण ठेवू शकतो. पण याकरिता मधुमेहाविषयी सर्व माहिती असणे आवश्यक आहे. हीच माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० मधुमेहाची लक्षणे :-

वारंवार लघवी लागणे, तहान भूक वाढणे, वजन घटणे, चीडचीड होणे, अशक्तपणा/ थकवा येणे, कधीकधी उलट्या होणे, शरीरावर पुरळ उठणे, अंगाला खाज येणे, वयस्कर रुग्णांमध्ये दृष्टीदोष वा अंधत्व येणे, हातापायांना मुंग्या येणे, कातडी सेप्टिक होणे, जखम भरण्यास वेळ लागणे, सांधेदुखी होणे, रात्रीच्या वेळी पोट-यांमध्ये पेटके येणे.

मधुमेहींसाठी आवश्यक तपासणी :-

Diabetes

लघवी (Urin)

रक्तशर्करा (Blood Group)

युरिया (Urea)

हृदयाचा विद्युत स्पंदन आलेख (ECG)

छातीचा एक्स स्पंदन आलेख (X-ray)

या व्यतिरिक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक इतर तपासण्या जरुर कराव्यात.

० मधुमेहाची काळजी का करावी..?

कारण मधुमेहामुळे, वंध्यत्व येते. मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते. अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त असू शकते. रोग प्रतिकारशक्ती कमी होते. हातपाय बधीर होतात. न भरून येणा-या जखमांमुळे शरीरात जंतूंचा प्रादुर्भाव (Septic) वाढतो.

० मधुमेहींनी घ्यावयाची काळजी:-

नियमित व्यायाम

संतुलित आहार

शरीराचे वजन नियंत्रित ठेवणे

० हे नियम पाळायला हवेच

1. जेवण ठरवून दिलेल्या वेळेवरच घेणे.

2. उपवास बंद

3. रोज कमीत कमी १ किलोमिटर चालणे

4. जागरण करू नये.

5. रात्रीची किमान ६ ते ७ तास झोप आवश्यक

6. लघवीतील व रक्तातील साखर महिन्यातून किमान १ वेळ तपासणे आवश्यक

7. वर्षातून १ वेळ ई.सी.जि (ECG) तपासणी करावी

प्रत्येक पेशंटसाठी वरील सूचनांमध्ये डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे वेळोवेळी बदल होऊ शकतो.

० ‘इन्सुलिन रेझीस्टन्स’ (प्रतिरोध) म्हणजे काय ?

इन्सुलिन हा 'स्टोरेज हार्मोन' आहे. तो रक्तातील साखर पेशीमध्ये ओढतो आणि चरबी स्वरुपात साठवतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित कारण्यासाठी शरीर स्वनिर्मित इन्सुलिनसाठी कमी संवेदनशील बनते. वाढत जाणा-या रक्तातील साखरेला नियंत्रित करण्यासाठी शरीर स्वादुपिंडातील 'बीटा सेल्स'ला अधिक इन्सुलिन निर्माण करण्यासाठी उत्तेजित करते. ज्यामुळे हि वाढलेली रक्तातील साखर नियंत्रित होऊ शकेल. हि वाढलेली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित जरूर करते. पण यामुळे आरोग्याच्या बाबतीत आणखी काही समस्या उदभवतात. खाली दिलेल्या यादीत या समस्या निर्देशित केल्या आहेत.
१) हृदयविकाराचा झटका
२) पक्षाघात उदभवतो.
३) उच्चरक्तदाब (हायपरटेन्शन)
४) ट्रायग्लीसेराईडस पातळी वाढते (कोलेस्ट्रोल शिवाय दुस-या प्रकारची चरबी)) HDL (चांगले) कोलेस्ट्रोल वाढते
६) LDL (वाईट) कोलेस्ट्रोल वाढते
७) रक्तात गुठळ्या होतात
८) वजन वाढते

० तुम्हाला मधुमेह नसला तरीही….

मधुमेह हा आजार एक मोठी आरोग्य समस्या आहे. याचे दुष्परिणाम खूप भयंकर आहेत! त्यामुळे तुम्हाला मधुमेह नसला तरीही काळजी घ्या. शिवाय तुमच्या संपर्कात कुणाला मधुमेह असेल तर त्या व्यक्तीची आरोग्यविषयक काळजी घ्या. याचे कारण म्हणजे मधुमेहामुळे मूत्रपिंडाचे आजार होतात. याशिवाय हृदय विकाराचा झटका, पक्षाघात, पेरिफेरल डिसीज, अंधत्व यांचेही कारण मधुमेह हेच आहे. एखाद्या साथीच्या आजारासारखा मधुमेह पसरतो. त्यामुळे कमी वयातच याची लागण होऊ शकते हे लक्षात घ्या आणि आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. कारण आपण वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करून हा आजार होण्याचा धोका कमी करू शकतो.