पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे आसन करा
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या दररोज च्या कामकाजात जर आपण आपल्या पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर अश्या वेळी आपल्या आहारात काही बदल करणे हे जास्त गरजेचे आहे . तसेच दररोज काही वेळ व्यायाम करणे सुद्धा आवश्यक आहे . आपल्या दररोज च्या दिनक्रमात काही वेळ हा व्यायाम करण्यास दिला गेला पाहिजे . काही आसने सुद्धा आपल्या पोटाच्या चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करते . जाणुस्पर्शासन या आसनाचे अनेक फायदे आहेत. त्याच्या मदतीने आपल्या पोटावरील चरबी कमी करू शकतो. हे आसन कसे करावे याबाबत माहिती घेऊया …
पोटाची चरबी कमी करण्यासाठी जाणुस्पर्शासन हे दंडात्मक आसन आहे . हे आसन लगेच एका दिवसांत जमणार नाही. त्याला हवी तेवढी लवचिकता लगेच आपल्या शरीराला मिळणार नाही. त्यासाठी दररोज काही वेळ हा या आसनाला दिला गेला पाहिजे . हे आसन करताना नेहमी मांडी घालून बसले पाहिजे. समोरचे दोन पाय एक एक करून समोर ठेवा त्यानंतर हळू हळू आपल्या डोक्याचा भाग हा पायाकडे वळावा . काही ठराविक वेळानंतर आपले डोके हे गुडघ्याला टेकले जाईल. त्यावेळी तुम्ही दीर्घ श्वास घ्या. हळूहळू आपले डोके वर उचला . हे आसन त्यावेळीच करू शकता, ज्यावेळी तुमचे शरीर हे अतिशय लवचिक बनेल .
या आसनाचे अनेक फायदे आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत ते जाणून घेऊया … आसन केल्याने आपल्याला पोटाच्या समस्या या जास्त निर्माण होणार नाहीत . आपल्याला अन्न पचनाच्या समस्या या जास्त निर्माण होणार नाहीत . पोटाचे चरबीचे प्रमाण हे कमी करण्यास हे आसन फार लाभकारक आहे. ज्या लोकांना दमा हा जास्त आहे, त्या लोकांनी दररोज च्या दिनक्रमात सुद्धा आसनाचा वापर हा करावा. हे आसन गुडघेदुखीला सुद्धा अराम मिळण्यास मदत करते .