Do this bridal makeup for wedding preparations
|

लग्नाच्या तयारीसाठी असा करा ब्रायडल मेकअप

हॅलो आरोग्य  ऑनलाईन । मुलीच्या जीवनात बदल हा लग्नानंतर खूप भरभर हा होतात. लग्नासाठी मुली या फार उत्सुक असतात. अनेक जणी आपल्या लग्नात आपण कसे दिसले पाहिजे, कश्या रंगाचा पेहराव हा केला गेला पाहिजे याची परिपूर्ण तयारी अगोदरच मनातल्या मनात सुरु असते. लग्नाच्या तयारीसाठी आपण काय काय खरेदी करायचे याचे त्यांच्याकडे अगोदरच माहिती असते पण अचानक लग्नाच्या वेळी मात्र खूप गडबड होऊन त्यातले काहीच करता येत नाही. पण अश्या वेळी या अगोदर कशी तयारी करावी याची माहिती घेऊया …

लग्नाच्या अगोदर कमीत कमी ५ ते ६ महिने सगळ्या ट्रीटमेंट करायला पाहिजे . त्यासाठी काही प्रमाणात स्किन रुटीन फोल्लो करणे आवश्यक आहे. स्किन रुटीन मध्ये मध्ये दररोज झोपताना आपल्या चेहऱ्याला टोनिंग , मॉईशराइज, क्लिंझिंग करायला विसरू नये. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक वेगळीच चकाकी यायला सुरुवात होते. चेहऱ्यासाठी मुलतानी माती किंवा चंदन यांचा लेप आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर खूप चांगल्या पद्धतीने चकाकी येऊ शकते.

केसांची निगा —

लग्नाच्या वेळी जर तुमचे केस लांब आणि मजबूत असतील तर वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या हेअर स्टाईल तुम्ही करू शकता . त्यामुळे तुमच्या सौदर्यात खूप छान फरक जाणवू शकतो. आपले केस हे ज्यापद्धतीने पेहराव असेल त्यापद्धतीने तयार केले तर ते अजून सुंदर दिसायला मदत होते. त्यामुळे चेहरा हा अजून खुलून दिसायला मदत होऊ शकतो.

हातापायांची निगा —

लग्नाच्या वेळी हात आणि पाय अश्या सगळ्या ठिकाणी मेहंदी हि काढली जाते . त्यामुळे हात आणि पाय हे दिसले जातात. अश्या वेळी तुमचे हात आणि पाय जर व्यवस्थित नसतील तर मात्र आपल्या सौदर्यात कमीपणा दिसायला सुरुवात होते त्यामुळे हात आणि पायांचे सौदर्य हे टिकवण्यासाठी मॅनिक्युअर आणि पेडिक्यूर करून काळजी घेतली पाहिजे तर कधी कधी घरगुती उपाय करून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकता.