गोबऱ्या गालांसाठी ‘हे’ व्यायाम करा आणि मिळवा आकर्षक गालं; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। गोल मटोल आणि गोबऱ्या गालाची लहान मुलं दिसायला अतिशय गोड दिसतात. पण असे गाल जर तुमचे असतील तर तुम्हाला तुमचेच मित्र न जाणे काय काय चिडवतात. अश्यावेळी अनेकदा आपण आपला आत्मविश्वास गमवायला लागतो. आपले गालं चेहऱ्याच्या सुंदरतेचा एक भाग असल्यामुळे ते आकर्षक असावे असे प्रत्येकाला वाटते. तर मित्रांनो तुमचे गाल गोबरे आहेत म्हणून न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसे सारे असू शकत नाही. त्यामुळे स्वतःला सांगा कि तुम्ही सुंदर आहात. मात्र आपले गालं काही प्रमाणात गोबरे असणे ठीक आहे. पण जर गालांमुळे चेहऱ्यावरचे फॅट वाढत असल्याचे निदर्शनास आले तर काळजी करू नका व्यायाम करा. आता चेहऱ्यावरचा फॅट घालवण्यासाठी काय व्यायाम करणारं? तेच आज आपण जाणून घेणार आहोत. अगदी सोप्प्या अशा ५ व्यायाम पद्धती देऊ शकतात सुंदर आणि आकर्षक गालं जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) सिंह मुद्रा – सिंह मुद्रा चेहऱ्याच्या सर्व स्नायूंना उत्तेजित करते आणि टोन करते. यामुळे चेहऱ्यावरील फॅट कमी करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
– यासाठी आपले गुडघे जमिनीवर आरामात टेकवा. आता आपले तळवे आपल्या मांडीवर ठेवा आणि मान वरच्या दिशेला ताणून जीभ बाहेर जोरात ताणून घ्या. जमेल तितके जिभेचे स्ट्रेचिंग करा. हे करताना, श्वास सोडा आणि सिंहाप्रमाणे गर्जना करा.
२) फिश फेस – तुम्ही पाऊट सेल्फी करत असाल तर तुमच्यासाठी हे फारच सोपं आहे. कारण यामुळे चेहरा टोन होतोच. शिवाय गालाचे स्नायू ताणल्याने अनावश्यक फॅट कमी होते.
– यासाठी सर्वात आधी माशाप्रमाणे गाल आणि ओठ आत ओढून पाऊट करा. या स्थितीत हसण्याचा प्रयत्न करा. याचा जलद परिणाम हवा असेल तर दिवसभर या व्यायामाची पुनरावृत्ती करा.
३) जिव्हा बंध (बंद जिभेची मुद्रा) – हा व्यायाम चेहरा टोन करण्यासाठी आणि जबड्याला आकार देण्यासाठी सहाय्यक आहे.
– यासाठी जमिनीवर आरामात बसून जिभेचे टोक तोंडाच्या वरच्या टाळूला लावून तोंडाचा ओ आकार बनवा. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मानेचा ताण जाणवत नाही तोपर्यंत जीभ अशाच स्थितीत ठेवा. दिवसातून हा व्यायाम ४-५ वेळा करा आणि फरक पहा.
४) जालंधर बंध (हनुवटीचे कुलूप) – हा व्यायाम चेहऱ्याला आकार देतो आणि जबडयाच्या स्नायूंना सक्रिय करतो.
– यासाठी कमलासनात बसा आणि खोल श्वास घ्या. आता हात गुढघाला लावून खांदे वर करा आणि पुढे वाकवा. यानंतर कॉलर हाडांच्या मध्ये छातीवर आपली हनुवटी घट्ट रोवून शक्य तोपर्यंत श्वास रोखा. यानंतर श्वास हळुवार सोडा आणि ३० सेकंद आराम करून पुन्हा हीच कृती करा.
५) असा करा माउथवॉश – माऊथवॉश गाल टोन करतो आणि दुहेरी हनुवटीपासून मुक्त होण्यास मदत करतो.
– यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही माउथवॉश वापरून तोंड स्वच्छ करता. त्याप्रमाणे तुमचे तोंड हवेने भरा आणि तुमच्या तोंडाच्या एका बाजूपासून दुसर्या बाजूला हवा सरकवा. असेच थोडा वेळ करत राहा आणि ३० सेकंद आराम करून पुन्हा हीच कृती करा.