वजन कमी करायचंय? मग हा डाएटचार्ट फॉलो करा; जाणून घ्या किती वाजता काय खालं?
हॅलो आरोग्य ऑनलाईन। दिवसभराचं रुटीन आणि त्यानंतरही एनर्जेटिक राहायचं म्हणजे कठीणच. म्हणूनच संपूर्ण दिवसात जेव्हा जेव्हा पोटाला भूक लागते तेव्हा तेव्हा आपण काही ना काही खातोच. या सवयीमुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दिवसभरात आपण आपल्या शरीराच्या आवश्यकतेपेक्षा अधिक खातो आणि परिणामी वजन वाढते. मग वाढलेलं वजन कमी करण्यासाठी डाएट करावं लागत.
डाएट करणे म्हणजे पोटाला उपाशी ठेवणं असं अनेकजण म्हणतात. यामुळे होत काय? तर मन आणि पोट दोन्ही एकत्र मारल्यामुळे ताण वाढतो आणि पुन्हा वजन वाढत. बापरे.. म्हणजे सगळं मुसळ केरात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आहारावर नियंत्रण ठेवून वजन कमी कसं करायचं ते सांगणार आहोत. ते हि डाएटच्या मार्गाने मात्र पोट उपाशी न ठेवता. आज आपण वीक डाएट चार्ट पाहणार आहोत शिवज किती वाजता काय खायचं तेदेखील जाणून घेणार आहोत.
दिवस 1 – 1500 कॅलरीज
सकाळी ६ वाजता: व्यायाम करण्यापूर्वी १ कप कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून पिणे.
नाश्ता ७ वाजता: ३० मिनिटे व्यायाम केल्यानंतर ३ बार्लीच्या इडल्या, १ वाटी सांभार, २ अंड्यांचा पांढरा भाग, १/२ चमचा शेंगदाणे. सोबत खोबऱ्याची चटणी आणि १ कप ग्रीन टी.
सकाळी १० वाजता: थोडी द्राक्षे आणि मध्यम आकाराचे सफरचंद.
दुपारचे जेवण २ वाजता: नाचणीची १ भाकरी, मिक्स रस्सा भाजी, १ कप डाळ आणि १ कप ताक.
संध्याकाळी ४ वाजता: भाजलेला हरभरा आणि १ कप ग्रीन टी.
रात्रीचे जेवण ८ वाजता: मिश्र धान्यांच्या २ चपात्या, १ मध्यम वाटी रस्सा भाजी, १ मध्यम वाटी पालक रायता, १ वाटी मसूरची डाळ.
रात्री झोपण्याच्या वेळी १० वाजता: १ कप कोमट हळदीचे दूध.
दिवस 2 – 1400 कॅलरी
सकाळी ६ वाजता: व्यायाम करण्यापूर्वी १ कप कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून पिणे.
नाश्ता ७ वाजता: २ मध्यम आकाराचे रवा डोसे, टोमॅटो आणि कांद्याची चटणी. ४ बदाम आणि १ कप ब्लॅक कॉफी
सकाळी १० वाजता: १ कप मिक्स फळे.
दुपारचे जेवण २ वाजता: २ चपात्या, १ वाटी भात, १ वाटी मिक्स भाजी, काकडी आणि गाजराची कोशिंबीर आणि १ वाटी ताक.
संध्याकाळी ४ वाजता: १ कप ब्लॅक कॉफी, १ उकडलेले अंडे.
रात्रीचे जेवण ८ वाजता: १ बाजरीची भाकरी, १ वाटी मूग डाळ, १ वाटी दुधीची भाजी, टोमॅटो, काकडी आणि कांद्याची कोशिंबीर.
रात्री झोपण्याच्या वेळी १० वाजता: १ कप कोमट दुधात हळद.
दिवस 3 – 1200 कॅलरी
सकाळी ६ वाजता: व्यायाम करण्यापूर्वी १ कप पाण्यात २ चमचे मेथीदाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याचे पाणी प्या.
नाश्ता ७ वाजता: १ वाटी क्विनोआ उपमा आणि १ कप ग्रीन टी.
सकाळी १० वाजता: काकडी, गाजर आणि बीटचे तुकडे सोबत ४ बदाम.
दुपारचे जेवण २ वाजता: १ लहान वाटी भात, १ कप तूप, १ वाटी गाजर, टोमॅटो आणि बीट सॅलड, १ ग्लास ताक.
संध्याकाळी ४ वाजता: १ कप ब्लॅक कॉफी आणि मल्टीग्रेन बिस्किट.
रात्रीचे जेवण ८ वाजता: २ चपाती, १ कप चिकन करी, १ कप मूग डाळ, ग्रील्ड फिशचा तुकडा, गाजर आणि काकडीची कोशिंबीर.
रात्री झोपण्याच्या वेळी १० वाजता: १ कप कोमट दुधात हळद.
दिवस 4 – 1200 कॅलरी
सकाळी ६ वाजता: व्यायाम करण्यापूर्वी १ कप पाण्यात २ चमचे मेथीदाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याचे पाणी प्या. नाश्ता ७ वाजता: २ मध्यम मूग डोसा. टोमॅटो आणि खोबऱ्याची चटणी, ४ बदाम आणि १ कप ग्रीन टी. सकाळी १० वाजता: १ कप फळांचा ताजा रस. दुपारचे जेवण २ वाजता: २ नाचणी भाकऱ्या, १ वाटी मसूर, १ लहान वाटी दलिया, १ छोटा कप स्प्राउट सॅलड आणि १ कप ताक. संध्याकाळी ४ वाजता: १ कप ग्रीन टी आणि ५-६ पिस्ते. रात्रीचे जेवण ८ वाजता: २ मल्टीग्रेन व्हेज पराठे, १ वाटी व्हेज कोरमा, १ वाटी वाफवलेली मटकी. रात्री झोपण्याच्या वेळी १० वाजता: १ कप कोमट दुधात हळद.
दिवस 5 – 1200 कॅलरीज
सकाळी ६ वाजता: व्यायाम करण्यापूर्वी १ कप पाण्यात २ चमचे मेथीदाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याचे पाणी प्या. नाश्ता ७ वाजता: १ मध्यम कप पोंगल, नारळाची चटणी आणि १ कप ग्रीन टी. सकाळी १० वाजता: १ कप नारळ पाणी. दुपारचे जेवण २ वाजता: २ चपाती, १ वाटी फिश करी, एक वाटी गाजर, बीट, काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर, १ लहान वाटी दही. संध्याकाळी ४ वाजता: १ कप ग्रीन टी आणि १ कप स्प्राउट सॅलड. रात्रीचे जेवण ८ वाजता: १ बाजरीची भाकरी, मटण करी, बीटरूट, काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर. रात्री झोपण्याच्या वेळी १० वाजता: १ कप कोमट दुधात हळद.
दिवस 6 – 1700 कॅलरी
सकाळी ६ वाजता: व्यायाम करण्यापूर्वी १ कप कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून पिणे.
नाश्ता ७ वाजता: ४ अप्पे सोबत खोबर आणि टोमॅटोची चटणी, ४ बदाम आणि १ कप ग्रीन टी.
सकाळी १० वाजता: १ केळ
दुपारचे जेवण २ वाजता: २ मिक्स भाकरी, १ वाटी सांभर, १ वाटी हरभरा डाळ, १ वाटी पालक, १ कप दही.
संध्याकाळी ४ वाजता: १ ग्लास नारळ पाणी आणि २ अंड्यांचा पांढरा भाग
रात्रीचे जेवण ८ वाजता: १/२ कप ब्राऊन राईस, १ कप मशरूम करी, १ छोटा कप बीन्स आणि कोकोनट करी, गाजर आणि काकडीची कोशिंबीर.
रात्री झोपण्याच्या वेळी १० वाजता: १ कप कोमट दुधात हळद.
दिवस 7 – 1200 कॅलरीज
सकाळी ६ वाजता: व्यायाम करण्यापूर्वी १ कप पाण्यात २ चमचे मेथीदाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याचे पाणी प्या.
नाश्ता ७ वाजता: १ कप ग्रीन टी, ओट्स उपमा.
सकाळी १० वाजता: ४ बदाम आणि १ कप टरबूज रस.
दुपारचे जेवण २ वाजता: २ चपात्या, १ वाटी पालक मसूर, १ वाटी मुगडाळ, १ मध्यम वाटी फ्लॉवर, गाजर आणि काकडी, बीट सॅलड, १ कप ताक.
संध्याकाळी ४ वाजता: १ कप ग्रीन टी आणि १ वाटी साधे पॉपकॉर्न.
रात्रीचे जेवण ८ वाजता: २ मेथी ठेपले, १ मध्यम वाटी टोमॅटो रस्सा, १ छोटी वाटी सोयाबीनची भाजी आणि गाजर काकडीची कोशिंबीर.
रात्री झोपण्याच्या वेळी १० वाजता: १ कप कोमट दुधात हळद.
वरील डाएट चार्ट हा वेळ आणि पदार्थांची संगती दर्शवतो शिवाय या चार्टचा वापर केल्यास रोजच्या कंटाळवाण्या आहारापेक्षा रोज वेगळे खाता येईल. तसेच नियमित पुरेशा कॅलरीज शरीराला मिळतील आणि वजन कमी करणाया मदत होईल. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.