जेवल्यानंतर चालल्याने खरंच जेवण पचतं?; जाणून घ्या काय सांगतो रिसर्च रिपोर्ट
हॅलो आरोग्य ऑनलाईन। जेवल्यानंतर चालायला जाणं शरीरासाठी चांगलं असतं असे अनेकजण सांगतात. अहो अनेकजण काय खुद्द डॉक्टर आणि आहार तज्ञ सुद्धा हेच सांगतात. पण आता याबाबत काही तज्ञांनी मिळून एक रिसर्च रिपोर्ट तयार केला आहे. यानुसार, अन्नाचे विघटन किंवा पचन हा एक महत्त्वाचा भाग लहान आतड्यात होतो. अन्न खाल्ल्यानंतर आपले शरीर ऊर्जात्मक काम करू लागते आणि पोषक तत्वे शोषून घेते. संशोधनात असे दिसून आले आहे की, जेवणानंतर चालणे पोटातून आणि लहान आतड्यात अन्न जलद मार्गाने जाण्यास मदत करू शकते. चला तर जाणून घेऊयात काय सांगतो रिसर्च रिपोर्ट खालीलप्रमाणे:-
१ – आपल्या पोटातून लहान आतड्यात जेवढ्या जलद अन्नाची हालचाल होते, तितकी पोट फुगणे, गॅस आणि आम्ल रिफ्लक्ससारख्या सामान्य तक्रारी होण्याची शक्यता कमी असते. याबाबत सिद्ध झाले आहे कि, जेवणानंतर किमान ३० मिनिटे चालणे, नियमित व्यायामासह, आतड्यांचे कार्य सुधारू शकते आणि बद्धकोष्ठता होण्याची शक्यता कमी करू शकते.
२- अभ्यासानुसार जेवणानंतर चालणे यामुळे पचनाचे त्रास कमी होतात. याशिवाय टाइप – २ मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरते.
३ – अभ्यासानुसार, टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांसाठी, जेवणानंतर चालणे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी चांगले असते. विशेषत: कार्बयुक्त जेवणानंतर शरीर अन्नाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करते, जो शरीरासाठी ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे.
४ – जेवणानंतर किमान ३० मिनिटे चालणे, नियमित व्यायामासह, आतड्यांचे कार्य सुधारू शकते आणि बद्धकोष्ठतेची शक्यता कमी करू शकते.
५ – रिपोर्टनुसार आरोग्याच्या फायद्यांसोबत, जेवणानंतर चालणं फिटनेसच्या दृष्टीनेदेखील फायद्याचं आहे. कारण कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल एंडोर्फिन किंवा फील-गुड हार्मोन्स सोडण्यास ट्रिगर करते, जे शरीराला आराम करण्यास मदत करतात.