थायरॉईड आहे ना मग खाऊ नका हे पदार्थ
हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असणे जास्त आवश्यक आहे. आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असल्याने, आपल्या अनेक आजारांपासून दूर राहता येते. पण जर थॉयरॉईड सारखा एखादा आजार असेल तर त्यावेळी मात्र आपल्या आहारातील काही पदार्थांचा समावेश जेवणात केला नाही पाहिजे . असे कोणते पदार्थ आहेत . याची माहिती घेऊया …
सोयाबीन —
काही पदार्थ हे सोयाबीन पासून तयार केलेलं असतात. अश्या पदार्थाना आहारातून कमी करणे हे आवश्यक आहे. सोयायुक्त पदार्थांमध्ये फयटोएस्ट्रोजन असते. जे थायरॉईल हार्मोंस निर्माण करणाऱ्या एंजाइमच्या कार्यप्रणालीला प्रभावित करत असतात. आणि हेच कारण आहे की, थायरॉईड असलेल्या व्यक्तींनी सोयाबीन अजिबात खावू नये.
प्रोटेस्ट फूड —
या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात सोडियम चा वापर हा केला जातो. सोडियम हे थॉयरॉईड च्या रुग्णांसाठी फार हानिकारक आहे. त्यामुळे त्याच्या ब्लड प्रेशर यामध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक असते . अश्या वेळी या पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ नये. ते हानिकारक आहे .
सारखेचे प्रमाण कमी असावे —
थायरॉईड असणाऱ्यांनी सर्वाधिक साखर खाणं टाळलं पाहिजे. साखर तुमच्या पाचनशक्तीला त्रास देते. यामुळे वजन वाढण्यासारख्या गोष्टी बळावतात. म्हणून थायरॉईड असणाऱ्या व्यक्ती सर्वाधिक कॅलरी आणि शुगर असलेले पदार्थ खावू नयेत.
दारू —
दारू मध्ये जास्त प्रमाणात अल्कोहोल असते . ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नसते. त्यामुळे थायरॉईडची समस्या असणाऱ्यांनी मद्य आणि कफीन याचे सेवन करण पूर्णपणे बंद केलं पाहिजे. दारू आणि आजार एकत्र असल्याने शरीराला वेगळ्याच समस्या निर्माण होतात.
भाज्या खावू नये —
अनेक वेळा असे सांगितले जाते कि, ज्या लोकांना अपचनाच्या समस्या या जास्त असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी भाज्या खाल्या जाव्यात . पण ज्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर आहे . अश्या भाज्यांचा आहारात समावेश केला जावा. पण जत्या लोकांना थॉयरॉईड आहे त्या लोकांनी फायबर युक्त भाज्या खाल्या जाऊ नयेत .