लहान मुलांना आंघोळ घातल्यानंतर टॉवेलमध्ये गुंडाळू नका; जाणून घ्या कारण
हॅलो आरोग्य ऑनलाईन। लहान मुलांचे आरोग्य आपल्याच हातात असते. कारण जोपर्यंत ते कळते होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावे लागते. यानंतर हळूहळू मुलं स्वतः स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ लागतात. तुम्ही जसे शिकवालं तसे करू लागतात. दरम्यान अनेक लोकांना लहान मुलांना अंघोळ घातल्यानंतर टॉवेलमध्ये गुंडाळायची सवय असते. पण आम्ही विचारू कि याची गरज काय..? असे केल्याने काय होते..? तर पालकहो तुम्हालाही मुलांना टॉवेलमध्ये गुंडाळायची सवय असेल तर आताच सावध व्हा! कारण तुम्ही चूक करताय. मुलांनाच नव्हे तर अगदी तुम्ही स्वतः देखील अंघोळीनंतर बराचवेळ टॉवेलमध्ये असणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
लहान मुलांना अंघोळ घातल्यानंतर टॉवेल गुंडाळणे सामान्य बाब असली तरी मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचे कारण कारण यामूळे टॉवेलमध्ये जमा असलेले बरेच धोकादायक बॅक्टेरिया मुलांच्या आरोग्याचे नुकसान करत असतात. त्यामुळे मुलांच्या आंघोळीनंतर त्यांच्या अंगावर टॉवेल गुंडाळणे हानिकारक आहे हे समजून घ्या.
एका संशोधनात तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, टॉवेलमध्ये आढळणारे बॅक्टेरिया शरीरात सहज शिरकाव करू शकतात. ज्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या आजारांचे विषाणू जन्म घेतात आणि यामुळे मुलांचे स्वास्थ्य बिघडते. यामुळे मुलांना अन्न विषबाधा आणि अतिसाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे पालकांनी सावध असणे गरजेचे आहे.
मुलांना अंघोळ घातल्यानंतर त्यांचे अंग आणि केस पुसल्यावर टॉवेल ओला होतो. हा ओलावा बराच काळ टॉवेलमध्ये राहू शकतो आणि ओलाव्यात बॅक्टेरिया सहज तयार होते. त्यामुळे याच टॉवेलमध्ये मुलांना गुंडाळल्यामुळे रोगराईचा धोका निर्माण होतो.
० कशी काळजी घ्याल..?
- मुलांना आंघोळ घातल्यानंतर त्यांचे शरीर आणि केस व्यवस्थित पुसून घ्या आणि यानंतर त्यांना त्याच टॉवेलमध्ये गुंडाळू नका. ओला झालेला टॉवेल हा कडक उन्हात वाळवा म्हणजे त्यात असलेले बॅक्टेरिया मरतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. - याशिवाय दुसऱ्याचा टॉवेल वापरू नका. मुलांसाठी दोन टॉवेल ठेवा. एक ओला झाल्यास दुसरा वापरा.