जुन्या साडी च्या साहाय्याने बनवा असे ड्रेस
हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पूर्वीच्या काळात घरात जर एकसारख्या वयाच्या खूप साऱ्या मुली असतील तर त्यावेळी त्यांना एकसारखे कपडे घातले जात होते. पण हे एकसारखे जे कपडे शिवले जात असत ते म्हणजे आजी , काकी किंवा आईच्या साडीपासून वेगवेगळे ड्रेस शिवले जात होते. हा काळ पूर्वीचा होता. त्यामुळे त्या काळात साडीपासून तयार केलेले ड्रेस हे घातले जात असत, पण आजकाल सुद्धा नवीन ट्रेंड मध्ये साडीच्या साह्याने वेगवेगळे ड्रेस वापरले जात आहेत. साडीच्या साह्याने कश्या प्रकारची कपडे आपण शिलाई करू शकता ते जाणून घेऊया ….
शॉर्ट ड्रेस —
साडीपासून शिवलेला हा प्रकार एकदम छान आहे. ज्यांना शॉर्ट ड्रेस घालण्याची हौस असेल त्यांना जुन्या साडीतून शिवण्यासारखा हा चांगला पर्याय आहे. अशा पॅटर्नचा ड्रेस बनवण्यासाठी तुम्हाला कॉटन सिल्क मटेरिअलमधल्या मोठ्या काठाची साडी लागेल. तसेच त्याचे हात लांब असतील तर ते अजून उठून दिसायला मदत होते. कमरेपासून खालच्या भागात थोड्या प्रमाणात घेर हा करू शकतो.
पंजाबी ड्रेस —
काठपदर असलेल्या साडीपासून खूप छान असा पंजाबी ड्रेस आपण बनवू शकतो. त्याच्या पॅन्टीचा घेर हा जास्त ठेवला तर अजून लुक सुंदर दिसायला सुरुवात होते. कडेने जर बॉर्डर दिली तर त्या ड्रेस चा लुक नवीन असणाऱ्या ड्रेस पेक्षा खूप सुदंर दिसू लागतो.
शिफ्ट मिडी ड्रेस—-
सध्या मिडी ड्रेसची चलती आहे. ऑफिस किंवा इतरवेळी कोणत्याही समारंभात हे मिडी ड्रेस चांगले दिसतात. त्याहीपेक्षा ते अधिक कम्फर्टेबल असतात. जर तुमच्याकडे कॉटनमटेरिअलच्या साड्या असतील तर त्यापासून असे ड्रेस बनवता येऊ शकतात. तसेच त्याला काही प्रमाणात खिसे सुद्धा बनवू शकता.
लाँग गाऊन —-
वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीचे गाऊन बनवता येऊ शकतात. लग्न समारंभात अगदी टिपिकल गाऊन घालायचा कंटाळा आला असेल तर साड्यांपासून गाऊन तयार करुन पाहाच छान दिसतात. पैठणी, इरकल,पेशवाई अशा कोणत्याही साड्यांपासून ते तयार होतात. पैठणीचा गाऊन शिवायचा विचार करत असाल तर पैठणीची खरी ओळख असते तिचा पदर. कारण तिच्यावर जरतारीचा मोर असतो. त्याचा योग्य वापर करुन तुम्हाला गाऊनचा पॅटर्न तयार करता येऊ शकतो.
परकर —-
जर लहान मुलींना परकर हा साडीपासून शिवाला गेला तर त्याचा लुक हा खूपच सुंदर दिसायला मदत होते. लहान मुलींना या गोष्टी खूपच छान पद्धतीने शोभून दिसतात . त्यामुळे परकर आणि चोळी यांचा वापर हा मुलींसाठी केला तर त्याचे सौदर्य अजून खुलून दिसायला मदत होऊ शकते.