निरोगी आरोग्यासाठी केसरचे पाणी पिणे उत्तम; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन जीवनात वापरात असलेले असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यास सक्षम आहेत. यांपैकी एक म्हणजे केसर. केसर महाग असल्यामुळे सगळ्याच घरात उपलब्ध असेल असे काही नाही. मात्र सणासुदीला किंवा एखादा गोड पदार्थ करायचा म्हटलं कि मग केसरचा वापर दिसून येतो. पण फक्त एवढ्यापुरताच केसर फायदेशीर आहे का? तर नाही. केसर जितके गोडाच्या पदार्थासाठी आवश्यक तितकेच आपल्या निरोगी आरोग्यासाठीदेखील आवश्यक आहे. यासाठी केसरचे पाणी नियमित पिणे फायदेशीर आहे.
केसरच्या पाण्यात व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक आढळतात. हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय केशरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यांच्या फायद्यासाठी केसरचे पाणी पिणे आवश्यक आहे.
० केसर पाणी कसे बनवालं?
केसरचे पाणी बनविण्याची विधी अत्यंत सोप्पी आहे. यासाठी सर्वात आधी केसरचे ५ ते ७ धागे घ्या. हे केसरचे धागे गरम पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा. यानंतर पाण्याचा रंग बदललेला दिसेल आणि केसरचे धागे विरघळताना दिसतील. हे पाणी गाळून किंवा धाग्यांसह पिता येते. नियमित सकाळी रिकाम्या पोटी या पेयाचे सेवन केल्यास अतिशय लाभकारी फायदे होतात. या पेयाचे सेवन शारीरिक आणि मानसिकरित्या निरोगी राहण्यासाठी मदत करते. शिवाय त्वचेच्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर लाभ देते.
० केसरचे पाणी पिण्याचे फायदे:-
1. कॅफिन फ्री केसर पाणी
चहातील कॅफिन शरीराचे नुकसान करते. शिवाय यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मात्र केसर कॅफिन फ्री असल्यामुळे मानसिक आरोग्याचे रक्षण करते.
2. पचनक्रिया सुधारते
जर तुम्हाला पचन संस्थेसंबंधित कोणतीही समस्या असेल तर केसर पाण्याचे सेवन करावे. यामुळे पोटदुखी बारी होते आणि चयापचय सुधारल्याने पचनकिया मजबूत होते.
3. सर्दीवर परीणामकारक
केसर गुणधर्माने गरम असते. यामुळे सर्दी-पडसे झाल्यावर केसर पाणी प्या. असे केल्यास खूप दिवसांपासून सर्दी-पडसेने ग्रस्त असाल तरीही लवकर आराम मिळेल. यासाठी केसर पाणी िदवसांतून दोनवेळा पिऊ शकता.
4. मूड स्विंगपासून बचाव
जर तुमचा मुड स्वभावाच्या विरुद्ध जात असेल आणि तुम्ही सतत उदास राहत असाल, चिडचिडे झाले असाल तर दररोज केसरचे पाणी प्या. कारण केसर हे मूड बुस्टर आहे. यामुळे मूड स्विंगपासून बचाव होतो.
5. केसगळती थांबते
धूळ, माती प्रदूषण यामुळे केसांचे हाल होतात. परिणामी केस गळती, केसांना फाटे फुटणे अशा समस्या निर्माण होतात. या कमी करण्यासाठी केसरचे पाणी फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज केसर पाणी प्या. असे केल्यास तुमचे केस काही दिवसातच मजबूत व चमकदार होतील.
6. नितळ त्वचेसाठी मदतयुक्त
त्वचेवरील ग्लो वाढविण्यासाठी केसर पाणी कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. काही मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्यास त्वचेवर नॅचरल ग्लो येईल आणि चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील.
० अत्यंत महत्वाचे –
केसरचा उपयोग कधीही करताना एक गोष्ट कधीच विसरू नका. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातक असतो. त्यामुळे केसरचे सेवन करताना नेहमी सीमित प्रमाणातच करा. याचे कारण म्हणजे केसरच्या जास्त सेवनामूळे तोंड सुखते, आळस वाढतो, भुकेमध्ये बदल होतात आणि डोकेदुखी वाढते यांसारख्या संज्ञा उदभवण्याची शक्यता वाढते. त्यामुळे केसरचे सीमित सेवन करा.