Dry Fruits: उन्हाळ्यात ड्राय फ्रूटचे सेवन कसे करालं..?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Dry Fruits) सध्या उन्हाचा तडाखा असा काही वाढला आहे कि, अगदी उफ्फ गरमी.. हाय गरमी अशी काहीशी अवस्था सर्वांचीच झाली आहे. वाढते तापमान, वाढलेली उष्णता जीवाचे असे हाल करतेय कि, अनेकदा फ्रिजमध्ये जाऊन बसावं वाटत. पण तस करता येत नाही म्हणून थंड पाणी, बर्फाचे क्यूब, थंडगार सरबत, आईस्क्रीम अशा पदार्थांचे पर्यायी सेवन करून शरीराला थंडावा मिळवला जातो.
याचे कारण म्हणजे उन्हाळ्यात कोणतेही उष्ण पदार्थ शरीराला सहन होत नाहीत. त्यामुळे गुणधर्माने थंड असणाऱ्या पदार्थांचे उन्हाळ्यात सेवन केले जाते. यामध्ये ड्राय फ्रुटचा समावेश होतो का..? तर अनेकांचा असा समज आहे कि, ड्रायफ्रूट उष्ण असतात म्हणून उन्हाळ्यात खाऊ नये. तर मित्रांनो असे करण्याची काहीही गरज नाही. कोणत्याही ऋतूमध्ये ड्रायफ्रुट खाणे शरीरासाठी उपयोगी आहे.
० पोषणदायी आहारात ड्राय फ्रुट आवश्यक (Dry Fruits)
ड्राय फ्रुट्स हे मुळातच अत्यंत पौष्टिक असतात. यामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या अनेक पोषक घटकांचा समावेश असतो. यामुळे ड्राय फ्रुट सर्व ऋतूंमध्ये खाण्यायोग्य आहेत. शिवाय ड्राय फ्रूट्स हे पोषणदायी स्नॅक्स म्हणून खाता येतात. त्यामुळे जसे तापमान वाढत असल्याचे जाणवेल तसे वातावरणाला साजेसे ड्राय फ्रुट्स निवडा आणि त्याचे सेवन करा. कारण शारीरिक क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी निरोगी आहार आवश्यक आहे आणि असा आहार ड्राय फ्रूट्सशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे.
० ड्राय फ्रुट (Dry Fruits) खाताना काळजी घ्या
वास्तविक, ड्रायफ्रुट्सचा प्रभाव हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ड्राय फ्रुट खाणे शरीराच्या आरोग्यासाठी चांगले नसल्याचे मानले जाते. तसेच उन्हाळ्याच्या हंगामात ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्यामुळे प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून उन्हाळ्यात ड्राय फ्रूट्स खा पण त्याचे एक संतुलित प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे.
याशिवाय ड्राय फ्रुट खाताना चुकीच्या पद्धतीने खाल्ले गेले तरीही शारीरिक क्रियांमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ड्राय फ्रुट कसे खावे याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी काही सोप्प्या टिप्स आपण आज जाणून घेऊया. ज्यांच्या साहाय्याने उन्हाळ्यात कितीही उष्ण प्रभावाचे (Dry Fruits) ड्राय फ्रुट खाल्ले तरीही शरीराला आणि शारीरिक क्रियांना त्रास होणार नाही.
० उन्हाळ्यात ड्राय फ्रूटचे सेवन ‘असे’ करा
उन्हाळ्याच्या दिवस ड्राय फ्रूटचे सेवन फायदेशीर असते. याचे कारण म्हणजे ड्राय फ्रुट खाल्ल्याने शरीराला अनेक खनिजे आणि इतर पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे प्रत्येक ऋतूत त्यांचे सेवन केले पाहिजे. शिवाय उन्हाळ्यात ड्रायफ्रूट्सचे सेवन वेगळ्या पद्धतीने करावे जेणे करून शरीराची उष्णता वाढणार नाही. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) तुपावर भाजून खा खारीक/ खजूर –
खजूर वाळवला कि त्याचा खजूर होतो. तरीही खजूर स्वभावाने उष्ण आणि खारीक ही स्वभावाने थंड मानली जाते. खजुराच्या आतील बी काढून त्याचा पल्प हा नैसर्गिक शर्करा म्हणून वापरला जातो.
खजूरात लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे कोणत्याही ऋतूत खजूर वा खारीक खाणे फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसात खजुर तुपावर चांगले परतून घ्या आणि त्यात दूध घालून त्याची खीर बनवून खा. मात्र खजुरचे प्रमाण मर्यादित असेल याची काळजी घ्या. (Dry Fruits)
२) अंजिराचे आईस्क्रीम बनवा –
उन्हाळ्यात अंजीर खाण्यासाठी त्याचे घरगुती पद्धतीने आइस्क्रीम बनवा आणि लहान मुलांसोबत मजेने खा. पण जर तुम्हाला आईस्क्रीम खायचे नसेल तर एका छोट्या वाटीत सुक्या अंजिराच्या एक किंवा दोन चकत्या घेऊन त्यामध्ये अंजीर पूर्णपणे भिजेल इतके दूध घाला. आता दुधात भिजवलेले अंजीर रात्रभर तसेच राहू द्या.
(Dry Fruits) असे करताना एक विशेष काळजी घेण्याची गरज असते. ती म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात दूध नासण्याची शक्यता असते. त्यामुळे ही वाटी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर सकाळी दुधात मुरलेले अंजीर खा. हे चवीला अत्यंत चविष्ट लागते. शिवाय हे तब्येतीसाठी अत्यंत पौष्टिक देखील आहे.
३) पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रुट्स खा –
उन्हाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रूट खायचे असतील तर फार कष्ट घेण्याची गरज नाही. यासाठी पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रूट्स खा. ड्राय फ्रुट्स पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्यातील उष्णता बाधत नाही आणि ते पचायलाही सोपे जाते. म्हणूनच हा अतिशय उत्तम उपाय मानला जातो.
यामध्ये बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर इत्यादी ड्रायफ्रूट्स (Dry Fruits) पाण्यात भिजवून खाता येतात. यासाठी सांगितलेल्या ड्रायफ्रुटपैकी कोणतेही एक ड्रायफ्रूट रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते खा. यामध्ये बदाम खाताना त्यांची साले काढून फेकू नका.
४) दुधात भिजवलेले ड्रायफ्रूट्स खा –
जर तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रूट खायचे असतील आणि शारीरिक क्रियांमध्ये बिघाड होऊ नये असे वाटत असेल, तर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट दुधात भिजवून खा. एकतर असे केल्यामुळे ड्रायफ्रुट्स अतिशय स्वादिष्ट लागतात. (Dry Fruits)
शिवाय यातील पोषण दुपटीने वाढते. म्हणून यासाठी ड्रायफ्रूट्स चांगले चिरून वा थोडेसे भाजून त्यांची पूड करून घ्या. यानंतर गार किंवा कोमट दुधात त्याची पावडर वा तुकडे मिसळून खा अथवा प्या. अशा प्रकारे सुक्या मेव्याचे सेवन केल्याने उष्णतेचा कुठलाही त्रास होत नाही.
वरील टिप्सच्या सहाय्याने आता उन्हाळ्यातही ड्रायफ्रूट्स खाणे सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रूट (Dry Fruits) समोर दिसले तर खाणे टाळू नका. बिंधास्त खा.
‘हे’ पण वाचा :-
दररोज खालं पिस्त्याचा गर तर, शारीरिक ऊर्जेत पडेल भर; जाणून घ्या फायदे