जामुनची प्रत्येक प्रजाती शारीरिकदृष्ट्या आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। काही चुकीच्या सवयी आपल्या आरोग्याचे अतिशय नुकसान करतात. जसे कि पाणी कमी पिणे, यावेळी खाणे, झोप कमी घेणे इत्यादी. या सर्व सवयींमुळे अनेकदा शारीरिक दाह वाढतो. यामुळे उष्णतेशी संबंधित विकार होतात. यावर जामून हे फळ अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण जामून या फळाची प्रत्येक प्रजाती औषधी स्वरूपात आरोग्यदायी आहे. यात प्रामुख्याने जामूनचे बियाणे, पाने आणि झाडाची साल वापरली जाते. जामुनच्या मुख्य प्रजातींव्यतिरिक्त, आढळलेल्या इतर प्रजाती कमी दर्जाच्या आहेत. जामुनच्या एकूण ५ प्रजाती आहेत. जामुन, पांढरे बेरी, कथ जमुन, जमीन जांबू, लहान जांबू अश्या या प्रजाती असून त्याची फुले लहान व पांढरी रंगाची असतात. तर हे फळ बाहेरून काळे, जांभळे आणि आतून गुलाबी लाल रंगाचे असते. जामुन विशेषतः मधुमेहाच्या उपचारांमध्ये वापरले जातात. चला तर जाणून घेऊयात जामूनचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:-
१) रोग प्रतिकारक शक्तीत वाढ – कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि जीवनसत्त्वे यासारखे विविध प्रकारचे पोषक घटक जामुनमध्ये भरपूर प्रमाणात असतात. यामुळे जामून खाल्ल्यास शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. परिणामी कोणत्याही संसर्गापासून शरीराचे रक्षण होते.
२) हृदयाचे रक्षण – जामुनमध्ये पोटॅशियमचे पुरेसे प्रमाण असते. जे एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक इत्यादीपासून संरक्षण मिळवण्यासाठी सहाय्य करते.
३) ऍनिमियावर मात – शरीरात रक्ताची कमतरता असेल वा ऍनिमियाचा त्रास असेल तर जामुनचे भरपूर सेवन करा. यामुळे व्यक्तीच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढते.
४) मधुमेहींसाठी गुणकारी – जामुन शरीरातील रक्तात असणाऱ्या साखरेचे प्रमाण नियंत्रित करतात. यामुळे मधुमेहींसाठी हे फळ आरोग्यदायी मानले जातात. या फळाचे सेवन केल्यास वारंवार तहान लागणे आणि वारंवार लघवी होणे यामुळे मधुमेहींना लाभ होतो.
५) पोटासाठी फायदेशीर – जामुनचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो. पोटातील जंत, कब्ज, आंबटपणा – पित्त इत्यादींपासून सुटका मिळते आणि चेहऱ्यावर चमक येते.
६) कॉलरावर परिणामकारक – उलट्या, अतिसार किंवा कॉलरा यासारख्या समस्या असल्यास जामून खाणे फायदेशीर आहे. यासाठी जामूनचा रस १ कप कोमट पाण्याबरोबर प्यावा. यामुळे त्वरित आराम मिळतो.
७) अॅसिडीटी खल्लास – अॅसिडिटीने त्रस्त असल्यास जामुनच्या फळात काळे मीठ आणि जिर पावडर मिसळून याचे सेवन करावे. असे केल्यास त्वरित आराम मिळतो आणि छातीतील जळजळ थांबते.