सफरचंद न सोलता खा, कारण..; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सफरचंद हे एक अस फळ आहे, जे आपल्या आरोग्याची उत्तमरीत्या काळजी घेण्यास सक्षम आहे. यामुळे डॉक्टरसुद्धा नेहमी सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. इतकेच काय तर आजारपणात जो कुणी भेटायला येतो तो येताना सफरचंद घेऊनच येतो. पण बरयाचदा असे निदर्शनात येते कि, अनेक लोक सफरचंद साल काढून खाणे पसंत करतात. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि सफरचंद सोलून खाणे हि अत्यंत मोठी चूक आहे.
० कारण, सफरचंदांच्या सालामध्ये पुष्कळ पोषक तत्वे असतात, जी शरीराचे कामकाज आतून सुरळीत करण्यात मदत करतात. साहजिकच तुम्हला भीती खाते कि, सफरचंदाच्या सालीवर मेण लावलेलं आहे वा त्यावर कीटकनाशके वापरली असतील ती आपल्या पोटात जातील आणि मग आजारपण लागेल. तर यासाठी साल काढून खाणे हा मार्ग नसून इतर मार्गांचा अवलंब करा. कारण जेव्हा तुम्ही सफरचंदाची साल काढून टाकता तेव्हा त्यातील बरेचसे पोषण घटक तुम्ही काढून फेकता.
० सफरचंद न सोलता कसे खावे?
– सफरचंदावर फवारलेली कीटकनाशके वा त्यावरील मेण हे पोटात जाऊ नये यासाठी प्रथम सफरचंद धुवा. यानंतर ते १ तास पाण्यात भिजवत ठेवा. नंतर सालीवरील कीटकनाशक आणि मेणाचा थर काढून टाकण्यासाठी ते कोमट पाण्याने २-३ वेळा धुवा.
० सफरचंद सालीसकट खाण्याचे फायदे –
१) जीवनसत्त्वांनी समृद्ध – सफरचंदाच्या सालीत भरपूर प्रमाणात व्हिटामिन सी आणि ए असते. प्रत्येक सफरचंदाच्या सालात ८.४ मि.ग्रॅ. व्हिटामिन सी आणि ९८आययू व्हिटामिन ए असते. यामुळे सफरचंद खाताना सालीसकट खा. अन्यथा सोलून खाल्ल्यामूळे जीवनसत्वरहीत फळ खाल्ले जाईल. ज्याचा आरोग्याला काहीही फायदा होणार नाही.
२) पोषक घटकांचा खजिना – सफरचंदाच्या सालामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फोलेट, लोह आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात. यामुळे सफरचंद सालीसकट खाणे हे अआरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानले जाते.
३) फायबरयुक्त साल – सफरचंदाच्या सालीत विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तर विरघळणाऱ्या फायबरमुळे पोट बऱ्याचवेळासाठी भरलेले राहते आणि कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच फायबर आतड्यात असणाऱ्या अनुकूल बॅक्टेरियांच्या वाढीसाठीद मदत करते.
४) कर्करोगावर नियंत्रण – एका अभ्यासानुसार, सफरचंदाच्या सालामध्ये ट्रायटरपेनॉइड नावाचे एक कंपाऊंड असते, जे मानवी शरीरात कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी वा त्यावर रोख लावण्यासाठी ओळखले जाते. त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट देखील असतात, ज्यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
५) श्वासोच्छवासाच्या समस्यांवर प्रभावी – सफरचंदाच्या सालामध्ये क्वेरेसेटिन नावाचे फ्लॅव्होनॉइड असते. जे फुफ्फुसांचे कार्य सुरळीत ठेवण्यास सहाय्यक असते. यामुळे जे लोक रोज १ किंवा आठवड्यात ५ पेक्षा अधिक सफरचंद खातात, त्यांचे फुफ्फुस चांगले कार्य करते.
६) वजन कमी होते – सफरचंदाच्या सालीमध्ये ओरसोलिक आम्ल हा एक आवश्यक कंपाऊंड असतो, जो लठ्ठपणाशी लढायला मदत करतो. यामुळे स्नायूची चरबी वाढते आणि कॅलरी बर्न होते. परिणामी लठ्ठपणाचा धोका कमी होतो.