पनीर खा, तरुण दिसा; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। पनीर हा प्रथिनांचा अतिशय चांगला स्रोत आहे. यामुळे आपल्या दैनंदिन आहारात पनीर असणे अतिशय लाभदायी मानले जाते. ज्यांना मांसाहार वर्ज्य असतो किंवा मांसाहार करणे आवडत नाही त्यांच्यासाठी प्रथिनांचे उत्तम स्रोत म्हणून पनीरकडे पहिले जाते. पनीर शरीराच्या आरोग्यासह त्वचेच्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. पण, पनीर योग्य प्रकारे सेवन करणं गरजेचं असतं. आयुर्वेदानुसार, दुधापासून बनवले जाणारे ताक या एकमेव पदार्थाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही दुग्धजन्य पदार्थात मीठ वर्ज्य करावं. कारण, दुधात मीठ मिसळल्यास शरीराची हानी होते. सध्या बाजारात पनीर आणि पनीरपासून बनणाऱ्या विविध पदार्थांना मोठी मागणी आहे. यामुळे आपल्या आहारात पनीर समाविष्ट करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हि काळजी घेतल्यास पनीर खाणे आपले तारुण्य टिकवण्यासाठी मदत करते.
१) चांगल्या त्वचेसाठी पनीरसोबत काळीमिरी पूड, धणेपूड वा चाटमसाला टाकून खा. पण, मिठ वापरू नका. अगदी वयाच्या २० व्या वर्षांपासून अधिक वय असलेल्यांनी रोज एक छोटी वाटी (१०० ग्रॅम) पनीर खाणे फायदेशीर आहे. दिवसातून कधीही ते खाता येईल पण रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी १ तास आधी ते खा.
२) पनीर कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. यामुळे त्वचा आणि केसांसाठी ते उपयुक्त आहे. शिवाय पनीर आपल्या शरीरातील फॅट अजिबात वाढवत नाही. याउलट त्यामुळे हाडांना योग्य वंगण मिळतं आणि हाडं तसंच सांधे बराच काळ सुस्थितीत राहतात. यामुळे दैनंदिन आहारात आठवड्यातून किमान २ वेळा पनीरचा समावेश करावा.
३) पनीर खाल्ल्याने त्वचेचा घट्टपणा टिकून राहतो. आपण सारेच जाणतो कि, वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. सुरकुत्या पडू नयेत यासाठी शरीराला कॅल्शियम आणि प्रथिनांची गरज असते आणि हि गरज पनीर पूर्ण करतं.
४) पनीर चेहऱ्याची चमक वाढवतं. कारण, यातील प्रथिने त्वचेच्या नवीन कोशिकांना निर्माण करतात आणि जुन्या कोशिकांना दुरुस्त करतात.
५) पनीरमध्ये असलेल्या लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. यामुळे पनीर खाल्ल्यास त्वचेचा चमकदारपणा टिकून राहतो. शिवाय त्वचेचं नुकसानदखल भरून काढण्यासाठी पनीर सहाय्य्क आहे.