रक्त शुद्धीकरणासाठी खा परवळची भाजी; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही कधी परवळची भाजी खाल्ली आहे का? हो.हो. परवळ. पडवळ नव्हे. पडवळ आणि परवळ या दोन वेगवेगळ्या भाज्या आहेत. नावात थोडे समस्या असले तरीही फायद्यांमध्ये खूपच फरक आहे. परवळ या भाजीला हिंदीत पर्वल किंवा परवल, तर तामिळमध्ये ‘कोवाककई’, कन्नडमध्ये ‘थोंडे काई’, बंगाली, संस्कृत आणि आसामीमध्ये याला ‘पोटोले’ म्हणून ओळखले जाते. साधारण तोंडलीसारखी दिसणारी हि भाजी चवीला थोडी वेगळी पण आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. अगदी आयुर्वेदिक भाज्यांमध्येदेखील परवळचा समावेश होतो. कारण परवळमध्ये व्हिटॅमिन A, B1, B2, C, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅनेशिअम, फॉस्फरस असे अनेक घटक समाविष्ट असतात. जे अनेक आजारांवर फायदेशीर ठरतात. आचला तर जाणून घेऊया परवळचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:-
१) रक्त शुद्धीकरणास मदतयुक्त – रक्तशुद्धीकरणे हे वेगवेगळ्या कारणांसाठी गरजेचे असते. पण ते कसे करायचे? असा एक सर्वसामान्य प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर दोस्तहो, रक्त शुद्धीकरणासाठी आपल्या आहारात थोडासा बदल आवश्यक आहे. परवळची भाजी आपल्या आहारात समाविष्ट करा. यामुळे शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होतेच शिवाय रक्ताभिसरणाची प्रक्रिया देखील सुरळीत होते. रक्त शुद्ध असल्यास त्वचा चांगली राहते, आंतरक्रिया बिघाड होण्यास रोख बसतो, शिवाय अनेक रोगांपासून संरक्षण होते.
२) भरपूर व्हिटॅमिन्स – व्हिटॅमिन्सचा साठा हा शरीराच्या वेगवेगळ्या कारणांसाठी महत्वाचा असतो. उत्तम त्वचा, केस यासाठी व्हिटॅमिन्स गरजेचे असतात आणि परवळमध्ये व्हिटॅमिन A, B1, B2, C, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅनेशिअम, फॉस्फरस हे घटक गरजेचे असतात. ज्याचा फायदा वेगवेगळ्या पद्धतीने शरीराला होतो.
३) रक्तातील साखर नियंत्रणात – बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा त्रास असणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली आहे. मधुमेह झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहणे गरजेचे असते. यासाठी आहारात परवळची भाजी खा. कारण परवळच्या भाजीत असे घटक असतात जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. याशिवाय परवळच्या पानांचा रस प्यायल्यानेही मधुमेहाचा त्रास कमी होतो.
४) प्रतिकारशक्तीत वाढ – परवळमध्ये समाविष्ट असणारे अनेक औषधीय घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे हवामानाच्या बदलामुळे होणारे ताप, सर्दी हे टाळता येतात. यासाठी परवळाची भाजी किंवा परवळाचा रस प्या.
५) मुळव्याधीपासून आराम – मूळव्याधीच्या त्रासामध्ये अनेकदा विष्ठेतून रक्त जाते. यावेळी अतिशय त्रास होतो. अशावेळी विष्ठा सुलभ आणि सुरळीत होण्यासाठी तसेच होणारा त्रास कमी करण्यासाठी व आराम मिळवण्यासाठी परवळची भाजी खाणे लाभदायक ठरते. यामुळे पोटाचे विकारदेखील कमी होण्यास मदत होते.
६) पचनक्रिया सुरळीत – परवळमध्ये असलेल्या बिया पचनासाठी फार लाभदायक असतात. या बियांच्या सेवनामुळे पोटाचे विकार बरे होण्यास मदत मिळते. विष्ठा उत्सर्जनास त्रास होत असेल त्यांनी परवळची भाजी खावी. परवळमधील घटक पोट साफ करण्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
७) कोलेस्ट्राल नियंत्रणात – परवळमध्ये फॅट कमी असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. शिवाय कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर परवळ खाणे फायद्याचे आहे.
८) वजन कमी होते – परवळची भाजी खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक फायबर मिळते. तसेच हि भाजी खाल्लया लगेच भूक लागत नाही. त्यामुळे साहजिकच वजन कमी करण्यासाठी हि भाजी खाणे लाभदायक आहे.
९) अकाली सुरकुत्या – परवळमध्ये व्हिटॅमिन A, C असते. तसेच अँटीऑक्सिडंट घटक देखील असतात जे अँटी- एजिंगसाठी फायदेशीर असतात. म्हणूनच परवळची भाजी खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर अकाली येणाऱ्या सुरकुत्या व काळंवडलेला चेहरा कमी होण्यास मदत मिळते.