तूप खा आणि मिळवा आरोग्यदायी लाभ; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। वजन आटोक्यात आणण्यासाठी आपण तेलकट पदार्थ खाणे टाळतो. पण यात अगदी तूपही खाणे आपण वगळतो. पण मुळात तूप खाल्यामुळे वजन वाढतं हा समझ चुकीचा आहे. उलट देशी तूप खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे कोणत्याही आजारात तूप खाणे फायद्याचे ठरते. तुपाचा अत्याधिक लाभ मेंदूच्या कार्य प्रणालीसाठी होतो. इतकेच नव्हे तर तुपाचे सेवन केल्याने त्वचेलाही फायदाच होतो. चला तर जाणून घेऊयात तूप खाल्ल्याने शरीरास मिळणारे फायदे.
१) सांधेदुखीपासून आराम – देशी तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे देशी तूप खाल्याने हाडांना बळकटी येते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
२) वात आणि पित्त नाशक – रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वाताच्या त्रासापासून कमी दिवसांत सुटका होते. शिवाय पित्ताचा त्रास वारंवार होत असेल तर यासाठी देखील शुद्ध तुपाचे सेवन करणे लाभदायी असते.
३) पचनक्रियेत सुधार – शुद्ध तुप खाण्याने शरीरातील आंतरक्रिया सुरळीत होतात. शिवाय तूप खाल्लेले अन्न पचविण्यास मदत करते त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि त्याच्या कार्यात सुधारणा होते.
४) डोळ्यांसाठी फायदेशीर – डोळ्यांची जळजळ, दृष्टिदोष किंवा डोळा येणे अश्या समस्यांवर तूप प्रभावी असते. कारण तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. परिणामी डोळ्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
५) हृदयासाठी लाभदायक – तूप आंतरक्रियांच्या शुद्धीकरणासाठी मदत करते. शिवाय तुपामुळे शरीरात कोणतेही वाईट फॅट्स जमा होत नाहीत. शिवाय हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते. परिणामी होणाऱ्या त्रासावर प्रभाव पडतो.
६) पोटातील गॅस – कधीकधी अधिक जेवल्यामुळे किंवा जाड अन्न घेतल्याने पोटफुगी आणि गॅसेसचा त्रास होतो. मात्र अश्या जेवणासोबत तुपाचे सेवन केले तर यापासून निश्चितच आराम मिळतो.
७) त्वचेसाठी गुणकारक – शुद्ध तुपामुळे त्वचा कोमल आणि मुलायम राहते. यासाठी शुद्ध तुपाने चेहऱ्याचा मसाज करणे फायदेशीर ठरते.
८) वजनावर नियंत्रण – तुपामध्ये कोणतेही बॅड फॅट्स समाविष्ट नसतात. तेलाचे सेवन केले असता कमी काळात अधिक बॅड फॅट्स शरीरात तयार होऊन वजन वाढते. मात्र तुपाचे सेवन केले असता वजन वाढत नाही. याउलट अन्य आरोग्यदायक लाभ होतात.
महत्वाचे :- तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे