रिकाम्या पोटी कच्चा टोमॅटो खा आणि मिळवा आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारतीय आहारात अनेक पदार्थ बनविताना टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोला स्वतःची अशी वेगळी चव असते. शिवाय टोमॅटोचा लाल रंग अत्यंत लक्षवेधी असतो. कधी भाजीची चव वाढवण्यासाठी तर कधी सॅलडच्या रूपात टोमॅटो आपण आहारात घेत असतो. हा टोमॅटो फक्त जेवण चविष्ट बनवीत नाही. तर टोमॅटो आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कोणत्याही स्वरूपात टोमॅटोचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण टोमॅटोमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीराची काळजी घेतात. मात्र यासाठी टोमॅटो एकतर रिकाम्या पोटी खावा आणि दुसरं म्हणजे कच्चा खा.
० टोमॅटो आरोग्यासाठी पोषक कसा..?
टोमॅटो चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. शिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन्स, मिनरल्स आणि फायबरही भरपूर असते. तसेच व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन ई आणि व्हिटॅमीन के' चा टोमॅटो खूप चांगला स्त्रोत आहे. या व्यतिरिक्त टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर असते. तसंच कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारखी तत्त्वे देखील टोमॅटोमध्ये समाविष्ट असतात.
० कच्च्या टोमॅटोचे रिकाम्या पोटी सेवन करण्याचे फायदे:-
१. हृदयासाठी फायदेशीर
हृदयाशी संबंधित समस्यांवर टोमॅटो खाणे फायदेशीर आहे. यासाठी रिकाम्या पोटी टोमॅटो खा. अशा प्रकारे टोमॅटोचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्यास प्रतिबंध होतो. परिणामी हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.
२. पोटातील उष्णता कमी होते
जर तुम्हाला पोटात उष्णता जाणवत असेल आणि गर्मी वाढल्यामुळे जळजळ होत असेल तर त्याने रोज एक टोमॅटो रिकाम्या पोटी असाच खा. यामुळे पोटाची जळजळ शांत होईल आणि शरीरातील दाह कमी होईल.
३. पोटातील जंत कमी होतात
पोटात जंतांची समस्या झाल्यास कच्चा टोमॅटो कापून रिकाम्या पोटी खा. टोमॅटो खाताना त्यावर काळीमिरी घाला आणि खा. असे रोज असे केल्याने काही दिवसात पोटातील जंत कीटकांपासून सुटका होईल.
४. दृष्टी वाढवा
कुणाला चष्मा असेल किंवा दृष्टीदोष असेल तर अशा लोकांनी टोमॅटोचे सेवन रिकाम्या पोटी करावे. कारण टोमॅटोमध्ये ‘व्हिटॅमिन ए’ डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे.