रव्याचे पदार्थ आहारात खा आणि अशक्तपणावर मात करा; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सकाळच्या नाश्त्याला उपमा, शिरा, इडली, डोसा, उत्तपम असे विविध रव्यापासून बनविलेले पदार्थ असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हे जितके चविष्ट असतात तितकेच पौष्टिक देखील असतात. रवा हे फायबर, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, ई, प्रथिने, लोह आणि इतर खनिजे समृध्द आहे. शिवाय चरबी, कोलेस्ट्रॉल आणि सोडियम नसते. यामुळे रव्याचे सेवन शरीरात ऊर्जा निर्माण करते. इतकेच नव्हे तर भूकेवर नियंत्रण आणि वजन कंट्रोल करते. यामुळे आपल्या आहारात राव असणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. चला तर जाणून घेऊयात रव्याचे फायदे खालीलप्रमाणे:-
१) रोगप्रतिकार शक्तीत वाढ – रवा सेलेनियमने समृद्ध असलेले अँटिऑक्सिडेंट आहे. यामुळे डीएनए पेशींचे ऑक्सिडेशन रोखण्यास मदत मिळते. परिणामी रोग प्रतिकारशक्ती झपाट्याने वाढते आणि यामुळे आपल्या शरीराचे संसर्ग होण्यापासून संरक्षण होते.
२) लोहाची कमतरता दूर – रव्यामध्ये लोह जास्त प्रमाणात असते. यामुळे शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली स्थिती सुधारण्यास सहाय्य मिळते. लोहाची कमतरता असल्यास शरीरात रक्ताची कमतरता आणि अशक्तपणा येतो. यावर राव खाणे फायद्याचे ठरते.
३) ऊर्जा मिळते – रवा पोषक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असल्यामुळे शारीरिक थकवा, अशक्तपणा दूर होतो आणि दिवसभर उत्साही वाटते. या गुणधर्मामुळे रोज नाश्त्यात रव्यापासून बनविलेले पदार्थ खाणे लाभदायक ठरते.
४) मज्जासंस्थेसाठी लाभदायक – मज्जासंस्था आपल्या भावनिक आरोग्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. यामुळे मज्जासंस्थेतील बिघाड स्ट्रोक, रक्तस्त्राव आणि इतर गंभीर संक्रमणांचा धोका निर्माण करतो. रव्यामध्ये मॅग्नेशियम, जस्त, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे सर्व घटक मज्जातंतू विकार टाळण्यास मदत करतात. यामुळे मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी, रव्याचे सेवन करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
५) हृदयासाठी फायदेशीर – रव्यामध्ये शून्य कोलेस्टेरॉल असल्यामुळे याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत मिळते. परिणामी हृदय निरोगी राहते. अशा स्थितीत त्याच्याशी संबंधित आजारांना बळी पडण्याचा धोका कमी असतो.
६) मधुमेहावर नियंत्रण – मधुमेहाचे रुग्ण रवा खाऊ शकतात. यामुळे त्यांना मधुमेह नियंतत्रित ठेवण्यास मदत होईल. मधुमेहाचे रुग्ण फायबर, प्रथिने आणि ऊर्जा मिळवण्यासाठी दररोज रव्यामध्ये भाज्या मिसळून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकतात.
७) स्तनपानासाठी मदतशीर – नवमातांना कधीकधी कमी दूध येते. यासाठी त्यांनी रव्याचा आहारात समावेश करावा. रवा प्रोलॅक्टिनला उत्तेजित करून स्तनपान सुरळीत करण्यात मदत करतो.
८) वजन कमी – रव्यामध्ये प्रथिने आणि फायबर असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. शिवाय रव्यातील थायमिन, फोलेट आणि व्हिटॅमिन बी अतिरिक्त प्रमाणात भूक कमी करण्यास मदत करते.