मस्त चव आणि स्वस्थ आरोग्यासाठी भाज्यांचे लोणचे नक्की ट्राय करा; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन आहारात आपण अनेक भाज्यांचा समावेश करत असतो. पण आपल्या सोयीने आणि आवडीने. म्हणजे अनेकांना कारलं, दोडकी, शिराळे, दुधी आणि अजून अशा बऱ्याच भाज्या आहेत ज्या आवडत नाहीत. पण मित्रांनो भाज्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यामुळे कंटाळा न करता भाज्या खाणे जरुरी आहे. म्हणून रोज रोज त्याच त्याच भाज्या त्याच त्याच पद्धतीने खणायची गरज नाही. तुम्ही तुम्हाला नको वाटणारी भाजी अगदी चमचमीत चटकदार जिभेला चव आणणाऱ्या लोणच्याच्या स्वरूपात बनवून खाऊ शकता. होय. तुम्ही बरोबर वाचताय. भाज्यांचं लोणचंच. हे लोणचं बनवणं एकदम सोप्प, चवीला एकदम चविष्ट आणि मूड फ्रेश करणारं आहे. त्यामुळे आता नावडती भाजी देखील आवडती होऊ शकते आणि रोजच्या जेवणाची रंगत वाढू शकते. लहान मुलेदेखील सतत भाजी- पोळी, सूप, पराठे खाऊन खाऊन वैतागलेली असतात. मग अशावेळी त्यांनादेखील भाज्यांची लोणची खाऊ घालाल तर मुळी आवडीने खातील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणाच्याही तोंडाला पाणी आणणाऱ्या या पौष्टिक आणि चविष्ट भाज्यांचे लोणचे कसे बनवायचे ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
ताज्या भाज्यांचे लोणचे बनविण्यासाठी लागणारे साहित्य :-
भाज्यांचे लोणचे बनविण्याची कृती :-
सर्वात आधी फ्लॉवर आणि गाजर या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्या. यानंतर मटारचे दाणे, मोड आलेली मटकी पाण्याने धुवून घ्या. आता भाज्यांमध्ये मीठ, तिखट, साखर घालून ठेवा. दुसरीकडे एका कढईत फोडणी तयार. यासाठी तेलात मोहरी घाला. ती तडतडली की हिंग, हळद घालून त्यात मोहरीची पूड घाला. आता हि फोडणी खमंग झाल्यांनतर गरमा गरम तशीच भाज्यांच्या मिश्रणावर घाला.
आता हे सगळे मिश्रण एकजीव करा आणि जेवणासोबत खायला घ्या. या भाज्या कच्च्या असल्या तरी फोडणीमुळे त्यावर अन्नसंस्कार होतात. हे लोणचे थंडीच्या दिवसांत बाहेर १५ दिवसांपर्यंत टिकते. मात्र ताजे असतानाच हे लोणचे खाणे अधिनिक फायदेशीर आहे. यामध्ये आवडीप्रमाणे, मिरची, लसूण, आलं, आवळा यांचे मोठे काप करुन तेही घालू शकता. यामुळे लोणच्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढेल.
भाज्यांचे लोणचे खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे :-
1. एकतर भाज्यांचे लोणचे लहान मुल चवीने खातील. ज्यामुळे लहान मुलांना भाज्यांमधील पौष्टिक तत्त्व प्राप्त होतील. भाज्यांच्या लोणच्यात अँटीऑक्सीडंट्स, व्हिटॅमिन व मिनरलस् आणि बरेच मायक्रो न्यूट्रीएन्ट्स समाविष्ट असतात. यामुळे आपले शरीर सुदृढ आणि सशक्त होते.
2. लोणचं बनवताना कच्च्या भाज्यांचा वापर होतो. ह्या भाज्या न पिकल्यामुळे आणि न शिजवल्यामुळे त्या अँटीऑक्सीडंट्सचे मोठे स्त्रोत असतात. भाज्यांच्या लोणच्यातील हेच अँटीऑक्सीडंट्स आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून लवकर वृद्धत्व येण्यापासून बचाव करतात.
3. भाज्यांच्या लोणच्यात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. जे दृष्टी सुधारणे, ऍनिमियापासून बचाव करणे, याव्यतिरिक्त बरेच रोग, आजार, विकार घालवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
4. याशिवाय जर लोणचं टिकवण्यासाठी व्हिनेगर वापरलात तर हे रक्तातील अॅसिटीक अॅसिड वाढवते, हिमोग्लोबिन वाढवते आणि ब्लड शुगर लेव्हल कमी करते. त्यामुळे मधिमेहींसाठी हा पर्याय देखील उत्तम आहे.
5. लोणच्यात समाविष्ट असलेले मसाले आणि भाज्यांच्या एकत्रित प्रक्रियेमुळे हेपॅटॉप्रोटेक्टिव्ह तयार होते. जे आपल्या लिव्हरसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे अल्सरच्या त्रासावर परिणामकारक लाभ होतो.