कच्ची हिरवी मिरची खाल, तर आरोग्यावर होतील वाईट परिणाम; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक लोक चवीचं खाणारे असतात. अश्या खवय्यांना प्रत्येक पदार्थासोबत काहीतरी विशेष चव चाखण्याची सवय असते. आता याचे उदाहरण द्यायचे झाले तर वडापाव हे उत्तम उदाहरण आहे. कारण वडापावचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत. वडापाव या पदार्थाला स्वतःची अशी विशेष चव असते मात्र यासोबत आवडीने खाल्ली जाते ती हिरवी मिरची याचा स्वाद आणखी वाढवते. तसेच अनेकांना तिखट खाण्याचा जणू छंदच असतो. त्यामुळे जेवण गोडाचं असो किंवा मग तिखटाचं जेवणासोबत एखादी का होईना हिरवी मिरची खाण्याची सवय असतेच. हे कितीही मान्य असले कि, हिरवी मिरची केवळ जेवणाचा स्वाद नव्हे, तर अनेको बाबतीत आरोग्यासाठी लाभदायक आहे. मात्र मिरचीचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायकदेखील असते. त्यामुळे काही व्यक्तींनी विशेषतः आहारात कच्ची हिरवी मिरची खाणे टाळायला हवे. चला तर जाणून घेऊयात हिरवी मिरची आरोग्यासाठी हानिकारक कशी ठरते. खालीलप्रमाणे:-
१) दमा
– हिरव्या मिरच्यांचे अतिसेवन केल्याने दम्याचा अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे दम्याच्या रुग्णांनी आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांनी देखील हिरवा मिरच्या खाणे टाळावे. पण प्रामुख्याने या रुग्णांनी लाल मिरच्यांचे सेवन टाळणे फायद्याचे आहे.
२) बद्धकोष्ठता
– बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने मिरच्यांचे सेवन करूच नये. कारण ही समस्या मुळव्याधच्या समस्यांचे कारण ठरू शकते. शिवाय ज्यांना आधीपासून हि समस्या असेल त्यांच्यासाठी मिरची खाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
३) अॅसिडिटी
– ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या वारंवार जाणवते त्या लोकांनी प्रामुख्याने मिरची खाणे बंद करावे. कारण हिरवी मिरची खाल्ल्याने पोटात जळजळ होते आणि अॅसिडिटी वाढते. इतकेच नव्हे तर अतिसाराची समस्या देखील होते.
४) पोटात अल्सर
– ज्यांना पोटातील अल्सरची समस्या आहे त्या लोकांनी मिरची खाऊ नये. कारण हिरवी मिरची खाल्ल्याने जखमा खोल होतात आणि समस्या गंभीर स्वरूप धारण करते.
५) त्वचेचे विकार
– त्वचेसंबंधित समस्या असणाऱ्या व्यक्तींनी देखील मिरची खाणे टाळावे. कारण बऱ्याचदा त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे या तक्रारी मिरचीचे अतिसेवन केल्यामुळे होतात. मुख्य बाब अशी कि हिरव्या मिरचीत कॅप्सेसीन असते, जे त्वचेच्या समस्या आणखी वाढवते. त्यामुळे अश्या रुग्णांनी मिरची खाणे प्रामुख्याने टाळावे.