लाल केळं खाणे उत्तम आरोग्याची गरज; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। तुम्ही हिरव्या आणि पिवळ्या केळ्यांबद्दल ऐकले असेल. अगदी आपल्या आहारात अनेकदा यांचे सेवनदेखील केले असेल, पण तुम्ही कधी लाल केळी खाल्ली आहेत का? भारतात मोठ्या प्रमाणावर केळ्याचे उत्पादन घेतले जाते आणि यात लाल केळ्याचा देखील समावेश आहे. आपल्याकडे आहारात केळ्याची भाजी, शिकरण, काचऱ्या, भजी, वडे आणि विविध गोड पदार्थ बनवले जातात. यासाठी प्रामुख्याने पिकलेली पिवळ्या रंगाची केळी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. तर हिरव्या रंगाचं कच्चं केळंसुद्धा भाजी, भजी असे पदार्थ बनविण्यासाठी वापरले जातात. जे आपण नेहमीच खातो. पण लाल केळी दुर्मिळ असल्यामुळे बाजारात क्वचितच पहायला मिळतात. त्यात या केळ्याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे ती खाणे टाळले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लाल केळे खाण्याचे फायदे सांगणार आहोत. खालीलप्रमाणे:-
१) रोग प्रतिकार शक्ती सुधार – निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ती मजबूत असणे गरजेचे असते. रोग प्रतिकारशक्ती जर मजबूत ठेवायची असेल तर तुम्ही नियमित एक लाल केळं जरूर खा. कारण लाल केळ्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. यातील व्हिटॅमिन सी आणि बी ६ शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक तत्वांची पूर्तता करतात.
२) सक्रिय पेशी – लाल केळ्यामुळे शरीरात पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यास मदत होते. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी या पेशी सुरक्षा रक्षकाप्रमाणे कार्य करत असतात. त्यामुळे सहाजिकच लाल केळं खाण्यामुळे पेशींच्या कार्यात सुधार होतो आणि परिणामी आजारपणापासून आपले शरीर दूर राहते.
३) अशक्तपणा होतो दूर – कोणत्याही कारणामुळे अशक्तपणा येत असेल तर आहाराबाबत वेळीच काळजी घ्या. अशावेळी आहारात पोषक घटक असतील तर रक्त वाढण्यास आणि अॅनिमिया कमी होण्यास मदत होते. यासाठी लाल केळं जरूर खा. या केळ्यातील व्हिटॅमिन बी ६ आणि अॅंटि ऑक्सिडंटमुळे हिमोग्लोबिन वाढते. परिणामी अॅनिमिया दूर होण्यास मदत होते.
४) शारीरिक ऊर्जेत वाढ – रोजची धावपळ आणि चुकीची जीवनशैली आरोग्यावर परिणाम करीत असते. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळीच आहार पद्धती सुधारण्याची गरज असते. यात दररोज एक लाल केळं खा. कारण हे केळं शरीराचे पूर्ण पोषण करण्यास सक्षम आहे. यामुळे भुक भागते आणि दिवसभर उत्साह राहतो.
५) वजनावर नियंत्रण – बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव अशी अनेक कारणं वजन वाढवतात. मात्र जर तुमच्या आहारात नियमित लाल केळं असेल तर तुमचं वजन नियंत्रणात राहू शकतं. कारण या केळ्यामध्ये फायबर जास्त आणि फॅट्स कमी असतात.
६) मजबूत आणि निरोगी हाडे – लाल केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. यामुळे दररोज एक लाल केळं खाल्ल्यास आपली हाडे मजबूत आणि स्नायू बळकट होतात. यामुळे हाडांच्या समस्यादेखील यामुळे दूर होतात.